
फोटो सौजन्य- pinterest
12 जानेवारी 1863 रोजी कोलकाता येथे जन्म झालेले नरेंद्रनाथ दत्त पुढे स्वामी विवेकानंद या नावाने ओळखले जाऊ लागले. वयाच्या अवघ्या 30 व्या वर्षीच 1893 मध्ये शिकागो येथे झालेल्या सर्वधर्म परिषदेत स्वामी विवेकानंदांनी आपले विचार मांडले होते. त्यानंतर जगाचे लक्ष त्यांच्याकडे गेले आणि त्यांचे विचार विश्व मान्य झाले.
स्वामी विवेकानंद लहानपणापासूनच देवभक्त होते. एखादी गोष्ट करायला घेतल्यावर आपले संपूर्ण लक्ष त्या गोष्टीकडे लागणे आणि इतर कोणत्याही गोष्टीकडे लक्ष नसणे, अशा प्रकारची मनाची एकाग्रता होती. नरेंद्र आणि त्यांचे मित्र ध्यान लावून बसणे, यासारखे खेळ खेळत असत. एकदा नरेंद्र हे त्यांच्या मित्रांसोबत घरामध्ये देवाचे ध्यान लावून बसले होते. नरेंद्र हे तर पूर्णपणे ध्यानमग्न झाले होते. तेवढ्यात एकाकडेने सळसळ ऐकू आली. नरेंद्र यांच्या मित्रांनी डोळे झटकन उघडून बघितले तर त्यांना तेथे साप दिसला. त्यामुळे घाबरून, ओरडून सर्व जण खोलीबाहेर पळू लागले. काय झाले म्हणून भुवनेश्वरीदेवी म्हणजे स्वामींची आई येऊन पाहते तर काय ? नरेंद्र हे तसेच शांतपणे डोळे मिटून बसले होते. साप त्याच्या जवळून दुसरीकडे गेला, तरी नरेंद्रला त्याचा पत्ताच नव्हता. ही घटना त्यांची देवाबद्दलच्या चित्त एकाग्रतेचे दर्शन घडवते.
स्वामी विवेकानंदांची काली माते वर असलेली दृढ श्रद्धा सर्वांना माहीत आहेच. स्वामी विवेकानंद लहानपणीच सर्व प्रथम काली मातेचा साक्षात्कार दक्षनेश्वरीमध्ये झाला होता. स्वामी विवेवकानंद यांचे वडील श्री विश्वनाथ दत्त यांचे 1884 आकस्मिक निधन झाले. त्यानंतर त्यांच्यावरच कुटुंबाची सर्व जबाबदारी स्वामी म्हणजेच नरेंद्र यांच्यावर येऊन पडली होती. नरेंद्र यांनी नोकरी केली, पण उपयोग झाला नाही. दोन वेळच्या जेवणाची भ्रांत होती. नरेंद्र यांनी त्यावेळी श्रीरामकृष्ण परमहंस यांच्याकडे गेले. त्यांनी गुरूंना सर्व परिस्थिती सांगितली व कालीमातेस आपल्या समस्या सोडवाव्यात म्हणून प्रार्थना करण्याची विनंती केली. श्रीरामकृष्ण म्हणाले, मी मातेकडे सांसारिक गोष्टी मागू शकत नाही, हे तुला माहीत नाही का? तूच माग मातेकडून जे तुला हवं आहे ते. ती तुला नक्की देईल.
नरेंद्र हे कालीमातेच्या दर्शनाला जात होते. जणू कालीमाताच नरेंद्र यांना बोलावत होती. नरेंद्र हे कालीमातेपुढे नतमस्तक होऊन उभे राहिले, त्याला साक्षात कालीमाता दिसत होती. वात्सल्य भावनेने ती नरेंद्रकडे बघत होती. ते बघून नरेंद्र हे देहभान विसरले आणि त्याच्या मुखातून शब्द बाहेर पडले, मला विवेक दे, वैराग्य दे! ज्ञान दे! भक्ती दे!
नरेंद्र हे भानावर आले आणि ते गुरूंकडे गेले आणि घडलेला प्रकार सांगितला. श्रीरामकृष्णांनी त्यांना पुन्हा मातेकडे पाठवले. पुन्हा पहिल्यासारखे घडले असे तीनवेळा घडले. नरेंद्र हे अन्न-वस्त्र, नोकरी, समृद्धी मागायला गेला होते, पण या सांसारिक गोष्टी न मागता विवेक, वैराग्य, ज्ञान, भक्ती मागितली. संत तुकाराम महाराजांनीसुद्धा देवाकडे मागितले की, देवा विसर न व्हावा तसं लहान नरेंद्र यांनी सुद्धा मागितले.
हा विवेकानंद यांना झालेला पहिला साक्षात्कार होता, यामुळे स्वामी विवेकानंद यांचे जीवनच येथून बदलून गेले. इथून पुढे त्यांनी माता कालीची मनोभावे उपासना सुरू केली. जगण्याचा अर्थच त्यांना जणू उमगला होता. 25, 26, 27 डिसेंबर 1892 तीन दिवस स्वामी विवेकानंद यांनी कन्याकुमारी येथील श्रीपाद शीला येथे ध्यान केले होते. माताने नेमलेल्या कार्याचा साक्षात्कार स्वामी विवेकानंदांना कन्याकुमारी येथे झाला होता. इथूनच उज्ज्वल जगतगुरू भारताचे चित्र स्वामीजींपुढे उभे राहिले होते.
सप्टेंबर 1899 मध्ये स्वामी विवेकानंद अमरनाथ दर्शन घ्यायला गेले असताना श्रीनगरमधील क्षीर भवानी मंदिरात गेले होते. तेथे स्वामी विवेकानंद यांनी माता कालीचे ध्यान करत समाधी लावली होती, आठवडाभर त्यांनी नवरात्रोत्सवात ध्यान केले होते. परमेश्वर भक्तीतून आपल्या जीवनाचा उद्देश आपल्याला स्पष्ट होतो व उपासना केल्याने त्यात साफल्य होण्यास मदत होते हे स्वामीजींच्या जीवनातून लक्षात येते.
(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)
Ans: स्वामी विवेकानंद हे माता कालीचे परम भक्त होते. त्यांनी कालीमातेला शक्ती, करुणा आणि सत्याचे प्रतीक मानले होते. त्यांच्या आध्यात्मिक जीवनात काली उपासनेला विशेष स्थान होते.
Ans: त्यांनी अन्न, वस्त्र किंवा संपत्ती न मागता माता कालीकडे विवेक, वैराग्य, ज्ञान आणि भक्ती यांची याचना केली. हाच क्षण त्यांच्या जीवनातील निर्णायक वळण ठरला.
Ans: माता कालीवरील भक्तीमुळे स्वामी विवेकानंदांना निर्भयता, आत्मविश्वास आणि त्यागाची प्रेरणा मिळाली. हीच भक्ती त्यांना विश्वबंधुत्वाचा संदेश देण्यासाठी प्रवृत्त करत होती.