फोटो सौजन्य- pinterest
रविवार, 20 जुलै रोजी केतू आपले संक्रमण पूर्वाफाल्गुनी नक्षत्रात करत आहे. ज्योतिषशास्त्रामध्ये केतू आणि शुक्र यांचे मैत्रीपूर्ण संबंध आहे. केतूच्या संक्रमणाचा परिणाम वृषभ, मिथुनसह या राशीच्या लोकांसाठी खूप फायदेशीर असणार आहे.
केतू पूर्वाफाल्गुनी नक्षत्रामध्ये संक्रमण करणार आहे. यावेळी पूर्वाफाल्गुनी नक्षत्राच्या चौथ्या टप्प्यामध्ये असल्याने रविवार, 20 जुलै रोजी संध्याकाळी 5.12 वाजता संक्रमण करणार आहे. केतू ग्रह या नक्षत्रामध्ये 25 जानेवारीपर्यंत असणार आहे. पूर्वाफाल्गुनी नक्षत्राचा स्वामी शुक्र आहे. ज्योतिषशास्त्राच्या म्हणण्यानुसार शुक्र आणि केतू ग्रह यांचे मैत्रीपूर्ण संबंध आहे. अशावेळी केतूच्या या संक्रमणामुळे काही राशीच्या लोकांना त्याचा सकारात्मक लाभ होणार आहे. कोणत्या आहेत त्या भाग्यवान राशी, जाणून घ्या
वृषभ राशीमध्ये केतुचे होणारे संक्रमण शुभ मानले जाते. या संक्रमणामुळे वडिलोपार्जित मालमत्तेत लाभा मिळू शकतो. घरातील एखाद्या व्यक्तीला आरोग्याच्या समस्या असल्यास त्या दूर होतील. याचवेळी तुम्हाला आर्थिक लाभ देखील होऊ शकतो. नोकरी करणाऱ्या लोकांची कामाच्या ठिकाणी प्रशंसा केली जाईल. तसेच तुमच्या पगारवाढ देखील होऊ शकते. व्यावसायिकांसाठी हा दिवस फायदेशीर असू शकतो.
मिथुन राशीच्या लोकांसाठी हे संक्रमण भाग्याचे असणार आहे. यावेळी तुमचे शौर्य आणि धैर्य वाढेल. केतुच्या संक्रमणामुळे या लोकांना विलासीता देखील मिळेल. आर्थिक लाभासोबत तुम्हाला अनेक फायदे होतील. ज्या लोकांना गुडघ्यांशी संबंधित समस्या असल्यास त्या दूर होतील. नोकरी करणाऱ्या लोकांना त्यांच्या मेहनतीचे फळ मिळेल. तुमचे नाते मजबूत राहील. तुम्ही तीर्थयात्रेला देखील जाऊ शकतात.
वृश्चिक राशीच्या लोकांसाठी केतूचे संक्रमण सामान्य राहील. विवाहितांसाठी हा काळ खूप शुभ मानला जातो. जोडीदारासोबतचे तुमचे संबंध चांगले राहतील. या लोकांना करिअरमध्ये यश मिळेल. जे लोक नोकरी बदलण्याचा विचार करत आहे त्या लोकांना यश मिळेल. व्यावसायिक भागीदारीमध्ये काम करत असतील त्यांच्यासाठी हा काळ फायदेशीर आहे. या लोकांची समाजामधील प्रतिष्ठा वाढलेली असेल.
कुंभ राशीच्या लोकांसाठी केतूचे संक्रमण शुभ राहणार आहे. या संक्रमणाचा कुंभ राशीच्या लोकांना खूप फायदा होणार आहे. यावेळी तुमच्या परिवारामध्ये आनंदाचे वातावरण राहील. विद्यार्थ्यांसाठी हा काळ अनुकूल आहे. या लोकांच्या उत्पन्नात वाढ होईल. तुम्ही करत असलेल्या कामातून तुम्हाला समाधान मिळेल. व्यापारी वर्गातील लोक नवीन कामाची सुरुवात करु शकतात. तुमच्या नात्यांमध्ये गोडवा राहील.
(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)