फोटो सौजन्य- pinterest
ज्योतिषशास्त्रामध्ये नजर लागणे, नकारात्मक ऊर्जा घरात प्रवेश करणे यांसारख्या गोष्टींना गंभीर मानले जाते. कारण या गोष्टींचा नकळत परिणाम आपल्या जीवनावर होतो. त्यामुळे काही राशीच्या लोकांना अडथळे आणि समस्यांना सामोरे जावे लागते. यावेळी मानसिक ताण, आजार, आर्थिक समस्या किंवा नुकसान होणे यांसारख्या गोष्टी नजर लागल्यास कारणीभूत ठरतात. ज्या लोकांना वाईट नजर किंवा नकारात्मक ऊर्जेचा त्रास होतो त्यांना या समस्यांना तोंड द्यावे लागते.
काही राशीच्या लोकांना संवेदनशीलता आणि आकर्षणामुळे देखील परिणाम होतो. या लोकांचा स्वभाव मनमोकळा असल्याने हे लोक लवकर नकारात्मक ऊर्जेचे बळी पडतात. यामुळे या लोकांना जीवनामध्ये अनेक अडथळे आणि समस्येचा सामना करावा लागतो. कोणत्या राशीच्या लोकांना नजर आणि नकारात्मकतेचा सामना करावा लागतो, जाणून घ्या
मिथुन राशीचे लोक स्वभावाने खूप भावनिक असतात. यांच्यामधील सहजता आणि मनमोकळेपणा त्यांना लोकांच्या जवळ आणतो यामुळे ते नकारात्मक ऊर्जेचे बळी पडले जाते, असे म्हटले जाते. या लोकांवर जेव्हा वाईट नजरेचा प्रभाव असतो तेव्हा त्या लोकांना चिंता, ताणतणाव आणि मूड स्विंग्ससारख्या समस्यांना तोंड द्यावे लागते. या सर्वांमुळे त्यांच्या शरीरातील ऊर्जा कमी होऊन त्यांना कोणतेही काम करण्यात रस राहत नाही. या सर्व गोष्टींवर उपाय म्हणून या लोकांनी घरामध्ये तुळशीची पाने ठेवावीत आणि त्याची काळजी घ्यावी. तसेच मानसिक शांतीसाठी नियमितपणे हनुमान चालिसाचे पठण करावे.
कर्क राशीचे लोक बाहेरून थोडे कठोर दिसतात पण आतून खूप मृदू स्वभावाचे असतात. या लोकांमध्ये भावनिकता जास्त असते. हे लोक स्वभावाने खूप प्रेमळ असतात त्यामुळे त्यांच्या लोक लगेच आकर्षित होतात. या सर्व कारणांमुळे ते वाईट नजरेस बळी पडतात असे म्हटले जाते. या गोष्टीचा परिणाम म्हणजे त्यांच्यातील आत्मविश्वास कमी होतो ते मानसिकदृष्ट्या अस्थिर आणि भावनिक होतात. त्यामुळे या लोकांनी कडुलिंबाचे नियमित सेवन करणे तसेच घरामध्ये कडुलिंबाची पाने ठेवणे खूप फायदेशीर ठरते. या लोकांनी शनि देवाची नियमित पूजा केल्यास सर्व समस्येतून आराम मिळतो. तसेच काळ्या रंगांच्या वस्तू परिधान करणे किंवा घरामध्ये ठेवणे फायदेशीर मानले जाते.
कन्या राशीच्या लोक स्वभावाने बुद्धिमान, तीक्ष्ण मनाचे असतात. मात्र या लोकांना जास्त विचार करणे, काळजी करणे यांसारख्या सवयींमुळे ते मानसिकरित्या अस्वस्थ राहतात. त्यामुळे हे लोक वाईट नजरेला लवकर बळी ठरतात. अस्वस्थता, निद्रानाश आणि शारीरिक कमजोरी यांसारख्या गोष्टींमुळे त्यांना वाईट नजरेच्या समस्यांना परिणामांना सामोरे जावे लागते. वाईट नजरेपासून सुटका मिळविण्यासाठी या लोकांनी दररोज गायत्री मंत्रांचा जप करावा. या लोकांनी काळे तीळ जाळणे आणि लिंबू-मिरची वापरणे खूप फायदेशीर मानले जाते. त्याचसोबत हळद आणि कापूर यांचे मिश्रण जाळून घरात ठेवल्यास हे लोक नकारात्मक ऊर्जेपासून दूर राहतात.
तूळ राशीच्या लोकांमध्ये नम्रता, सौम्यता या गोष्टी असतात. परंतु त्यांचा हा स्वभाव इतरांना कधीतरी त्रासदायक ठरतो. जेव्हा या लोकांवर वाईट नजरेचा प्रभाव पडतो तेव्हा या लोकांना थकल्यासारखे वाटते तसेच त्यांची सतत चिडचिड होते. या सर्व गोष्टींवर उपाय म्हणून या लोकांनी नियमितपणे हनुमान मंदिरात जाऊन पूजा करावी. कुठेही बाहेर जाताना काळे तीळ सोबत ठेवणे फायदेशीर ठरते. त्याचप्रमाणे घरात कापूर जाळल्याने घरात सकारात्मकता प्रवेश करते आणि नकारात्मक ऊर्जा दूर होते.
मीन राशीच्या लोकांमध्ये संवेदनशील, कल्पनाशील आणि आध्यात्मिकपणा खोलवर रुजलेला असतो. या लोकांच्या भावनेमुळे यांच्यात नकारात्मक ऊर्जा सहज प्रवेश करते. तसेच हे लोक वाईट नजरेचे देखील बळी पडतात. यांच्या शरीरामधील ऊर्जा कमी होते. या लोकांनी नकारात्मक ऊर्जेचा प्रभाव दूर करण्यासाठी काही उपाय केल्यास त्याचा जास्त परिणाम होतो. या लोकांनी घरामध्ये काही रोपे लावणे शुभ मानले जाते जसे की तुळस किंवा कडुलिंबाचे रोप. तसेच सकारात्मकता टिकवून ठेवण्यासाठी योगासने आणि ध्यान करणे फायदेशीर ठरते.
(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तू, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/ बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navrashtra या तथ्यांची पुष्टी करु शकत नाही)