शुक्र गोचर होण्याचा कोणत्या राशींना होणार फायदा (फोटो सौजन्य - Pinterest)
ज्योतिषशास्त्रानुसार सर्व ग्रह आपापल्या ठरलेल्या वेळी संक्रांत करत असतात अर्थात एका राशीतून दुसऱ्या राशीमध्ये त्यांचे परिवर्तन होत असते. शुक्र देखील असाच एक ग्रह आहे. सध्या शुक्र मकर राशीत आहे, पण 11 दिवसांनी म्हणजेच 28 डिसेंबरला शुक्र ग्रह कुंभ राशीत प्रवेश करणार आहे.
या संक्रमणामुळे 3 राशींना सर्वाधिक फायदा होणार आहे. 28 डिसेंबरनंतर त्याचे नशीब फिरेल आणि नवीन वर्षात तो आपल्या कुटुंबावर भरपूर संपत्तीचा वर्षाव करेल. त्यांना अनपेक्षित आर्थिक लाभ तर होईलच पण समाजात त्यांचा सन्मानही वाढेल. चला जाणून घेऊया शुक्र संक्रमणामुळे कोणत्या राशींना सर्वाधिक फायदा होणार आहे, ज्योतिषाचार्य समीर मणेकरीकर यांच्याकडून
शुक्र गोचर म्हणजे काय?
शुक्र गोचर म्हणजे शुक्राचे संक्रमण म्हणजे शुक्र ग्रह आपली हालचाल बदलतो आणि एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करतो. ज्योतिषशास्त्रानुसार शुक्र ग्रह भौतिक सुखाचा दाता आहे. शुक्राच्या संक्रमणाशी संबंधित आणखी काही गोष्टी आपण जाणून घेऊयाः
मेष रास
शुक्र गोचराच्या प्रभावामुळे कामाच्या ठिकाणी तुमची सर्वोत्तम कामगिरी करण्यात तुम्ही यशस्वी व्हाल. बॉस तुमच्या कामावर खूश होतील. ते तुम्हाला मोठी जबाबदारी देण्याचा विचार करू शकतात. जुन्या गुंतवणुकीतून तुम्हाला अचानक पैसे मिळू शकतात. कोर्टात प्रलंबित प्रकरणे तुमच्या बाजूने निकाली निघू शकतात. शुक्र गोचर झाल्याने तुम्हाला फायदाच फायदा होणार आहे. तसंच नवं वर्षही तुमच्यासाठी चांगलं जाणार आहे
डिसेंबर महिन्यातील शुक्र प्रदोष व्रत कधी आहे? जाणून शुभ मुहूर्त, योग
वृषभ रास
शुक्राच्या राशीत बदलामुळे व्यवसाय करणाऱ्या लोकांना खूप फायदा होईल. व्यवसायात ज्यांना योग्य सौदा करायचा आहे त्यांचं नशीबही फळफळेल, त्यांचा सौदा अत्यंत चांगला ठरणार आहे. बेरोजगारांना नोकरी मिळण्याची शक्यता आहे. त्याचवेळी, नोकरी बदलण्याचा विचार करत असणाऱ्या लोकांच्या इच्छादेखील पूर्ण होऊ शकतात. जोडीदारासोबत तुमचा ताळमेळ चांगला राहील आणि तुम्ही एकमेकांसह चांगला वेळ घालवाल.
मिथुन रास
शुक्र गोचरामुळे भाग्य तुमच्या बाजूने असणार आहे. सामाजिक कार्यात तुमची रुची तर वाढेलच पण धार्मिक कार्यांकडेही तुमचा कल असेल. गरजूंना मदत करण्यासाठी तुम्ही परोपकार कराल. तुम्ही तुमच्या कुटुंबासह तीर्थयात्रेलाही जाऊ शकता. तसंच तुमचा हा कालावधी अत्यंत चांगला जाणार असून तुमचे नशीब प्रत्येक गोष्टीत तुमची साथ देणार आहे. इतके दिवस जर एखाद्या गोष्टीचा त्रास झाला असेल तर त्यातून तुम्ही लवकरच बाहेर पडणार आहात.
30 वर्षांनंतर शुक्र आणि शनिची युती होणार, या राशींचा सुरु होणार सुवर्णकाळ
टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.