फोटो सौजन्य- pinterest
आज रविवार, 3 ऑगस्ट रोजी फ्रेंडशिप डे आहे. ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या रविवारी फ्रेंडशिप डे साजरा केला जातो. फ्रेंडशिप डेची पहिल्यांदा सुरुवात 1958 मध्ये झाली. यावेळी फ्रेंडशिप डेचा दिवस 8 राशीच्या लोकांसाठी शुभ असणार आहे. या दिवशी हे लोक इच्छित मित्र किंवा जोडीदार शोधू शकतात. कोणत्या राशीच्या लोकांसाठी फ्रेंडशिप डेचा दिवस शुभ असणार आहे, जाणून घ्या
मेष राशीच्या लोकांसाठी फ्रेंडशिप डेचा दिवस संस्मरणीय ठरू शकतो. या लोकांना जीवनसाथी असा मिळू शकतो जो तुमचा खरा साथीदार ठरेल. येणाऱ्या काळात हा जोडीदार त्यांच्यासाठी खूप आनंद घेऊन येईल. चांगल्या आणि वाईट दोन्ही काळात तुमची साथ देईल.
सिंह राशीच्या लोकांना फ्रेंडशिप डे च्या दिवशी एक चांगला अनुभव येऊ शकतो. यावेळी तुमच्या मैत्रीचे रुपांतर प्रेमात होऊ शकते. तुम्हाला चांगला जीवनसाथी मिळू शकतो.
कन्या राशीच्या लोकांना फ्रेंडशिप डे चा दिवस नवीन आशा घेऊन येणारा असू शकतो. ज्यांना एकटेपणा जाणवतो किंवा निराशा जाणवत असते अशा लोकांना एक नवीन मित्र मिळू शकतो. हा मित्र तुमच्यासाठी खूप खास राहील.
तूळ राशीच्या लोकांना फ्रेंडशिप डे च्या दिवशी तुमच्या जवळच्या मित्रांकडून प्रेमाचे संदेश मिळू शकतात. यावेळी तुमची मैत्री प्रेमसंबंधात बदलण्याची शक्यता आहे. तुमचा काळ पूर्वीपेक्षाही अधिक अद्भुत असू शकतो.
वृश्चिक राशीच्या लोकांना फ्रेंडशिप डे चा दिवस चांगला राहील. तुम्हाला जुने मित्र भेटू शकतात. तुम्ही तुमच्या आवडत्या व्यक्तीसोबत तुमचे मन शेअर करू शकता.
धनु राशीच्या लोकांचा फ्रेंडशिप डे चा दिवस चांगला राहील. या दिवशी तुम्हाला कॉलेज किंवा शाळेतील जुने मित्र भेटू शकतात. त्यांच्यापैकी कोणीतरी खास तुमचा दिवस चांगला बनवू शकते. फ्रेंडशिप डे वर तुम्ही जुन्या आठवणी ताज्या कराल.
मकर राशीच्या लोकांसाठी आजचा फ्रेंडशिप डे चा दिवस शुभ राहील. तुमच्या मनातील भावना तुमच्या मित्रांसोबत शेअर करा. जर तुम्ही काही अडचणीत असाल तर तुम्ही तुमच्या जवळच्या मित्राची मदत घेऊ शकता.
मीन राशीच्या लोकांसाठी आजचा फ्रेंडशिप डे चा दिवस खास राहील. तुमच्या एकाकीपणापासून मुक्त होण्यासाठी मित्रांची मदत होऊ शकते. या दिवशी तुमचा एखादा नवीन मित्र बनू शकतो.
(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)