Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Gold Rate |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

असे स्मशान जिथे राक्षस खायचे ‘शव’, भगवान शिवाने केली भक्तांची रक्षा; काय आहे पौराणिक कथा

चामुंडा नंदिकेश्वर धाम हिमाचल प्रदेशातील कांगडा जिल्ह्यात आहे. बाणेर खड्ड्याच्या काठावर मंदिराजवळ एक स्मशानभूमी आहे, जिथे धार्मिक मान्यतेनुसार मृतदेहांचे आत्मा भगवान शंकराच्या चरणी जातात.

  • By दिपाली नाफडे
Updated On: Dec 18, 2024 | 11:26 AM
मंदिर जिथे राक्षस खायचा शव

मंदिर जिथे राक्षस खायचा शव

Follow Us
Close
Follow Us:

चामुंडा नंदिकेश्वर धाम, ज्याला चामुंडा देवी मंदिर म्हणूनही ओळखले जाते, हे धार्मिक स्थळ हिमाचल प्रदेशातील कांगडा जिल्ह्यातील धरमशाला तहसीलमधील पालमपूरपासून फक्त 19 किलोमीटर अंतरावर आहे. या धार्मिक स्थळाची विशेष बाब म्हणजे या मंदिराच्या काठावर बाणेर खड्डा वाहणारे एक स्मशानभूमी आहे, जिथे दररोज अनेक मृतदेह जाळले जातात. मात्र या ठिकाणाला एक पौराणिक इतिहास आहे असे तिथले स्थानिक लोक सांगतात. 

हिमाचल प्रदेशातील या भागातील ही नक्की पौराणिक कथा काय आहे आणि मेल्यानंतर इथेच का जाळावे असे म्हटले जाते त्याला महत्त्व आहे. कारण इथे जळल्यानंतर मृतदेहाचा आत्मा हा भगवान शिवाच्या चरणी लीन होतो असा समज आहे. काय आहे कथा जाणून घ्या (फोटो सौजन्य – इन्स्टाग्राम/Pinterest) 

काय आहे पौराणिक कथा 

एका पौराणिक कथेनुसार या ठिकाणी एकेकाळी जिंदवली नावाचा राक्षस राहत असे, जो लोकांचा संहार करत असे. त्यामुळे त्रासलेल्या त्यावेळच्या राजाने त्यांना विनम्र प्रार्थना केली आणि विनंती केली की तुम्ही रोज अनेक लोकांचा संहार करत आहात, त्यामुळे आमचे लोक लवकरच नष्ट होतील. हे ऐकल्यानंतर राक्षस म्हणाला की, तुम्ही तुमच्या लोकांचे रक्षण करण्यास सांगत आहात, पण माझ्या भुकेचे काय? हे ऐकताच तिथल्या राजाने राक्षसाला सांगितले की, तुझी भूक भागवण्यासाठी आम्ही तुला दररोज एक जिवंत किंवा मृत व्यक्ती देऊ, ज्यामुळे तुझी भूक भागेल आणि माझी प्रजाही लवकर मरणार नाही. हे अनेक वर्षे चालू राहिले.

Somvati Amavasya 2024: सोमवती अमावस्येला 5 ठिकाणी लावा दिवे, लक्ष्मी आणि पितर दोन्ही होतील प्रसन्न

भगवान शिव आणि गावातील महिला

गावात कुणीही मेला की त्याचा मृतदेह राक्षसाच्या हवाली केला जायचा आणि ज्या दिवशी मृतदेह नसायचा त्या दिवशी जिवंत माणसाला राक्षसाच्या हवाली केले जायचे. अशा स्थितीत एका गावातील एका महिलेला दोन मुलगे झाले, त्यापैकी एकाचा बळी दिला गेला आणि आता दुसऱ्याची पाळी होती ज्याला राक्षसाकडे सोपवायचे होते. ज्या दिवशी स्त्रीला आपल्या मुलाला राक्षसाकडे पाठवायचे होते, त्या दिवशी त्या स्त्रीने अनेक स्वादिष्ट पदार्थ तयार करून भगवान शंकरांना प्रसाद म्हणून अर्पण केले आणि भगवान शंकराची भक्ती केली. त्या स्त्री आणि तिच्या मुलांची भक्ती पाहून भगवान शिव खूप प्रसन्न झाले आणि ऋषींचे रूप घेऊन त्या स्त्रीजवळ आले.

