(फोटो सौजन्य: Pinterest)
ज्योतिषशास्त्रानुसार, ग्रहांची होणारी हालचाल आणि व्यक्तीच्या जीवनात होणारी शुभ आणि अशुभ परिणाम देणारे आहेत. यावेळी तुम्ही सणांमध्ये काही विशेष योग देखील तयार होत आहे त्याचा तुम्हाला फायदा होणार आहे. यावर्षी नवरात्रीची सुरुवात 22 सप्टेंबरपासून होत आहे आणि 2 ऑक्टोबर रोजी याची समाप्ती होणार आहे. ज्यावेळी चंद्र तूळ राशीमध्ये प्रवेश करेल त्या तिथे मंगळ आधीच उपस्थित आहे. या दोन्ही ग्रहांच्या युतीमुळे एक विशेष आणि शुभ योग तयार होणार आहे. हा योग काही विशेष राशींसाठी खूप शुभ असणार आहे. या काळात तुम्हाला आर्थिक लाभ होऊ शकतो. त्यासोबतच व्यवसाय आणि करिअरमध्ये तुमची प्रगती होऊ शकते. महालक्ष्मी राजयोगाचा कोणत्या राशीच्या लोकांना फायदा होणार आहे, जाणून घ्या.
तूळ रास
तूळ राशीच्या लोकांसाठी महालक्ष्मी राजयोग खूप शुभ राहणार आहे. हा योग लग्नाच्या घरात तयार होत आहे. त्याचा परिणाम तुमच्या आत्मविश्वास, व्यक्तिमत्त्व आणि विचारसरणीवर होणार आहे. या काळात तुमच्यामध्ये नवीन धैर्य आणि उत्साह तयार होईल. वैवाहिक जीवन चांगले राहील. कुटुंबातील वातावरण शांत आणि सहकार्यात्मक असेल. या काळात तुमचे आरोग्य चांगले राहील. तुम्ही शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या मजबूत राहाल. या काळात तुमची अध्यात्मिक प्रगती चांगली होईल.
मकर रास
मकर राशीच्या लोकांनी महालक्ष्मी राजयोग खूप चांगला राहील. हा योग कर्मभावात तयार होत आहे. करिअर आणि व्यवसायामध्ये तुम्हाला नवीन संधी मिळू शकतात. नोकरी करणाऱ्या लोकांना नवीन जबाबदाऱ्या मिळू शकतात, त्यासोबतच पदोन्नती आणि पगारवाढ देखील होऊ शकते. व्यावसायिकांना व्यवसायात मोठा नफा होऊ शकतो. जे लोक भागीदारीमध्ये काम करत आहेत त्यांना अपेक्षित यश मिळेल. तुम्ही सामाजिक क्षेत्रात देखील सहभागी होऊ शकतात त्यामुळे तुमचा समाजात प्रभाव वाढेल.
Chandra Grahan 2025 : चंद्रग्रहणात या राशीच्या लोकांना बाळगावी लागणार नाही भीती, उत्पन्नात होईल वाढ
कुंभ रास
महालक्ष्मी राजयोगाचा फायदा कुंभ राशीच्या लोकांना देखील होणार आहे. हा योग नवव्या घरामध्ये या राशीमध्ये होत आहे. या योगामुळे तुम्हाला नशिबाची साथ मिळेल. तुमची सर्व प्रलंबित कामे या काळात पूर्ण होतील. या काळामध्ये तुम्हाला अनपेक्षित लाभ होईल. तुम्ही धार्मिक कार्यक्रमामध्ये सहभागी होऊ शकता किंवा घरामध्ये धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करु शकता. नोकरी करणाऱ्यांना पदोन्नती मिळू शकते. नवीन प्रकल्पावर काम करण्याची संधी मिळेल. विद्यार्थ्यांसाठी हा काळ खूप चांगला राहील. परदेशात शिक्षण घेण्याची किंवा शिष्यवृत्ती मिळण्याची शक्यता आहे.
(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)