
फोटो सौजन्य- pinterest
शनिवार, 26 जुलै रोजी शुक्र मिथुन राशीमध्ये सकाळी 9.2 वाजता प्रवेश करणार आहे तर मिथुन राशीमध्ये गुरु ग्रह आधीच उपस्थित आहे. ज्योतिषशास्त्रामध्ये शुक्र ग्रहाला प्रेम, सौंदर्य, संपत्ती, समृद्धी आणि भौतिक सुखांचा कारक मानले जाते तर गुरु ग्रहाला ज्ञान, समृद्धी, भाग्य आणि अध्यात्माचा कर्ता मानले जाते. मिथुन राशीमध्ये या दोन्ही ग्रहांच्या होत असलेल्या युतीमुळे गजलक्ष्मी राजयोग तयार होणार आहे. या योगाचा काही राशीच्या लोकांवर शुभ परिणाम होईल.
या युतीचा परिणाम 21 ऑगस्टपर्यंत राहणार आहे. यावेळी काही राशीच्या लोकांना पैसा, करिअर, प्रेम आणि कौटुंबिक जीवनात सकारात्मक बदल होताना दिसून येतील. मिथुन राशीचा स्वामी बुध आहे. ज्यावेळी शुक्र आणि गुरु एका राशीमध्ये येतात त्यावेळी संपत्ती आणि ज्ञानाच्या क्षेत्रात भर पडते. याच्या या युतीमुळे गजलक्ष्मी राजयोग तयार होतो. यादरम्यान काही राशीच्या लोकांना यश, आर्थिक लाभ मिळते तर काही राशींच्या लोकांना सावधगिरी बाळगावी लागते. कोणत्या राशीच्या लोकांसाठी ही युती फायदेशीर आहे, जाणून घ्या
मेष राशीच्या लोकांसाठी ही युती फायदेशीर असते. याचा परिणाम सामाजिक आणि व्यावसायिक क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांना नवीन उंची गाठण्यासाठी होतो. या लोकांचा आत्मविश्वास वाढलेला असतो. लेखन, माध्यम किंवा मार्केटिंगशी संबंधित लोकांना याचे अनेक फायदे होतात. नवीन गुंतवणूक करणाऱ्यांसाठी ही युती फायदेशीर ठरते. व्यवसाय करणाऱ्या लोकांना आर्थिक लाभ होऊ शकतो. तर जे लोक जुन्या आजारांपासून ग्रस्त आहेत त्यांनी सावधगिरी बाळगावी.
वृषभ राशीच्या लोकांसाठी ही युती खूप फायदेशीर मानली जाते. तुमची आर्थिक स्थिती सुधारलेली राहील. दीर्घकाळापासून अडकलेले पैसे परत मिळू शकतात. कौटुंबिक जीवनात नेहमी आनंद राहते. मालमत्ता खरेदी करण्यासाठी हा काळ चांगला आहे. नोकरी करणाऱ्या लोकांना पदोन्नती मिळू शकते. नातेसंबंधामध्ये यश मिळू शकते.
मिथुन राशीच्या लोकांसाठी ही युती शुभ राहील. तुमच्या व्यक्तिमहत्त्वामध्ये वाढ होईल. सामाजिक कार्यात प्रतिष्ठा वाढेल. करिअरमध्ये यश मिळेल. विद्यार्थ्यांना शिक्षणात यश मिळेल. व्यावसायिकांसाठी ही युती फायदेशीर राहील. व्यवसायामध्ये आर्थिक लाभ होऊ शकतो. मुलांबाबतीत असलेल्या समस्या दूर होतील. परिवारामध्ये आनंदाचे वातावरण राहील. यावेळी तुम्ही परदेशी प्रवास देखील करु शकता.
सिंह राशीच्या लोकांसाठी ही युती फायदेशीर राहील. या लोकांना आर्थिक लाभ होऊ शकतात. कामाच्या ठिकाणी यश मिळेल. नोकरीमध्ये पदोन्नतीची शक्यता आहे. व्यवसायामध्ये भागीदारीमध्ये असाल तर तुम्हाला आर्थिक फायदा होईल. गुंतवणूक करणाऱ्यांसाठी हा काळ अनुकूल आहे.
तूळ राशीच्या लोकांना या राशीच्या लोकांना अध्यात्माची साथ लाभेल. हा काळ या राशीच्या लोकांसाठी भाग्यवान असेल. दीर्घकाळापासून प्रलंबित असलेली कामे पूर्ण होऊ शकतात. शिक्षण किंवा कामानिमित्ताने आपण परदेशी प्रवास करु शकता. धार्मिक कार्यातील रस वाढेल. व्यवसायामध्ये फायदा होईल. नोकरी करणाऱ्यांना नवीन जबाबदाऱ्या मिळू शकतात. या लोकांचा आत्मविश्वास वाढलेला असेल.
मकर राशीच्या लोकांना या युतीचा अधिक फायदा होईल. कामाच्या ठिकाणी तुम्हाला सहकाऱ्यांचा पाठिंबा मिळेल. तुम्हाला आर्थिक लाभाच्या नवीन संधी मिळतील. सरकारी क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांना यश मिळेल. जे लोक जुन्या आजाराशी सामना करत आहे त्यांचे आजार दूर होतील. परिवाराचा पाठिंबा मिळेल.
(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)