फोटो सौजन्य- pinterest
फादर्स डे साजरा करण्याची परंपरा वर्षानुवर्षे चालत आलेली आहे. दरवर्षी फादर्स डे दून महिन्याच्या तिसऱ्या रविवारी साजरा केला जातो. यावेळी रविवार, 15 जून रोजी फादर्स डे आहे तसेच या दिवशी मिथुन संक्रांती देखील आहे म्हणजेच सूर्य देव आपली वृषभ रास सोडून मिथुन राशीत प्रवेश करणार आहे. ज्योतिषशास्त्रानुसार वडिलांचा संबंध सूर्यदेवाशी असल्याचे मानले जाते. मुलगा किंवा मुलगी यांच्यासाठी वडिलांसोबतचे असलेले हे नाते खूप खास मानले जाते. सूर्य देवाला बलवान करण्यासाठी या दिवशी तुमच्या वडिलांना एखादी वस्तू भेट देऊन जीवनामध्ये प्रगतीचा मार्ग मोकळा होईल.
वडिलांचा संबंध सूर्य आणि गुरुशी संबंधित आहे. यामुळे ग्रहांचा परिणाम तुमच्या नात्यामध्ये होऊ शकतो. बऱ्याचदा या नात्यामध्ये आंबटपणा असतो तो दूर करण्यासाठी तुम्ही वडिलांना काही भेटवस्तू देऊन नात्यांमध्ये गोडवा आणू शकता. ज्योतिषशास्त्रानुसार वडिलांना कोणत्या भेटवस्तू देणे शुभ मानले जाते, जाणून घ्या
फादर्स डेच्या निमित्ताने तुम्ही वडिलांना पिवळ्या रंगांची कोणतीही वस्तू देणे शुभ मानले जाते. यामध्ये तुम्ही त्यांना तुम्ही त्यांना पिवळे कपडे, पिवळा स्कार्फ, पिवळा कुर्ता, पिवळा शर्ट इत्यादी भेटवस्तू म्हणून देऊन त्यांचे आशीर्वाद घ्यावे. असे मानले जाते की, असे केल्याने तुमच्या कुंडलीतील सूर्य मजबूत होतो.
या दिवशी तुम्हाला काही खास आणि उपयोगात येईल वस्तू भेट म्हणून देईची असल्यास तुम्ही पुस्तक देऊ शकता. शक्यतो ही पुस्तके पिवळ्या रंगांची असावी. कारण हे गुरु ग्रहांचे संयोजन मानले जाते. अशी मान्यता आहे की, यामुळे वडिलांना सूर्य आणि गुरु या दोन्हींचा आशीर्वाद प्राप्त होतो.
या दिवशी तुम्ही कपडे, पुस्तकांसोबत पिवळ्या रंगांची मिठाई देखील भेट म्हणून देऊ शकता. यामुळे तुमच्या नात्यांमधील गोडवा टिकून राहील.
फादर्स डेच्या निमित्ताने तुम्ही वडिलांना पिवळ्या रंगांची फुले किंवा फुलांचा गुच्छ भेट म्हणून देऊ शकता. यामुळे तुमची जीवनात प्रगती होईल आणि ही एक चांगली भेट देखील ठरेल.
तुम्ही या दिवशी वडिलांना सोने किंवा चांदीची कोणतीही वस्तू भेट म्हणून देणे खूप चांगले आणि फायदेशीर मानले जाते. ज्योतिषशास्त्रामध्ये याचा संबंध दोन्ही धातूशी असल्यामुळे तुमचे नाते मजबूत राहण्यास मदत होते.
तुम्ही वडिलांना त्यांच्या राशीनुसार पिवळ्या रंगांची रत्न किंवा स्फटिक देखील भेट म्हणून देऊ शकता.
(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तू, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/ बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navrashtra या तथ्यांची पुष्टी करु शकत नाही)