Gajakesari Raj Yoga: 12 वर्षानंतर पितृपक्षात लागणार गजकेसरी राजयोग, या राशीची लोक होणार मालामाल
यंदाचा पितृपक्षाचा काळ हा ज्योतिष आणि आध्यात्मिक दृष्टिकोनातून खूप खास मानला जातो. पंचांगानुसार, पितृपक्षाची सुरुवात 7 सप्टेंबर रोजी होत आहे आणि त्याची समाप्ती 21 सप्टेंबर रोजी होणार आहे. या 15 दिवसांच्या काळामध्ये चंद्र देव रविवार, 14 सप्टेंबर रोजी मिथुन राशीत प्रवेश करणार आहे ज्या ठिकाणी देवगुरु ग्ररु बृहस्पति आधीच उपस्थित आहे. चंद्र आणि गुरूच्या या युतीमुळे गजकेसरी राजयोग तयार होत आहे. ज्योतिषशास्त्रानुसार हा राजयोग खूप शुभ आणि शक्तिशाली मानला जातो. गजकेसरी योगाचा अर्थ असा होतो की, गज म्हणजे हत्ती आणि “केसरी” म्हणजे सिंह. ज्याला शक्ती, धैर्य आणि संपत्तीचे प्रतीक मानले जाते. हा योग व्यक्तीला अपार यश, आदर आणि आर्थिक समृद्धी देतो. हा राजयोग यावेळी 14 सप्टेंबरपासून सुरु होत आहे आणि हा शुभ प्रभाव पितृपक्षाच्या शेवटपर्यंत राहणार आहे. या काळात काही राशीच्या लोकांना खूप फायदा होणार आहे. तसेच त्यांच्या जीवनामध्ये सकारात्मक बदल होतील. कोणत्या राशीच्या लोकांना गजकेसरी योगाचा फायदा होणार आहे, जाणून घ्या.
Mahalakshmi Rajyog: शारदीय नवरात्रीला महालक्ष्मी राजयोग, या राशीच्या लोकांना लाभेल सुख समृद्धी
कोणत्या आहेत त्या राशी
वृषभ रास
गजकेसरी राजयोग वृषभ राशीच्या लोकांसाठी अधिक फायदेशीर ठरणार आहे. हा योग तुमच्या कुंडलीमध्ये दुसऱ्या घरामध्ये तयार होत आहे. यालाच धन आणि वाणीचे घर म्हटले जाते. या काळामध्ये तुम्हाला अचानक आर्थिक लाभ होऊ शकतो. जे लोक नोकरी करत आहे या काळात त्यांच्या पगारात वाढ होऊ शकते. व्यवसायात तुम्हाला अपेक्षित लाभ होईल.
कन्या रास
कन्या राशीच्या लोकांसाठी गजकेसरी राजयोग तुमच्यासाठी खूप फायदेशीर राहील. या राजयोगामुळे तुम्हाला करिअर आणि व्यवसायात अपेक्षित यश मिळेल. हा योग तुमच्या कुंडलीच्या दहाव्या घरात तयार होत असल्याने तुम्हाला अपेक्षित यश मिळेल. हा योग कर्म आणि कार्यक्षेत्र तयार करेल. तुम्ही तुमच्या कामात चांगले प्रदर्शन कराल. ज्यामुळे बॉस आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून तुमचे कौतुक होईल. नोकरी करणाऱ्या लोकांना पदोन्नतीच्या अपेक्षित संधी मिळतील. व्यापारी वर्गासाठी गजकेसरी योगाचा काळ अनुकूल राहील. तुम्हाला व्यवसायात मोठी डील किंवा ऑर्डर मिळू शकते. या काळात तुम्ही तुमचे ध्येय सहज साध्य करू शकाल.
सिंह रास
सिंह राशीच्या लोकांसाठी गजकेसरी राजयोग खूप फायदेशीर राहील. या काळात तुमच्या उत्पन्नामध्ये वाढ होईल. तुमच्या राशीच्या कुंडलीच्या 11 व्या घरामध्ये हा राजयोग तयार होत आहे. यावेळी तुमची आर्थिक स्थिती देखील सुधारेल. तसेच तुमचे उत्पन्नाचे स्त्रोत देखील वाढतील. तुम्ही केलेल्या गुंतवणुकीतून तुम्हाला चांगला फायदा मिळेल. या काळात तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होतील आणि तुम्हाला आर्थिक लाभाच्या संधी मिळू शकतात. ज्यामुळे तुमचे मन प्रसन्न राहील.
(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)