फोटो सौजन्य- pinterest
सर्व ग्रह वेळोवेळी आपली राशी बदलून त्याचे शुभ अशुभ परिणाम देतात. त्याचा परिणाम म्हणजे काही राशीच्या लोकांची कामे पूर्ण होतात तर काहीची अपूर्ण राहतात. या योगांचा विशेष प्रभाव वैयक्तिक जीवनावर तसेच कामकाजावर दिसून येतो. यामधीलच एक आहे ग्रहण योग. जे राहू आणि चंद्राच्या युतीने तयार होते. ज्योतिषशास्त्रात ग्रहण योगाला अशुभ मानले जाते. त्यामुळे व्यक्तीला आरोग्याच्या समस्या, नोकरीमध्ये समस्या आणि नात्यामध्ये समस्या येऊ शकते. आता सप्टेंबर महिन्याच्या सुरुवातीलाच काही योग तयार होत आहे. ते मकर राशीमध्ये आपले संक्रमण थांबवून आता कुंभ राशीमध्ये प्रवेश करणार आहे. या राशीमध्ये आधीपासूनच राहू उपस्थित आहे. अशावेळी राहू आणि चंद्राची युती होत असल्याने काही राशीच्या लोकांच्या समस्या वाढू शकतात तर काहींना काम पूर्ण करण्यामध्ये अडचणी येऊ शकतात. जाणून घेऊया कोणत्या राशीच्या लोकांना समस्यांचा सामना करावा लागणार आहे.
सिंह राशीच्या लोकांना समस्यांना तोंड द्यावे लागू शकते. तुम्हाला या कालावधीमध्ये सावधगिरी बाळगावी लागेल. प्रवास करताना खर्च अधिक होऊ शकतो त्यामुळे तुमची चिडचिड होऊ शकते. कामाच्या ठिकाणी तुम्हाला विरोधकांचा सामना करावा लागू शकतो. यावेळी कोणतीही गुंतवणूक करताना विचारपूर्वक निर्णय घ्यावे. महत्त्वाच्या कामात कोणत्याही प्रकारचा निष्काळजीपणा करणे टाळा. नातेसंबंधांमध्ये सततच्या समस्यांमुळे ताण वाढू शकतो.
ग्रहण योगाच्या प्रभावामुळे तूळ राशीच्या लोकांच्या समस्या वाढू शकतात. कोणाच्याही प्रभावाखाली येऊ नका आणि जवळच्या व्यक्तीच्या फायद्यासाठी दूरचे नुकसान करू नका. आरोग्याच्या समस्येमध्ये वाढ होऊ शकते. या काळात जे विद्यार्थी परीक्षेची तयारी करत आहे त्यांना अधिक मेहनत घ्यावी लागेल. तुम्हाला व्यवसायात मंदीचा सामना करावा लागू शकतो. दरम्यान गोष्टींबाबत धीर धरणे फायदेशीर ठरू शकते.
या काळामध्ये मीन राशीच्या लोकांना समस्येचा सामना करावा लागू शकतो. यावेळी भावंडांच्या सहवासात घट होईल. काम पूर्ण न झाल्यामुळे तुम्ही त्रस्त राहाल. कामाच्या ठिकाणी कोणत्याही गोष्टी इतरांना सांगू नका अन्यथा विरोधक त्याचा फायदा उठवतील. प्रेम संबंधात असलेले गैरसमज दूर करा. नोकरीमध्ये अपेक्षित यश मिळण्यासाठी आजून मेहनत घ्यावी लागेल. कायदेशीर बाबीमध्ये घाई केल्यास तुम्हाला समस्यांना तोंड द्यावे लागू शकते. आत्मविश्वास कमी होऊ शकतो.
(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)