फोटो सौजन्य- pinterest
वाईटावर चांगल्याच्या विजयाचा सण यंदा गुरुवार, 2 ऑक्टोबर रोजी सर्वत्र मोठ्या उत्साहात साजरा केला जाणार आहे. या सणाच्या दिवशी केवळ रावणाचे दहन केले जात नाही तर जीवनातील नकारात्मकतेचे देखील दहन केले जाते. ज्योतिषशास्त्रानुसार रावण दहनानंतर उरलेली राख आणि लाकूड खूप चमत्कारिक मानले जाते. असे म्हटले जाते की, या गोष्टींचा आपण योग्य प्रकारे वापर केल्यास व्यक्तीच्या जीवनातील आर्थिक समस्या दूर होतात, नकारात्मक ऊर्जा नष्ट होते आणि वाईट नजरेचा प्रभावही दूर होतो. जर तुम्हाला देखील सतत पैशाची समस्या किंवा अडचणी येत असतील तर दसऱ्याच्या दिवशी रावण दहनाच्या राखेशी आणि लाकडाशी संबंधित हे उपाय करणे तुमच्यासाठी फायदेशीर ठरु शकते.
जर तुमच्या घरामध्ये नेहमी कलह होत असेल किंवा नकारात्मकतेचे वातावरण असेल तर रावण दहनाच्या या उपायाने तुम्हाला अपेक्षित फायदा होईल.
यावेळी रावण दहनानंतर उरलेली राख गोळा करुन घेऊन या. त्यानंतर ही राख लाल रंगांच्या छोट्या कपड्यामध्ये गुंडाळा आणि एक गठ्ठा तयार करा. त्यानंतर हा गठ्ठा घराच्या मुख्य दरवाजाच्या आतील बाजूस किंवा उंबरठ्याजवळ ठेवा. असे केल्याने घरातील नकारात्मक ऊर्जा दूर होण्यास मदत होते. हा गठ्ठा घरासाठी संरक्षक कवच म्हणून काम करते आणि घरामध्ये सकारात्मक उर्जा प्रवेश करते.
जर तुम्ही बऱ्याच काळापासून आर्थिक समस्येचा सामना करत असाल तर रावण दहनानंतर हा उपाय करणे खूप फायदेशीर ठरेल.
रावण दहनानंतर उरलेले लाकडाचे छोटे तुकडे गोळा करा. या काठ्या शुद्ध केल्यानंतर त्या तुमच्या तिजोरीत, रोख रकमेच्या पेटीत किंवा पैसे ठेवण्याच्या ठिकाणी ठेवा. ज्योतिषशास्त्रानुसार असे करणे खूप शुभ मानले जाते. यामुळे घरामध्ये धनाचे आगमन होते, असे मानले जाते. तसेच आर्थिक अडचणी दूर होण्यास मदत होते.
जर तुम्ही किंवा तुमच्या कुटुंबातील कोणताही सदस्य कोणालाही वाईट नजर लागली असल्यास अशा लोकांचे आरोग्य खराब होऊ शकते आणि सतत नुकसान होऊ शकते. यामुळे रावण दहनानंतर हे उपाय करणे खूप फायदेशीर राहील.
रावण दहनाची राख तुमच्या तळहातावर घ्या. त्यानंतर ही राख तुमच्या डोक्याभोवती फिरवा आणि नंतर ती घराबाहेर फेकून द्या. असे मानले जाते की, हा उपाय केल्याने वाईट नजरेचे परिणाम दूर होतात. म्हणजे शरीरामधील नकारात्मक उर्जा दूर करण्याची ही एक प्रतीकात्मक कृती आहे, ज्यामुळे वाईट काळाचा अंत होतो.
(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)