शिवाला केला नेवैद्य अर्पण 

साधूच्या वेषातील शिव त्या बाईला अजिबातच कळला नाही. मात्र बाईने साधूलाही आपण तयार केलेला नैवेद्या मनोभावे अर्पण केला. मात्र तिच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते आणि त्या महिलेचे अश्रूपूर्ण डोळे पाहून साधूने त्या महिलेला विचारले की, एकीकडे तू स्वादिष्ट पदार्थ बनवत आहेस आणि दुसरीकडे रडत आहेस, असे का? 

स्त्रीने ऋषींना जिंदावली या राक्षसाची संपूर्ण कहाणी सांगितली. साधूने त्या महिलेला विचारले की तू काळजी का करते आहेस? तुझ्या मुलाच्या जागी मी जातो. माझ्या मागे कोणीच नाही. असे केल्याने तुमच्या मुलाचाही उद्धार होईल आणि राक्षसाची भूकही शमली जाईल.

Shukra Gochar 2024: 11 दिवसांनी 3 राशींचे नशीब मारणार पलटी, 28 डिसेंबरनंतर शनि ग्रहात होणार शुक्र गोचर

साधूच्या वेषात शिवशंकर 

त्या महिलेला समजावून जेव्हा साधूच्या वेषातील शिव स्मशानभूमीत पोहोचले तेव्हा त्यांनी स्वतःला राक्षसाच्या स्वाधीन केले. राक्षसाने जेव्हा त्या साधूचा बळी घ्यायचा प्रयत्न केला तेव्हा् राक्षसावर मोठमोठे खडक आणि दगड पडू लागले. आणि त्याच खडक आणि दगडांच्या खाली पडून राक्षस मरण पावला. 

मरता मरता जेव्हा राक्षसाला आपल्या पापांचा पश्चात्ताप झाला तेव्हा त्याने भगवान शंकराची आराधना केली आणि त्यानंतर भगवान शिव प्रसन्न झाले आणि राक्षसाला सांगितले की या ठिकाणी ज्या व्यक्तींचे मृत शरीर येईल त्याचा आत्मा शिवचरणी येईल.

ध्यान आणि मनःशांतीसाठी लोक येतात 

या ठिकाणी राहणाऱ्या ओंकार ठाकूर यांनी सांगितले की, या घाटावर ध्यान आणि साधना केल्याने आत्म्याला शुद्धी आणि मुक्ती मिळते. देवीच्या कृपेने हे स्थान ऊर्जावान आणि पवित्र मानले जाते. स्मशानभूमीजवळील काही रचना आणि शिल्पे प्राचीन कला आणि संस्कृती प्रतिबिंबित करतात, ज्यात देवी-देवतांच्या मूर्तींचा समावेश आहे. 

आजही हे ठिकाण धार्मिक दृष्टिकोनातून महत्त्वाचे आहे आणि लोक आपल्या प्रियजनांच्या अंतिम संस्कारासाठी येथे येतात. भाविक आणि पर्यटकही येथे ध्यान आणि शांतीच्या शोधात येतात. अशा प्रकारे, चामुंडा देवी मंदिराजवळील स्मशानभूमी हे धार्मिक, पौराणिक आणि ऐतिहासिक दृष्टिकोनातून एक अतिशय महत्त्वाचे ठिकाण आहे, जे जीवन आणि मृत्यूचे गहन तत्त्वज्ञान व्यक्त करते

Web Title: Famous temple called chamunda nandikeshwar dham where dead bodies eaten by evil lord shiva story

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 18, 2024 | 11:26 AM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.