फोटो सौजन्य- istock
बुधवार, 20 ऑगस्टचा दिवस विशेष राहील. चंद्र आणि मिथुन राशीनंतर कर्क राशीत संक्रमण करणार आहे. बुध हा दिवसाचा स्वामी ग्रह असेल. चंद्र आणि बुध यांची युती देखील शुभ मानली जाणार आहे. शुक्र, बुध आणि गुरु यांचा त्रिग्रह योग आणि गजकेसरी राजयोग, साम योग तायर होईल. तसेच पुनर्वसू नक्षत्रामध्ये सिद्धी योग तयार होईल. गजकेसरी योगामुळे वृषभ राशीसह या राशीच्या लोकांना करिअर आणि व्यवसायात भरपूर फायदे होतील. कुटुंबामध्ये आनंदाचे वातावरण राहील. जे लोक नवीन कामाचा विचार करत आहे त्यांना अपेक्षित लाभ होतील. गजकरेसरी योगाचा वृषभ राशीसह कोणत्या राशीच्या लोकांना फायदा होईल, जाणून घ्या
बुधवारचा दिवस वृषभ राशीच्या लोकांसाठी खूप चांगला राहील. यावेळी तुम्हाला आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. तुमचे उत्पन्न वाढेल. विशेष म्हणजे तुम्ही तुमची संपत्ती वाचवण्यातही यशस्वी व्हाल. तुम्हाला धाडसी निर्णयांचा फायदा होईल. संवाद, सामग्री लेखन, प्रकाशन या क्षेत्राशी संबंधित असणाऱ्या लोकांना फायदा होऊ शकतो. व्यवसायानिमित्त तुम्ही बाहेर प्रवास करु शकता. प्रवास करणे तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल. वैवाहिक जीवन आनंदी राहील.
बुधवारचा दिवस मिथुन राशीच्या लोकांसाठी खूप चांगला राहील. व्यवसायात तुमची नियोजित कामे पूर्ण होतील. यामुळे तुमचा आत्मविश्वास वाढेल. तुम्हाला तुमच्या व्यक्तिमत्त्वातही नवीनता दिसेल. तुमचे काम ताजेतवानेपणे पूर्ण करण्याचा प्रयत्न कराल. हॉटेल, रेस्टॉरंट, क्लब इत्यादी ठिकाणी काम करणाऱ्या लोकांसाठी आजचा दिवस अपेक्षेपेक्षा चांगला राहील. कुटुंबामध्ये आनंदाचे वातावरण राहील.
बुधवारचा दिवस कर्क राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस खूप खास राहील. तुम्हाला परदेशातील कामात चांगला नफा मिळण्याची शक्यता आहे. कोणतेही अडकलेली कामे आज पूर्ण होऊ शकतात. रुग्णालये, मेडिकल स्टोअर्स, लॅब इत्यादी ठिकाणी काम करणाऱ्या लोकांचा आजचा दिवस फायदेशीर राहील. तुम्ही धार्मिक कार्यात सहभागी होऊ शकतात.
कन्या राशीच्या लोकांचा आजचा दिवस चांगला राहील. सरकारी नोकरी करणाऱ्या लोकांना अपेक्षित फायदा होईल. तुमच्या कामातील अडथळे दूर होतील. सरकारी कामात तुम्हाला अपेक्षित यश मिळेल. तुमच्या जुन्या इच्छा पूर्ण होऊ शकतात, ज्यामुळे तुम्हाला आनंद होईल. नोकरी करणाऱ्यांसाठी आजचा दिवस चांगला राहील. तुमच्या कामाचे कौतुक केले जाईल. कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील.
बुधवारचा दिवस मकर राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस चांगला राहील. नवीन कामाची सुरुवात करण्यासाठी आजचा दिवस चांगला राहील. आर्थिक समस्या असतील तर त्या दूर होतील. तुमच्या सहकाऱ्यांकडून तुम्हाला पूर्ण सहकार्य मिळेल. जोडीदारासोबत चांगले संबंध राहतील. तुमच्या मुलांकडून तुम्हाला चांगली बातमी मिळू शकते.
(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)