फोटो सौजन्य- istock
गणेशोत्सव दोन दिवसांवर आलेला आहे. गणपती बाप्पाच्या आगमानाची तयारी सर्वत्र उत्साहात सुरु झाली आहे. सगळीकडे दीड दिवस, पाच दिवस, गौरी गणपती, 10 दिवस असे गणपती बाप्पा विराजमान होतात पण आजूनही काही ठिकाणी अडीच ते तीन दिवस गणपत्ती बाप्पा विराजमान होतात, अशी प्रथा आहे. अडीच ते तीन दिवस गणपती बाप्पा बसवण्याचे नेमकं कारण काय आहे ते जाणून घेऊया.
भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षाच्या चतुर्थीला गणेश चतुर्थी येते. यंदा गणेशोत्सवाची सुरुवात शनिवार, 7 सप्टेंबरपासून होणार आहे. 10 दिवस चालणार हा उत्सव अनंत चतुर्दशीला संपतो. गणेश उत्सवात पाच दिवस, दीड दिवस, गौरी गणपती सोबत किंवा 10 दिवसांचा गणपती बाप्पा बसवला जातो, हे आपल्या सर्वांना माहिती आहे. मात्र, अनेक जण अडीच किंवा तीन दिवसांचा गणपती बाप्पाही बसवतात. यामागे नेमके काय कारण आहे, हे अनेकांना माहिती नसेल. त्यामुळे याचे कारण आपण जाणून घेऊया.
हेदेखील वाचा- गणपतीच्या नैवेद्यात बनवा ओव्याच्या पानांपासून चविष्ट भजी, सोपी पद्धत
गणेश उत्सवात अनेकांच्या घरी गणपती बाप्पा विराजमान होतात. यामध्ये परंपरेनुसार बाप्पा किती दिवस ठेवायचा, हे ठरवलं जातं. जे चाकरमानी मुंबईतून गावी गणपतीसाठी येतात किंवा ज्यांना कामामुळे वेळ अधिक मिळत नाही, असे सगळे लोकं दीड दिवसांचा गणपती बाप्पा बसवतात.
कोकणात काही लोकांकडे अडीच किंवा तीन दिवसांचा बाप्पा बसवला जातो, परंतु यामागे कोणतेही शास्त्रीय कारण नाही. ज्यांना 5 दिवसांचा बाप्पा काही कारणास्तव बसवता येत नाही, मग त्यात आर्थिक कारणसुद्धा असू शकते, असे काही लोकं अडीच किंवा तीन दिवसांचा गणपती बाप्पा बसवतात. पूर्वजांनी कधीतरी ही परंपरा सुरू केली असल्याने काहींकडे अजूनही बाप्पाचे अडीच किंवा तीन दिवसांनंतर विसर्जन केले जाते.
हेदेखील वाचा- गणेश चतुर्थीच्या दिवशी हरिद्र गणेश कवच पठण केल्याने होतील अनेक फायदे
काही ठिकाणी कुळाचार पद्धती किंवा परंपरा यामुळेच अनेकांकडे अजुनही गणपती 3 दिवसांचा असतो. याला कोणतेही शास्त्रीय कारण नसल्याचे गुरुजींनी सांगितले. दरम्यान, सध्या सर्वत्र गणेशोत्सवाचे वेध लागले आहे. सर्वजण आपल्या लाडक्या गणरायाची आतुरतेने वाट पाहत आहे. बाजारातही मोठा उत्साह पाहायला मिळत आहे. खरेदीसाठी लोकांची मोठी गर्दी होत आहे.
मंत्र
आवाहन न जानामी न जानामी विसर्जनम ।
हा ऐकलेला मंत्र असेल तर यातच आवाहन करून पूजा करायची आणि त्यानंतर तिचे विसर्जन करायचे हीच पूजा पद्धती मानली जाते.