फोटो सौजन्य- istock
गुरुवार, 17 जुलै रोजी चंद्र मीन राशीतून मेष राशीत संक्रमण करत आहे. आजचा गुरुवारचा दिवस असल्याने स्वामी ग्रह गुरु राहील. गुरु मिथुन राशीत संक्रमण करत असल्याने गजकेसरी राजयोग तयार होत आहे. तसेच कर्क राशीमध्ये बुध आणि सूर्याच्या युतीमुळे बुधादित्य योग देखील तयार होत आहे. त्याचसोबत ग्रहाच्या नक्षत्राच्या युतीमध्ये बघायला गेल्यास रेवती नक्षत्राच्या युतीमुळे सर्वार्थ सिद्धी आणि सुकर्मा योग तयार होतील. गरजकेसरी राजयोगाचा फायदा कुंभ राशीच्या लोकांसह इतर काही राशीच्या लोकांना देखील होणार आहे. कोणत्या राशीच्या लोकांना फायदा होणार आहे ते जाणून घ्या
मेष राशीच्या लोकांचा आजचा दिवस अपेक्षेपेक्षा चांगला राहील. या लोकांचा आत्मविश्वास वाढलेला राहील. तसेच तुमचा समाजामध्ये प्रतिष्ठा वाढलेली राहील. आयात निर्यात करणाऱ्या लोकांना चांगला फायदा होऊ शकतो. रुग्णालये, प्रयोगशाळा, मेडिकल स्टोअर्स इत्यादी व्यवसायांशी संबंधित असलेल्या लोकांचा आजचा दिवस चांगला राहील. तुम्ही धार्मिक कार्यक्रमात सहभागी होऊ शकतात. कुटुंबामध्ये आनंदाचे वातावरण राहील.
मिथुन राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस विशेष असणार आहे. हे लोक सरकारी सेवेशी संबंधित असल्यास तुम्हाला कामामध्ये चांगले यश मिळेल. तुम्हाला सरकारी निविदा मिळू शकते. व्यवसायामध्ये पैसे कमाविण्यासाठी नवीन संधी उपलब्ध होतील. सामाजिक आणि राजकीय क्षेत्रांशी संबंधित लोकांची प्रतिष्ठा वाढेल. तुमचा आत्मविश्वास वाढलेला राहील. कुटुंबामध्ये आनंदाचे वातावरण राहील.
कन्या राशीच्या लोकांचा आजचा दिवस चांगला राहील. तुम्ही नियोजित केलेली कामे वेळेवर पूर्ण होतील. तुम्हाला तुमच्या आजूबाजूच्या लोकांकडून अपेक्षित सहकार्य मिळेल. तुम्ही तुमचे ध्येय साध्य करण्यात यशस्वी व्हाल. तुमच्या कामाच्या ठिकाणी मोठे बदल होऊ शकतात. जर तुम्ही भागीदारीमध्ये व्यवसाय करत असल्यास तुम्हाला अपेक्षित यश मिळेल. जर एखाद्या योजनेत गुंतवणूक करायचा विचार करत असल्यास त्याचा तुम्हाला फायदा होईल.
तूळ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस फायदेशीर राहणार आहे. तुमची जी कामे प्रलंबित राहिलेली आहेत ती वेळेवर पूर्ण होतील. जर तुमचे कोणत्याही ठिकाणी पैसे अडकले असतील तर ते परत मिळतील. तुम्ही तुमची नियोजित कामे पूर्ण कराल. तुमच्या कामाच्या योजना नवीन गुंतवणुकीसह जलद गतीने पूर्ण होतील. लोक तुमच्यावर विश्वास दाखवतील.
कुंभ राशीच्या लोकांचा आजचा दिवस चांगला राहील. तुम्हाला प्रत्येक कामामध्ये कुटुंबाचा पाठिंबा मिळेल. व्यवसायामध्ये तुमच्यावर तणाव राहू शकतो. कौटुंबिक व्यवसाय चालवणाऱ्यांसाठी आजचा दिवस अपेक्षेपेक्षा चांगला असू शकतो. हॉटेल, रेस्टॉरंट्स, लेखन, संशोधन आणि प्रकाशन या क्षेत्रांशी संबंधित असलेल्यांसाठी आजचा दिवस चांगला राहील.
(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)