फोटो सौजन्य- pinterest
आपला दिवस कसाही असो, रात्री झोपताना त्याचा थकवा आणि परिणाम आपल्या शरीरावर आणि मनावर स्पष्टपणे दिसून येतो. जर तुम्हाला शांत झोप आणि गाढ असेल तर तुम्हाला दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यावर ताजेतवाने आणि उर्जेने भरलेले वाटेल. जर तुमची झोप होत नसेल किंवा काम करायचे नसते त्यावेळी जीवनामधील नकारात्मकता वाढू शकते. म्हणून घरातील वरिष्ठ मंडळी आपल्याला नेहमी काय करावे काय करु नये याबद्दल सल्ला देत असतात. याचा संबंध फक्त परंपरा, धार्मिकतेशी नसून त्यामागे वैज्ञानिक कारण देखील आहे. रात्री झोपण्यापूर्वी कोणत्या गोष्टी कराव्यात, जाणून घ्या
जेवणानंतर तोंड स्वच्छ न करता झोपायला गेलात तर तोंडात बॅक्टेरिया वाढू लागतात. यामुळे दात आणि हिरड्यांच्या समस्या वाढू शकतात. तसेच, घरामध्य असेच राहणे अशुभ मानले जाते.
दिवसभर धावपळ सुरू असते त्यामुळे आपल्या हातपायांवर धूळ साचते. झोपण्यापूर्वी हातपाय धुण्याने शरीर हलके तर होतेच, पण थकवाही दूर होतो. या सवयीमुळे झोप देखील चांगली लागते.
आयुर्वेदाच्या म्हणण्यानुसार, डाव्या कुशीवर झोपल्याने पचनक्रिया सुधारते आणि शरीराला आराम मिळतो. या सवयीमुळे गॅस, बद्धकोष्ठता यासारख्या समस्या कमी होतात आणि आरामदायी झोप येते.
शास्त्रांनुसार, दाराकडे पाय ठेवून झोपणे अशुभ मानले जाते. यामुळे केवळ वास्तुदोष निर्माण होत नाही तर नकारात्मक ऊर्जा देखील आकर्षित होते.
कापूर हे पवित्रता आणि सकारात्मक उर्जेचे प्रतीक मानले जाते. झोपण्यापूर्वी कापूर जाळल्याने घरातील नकारात्मक ऊर्जा निघून जाते आणि वातावरणात शांती पसरते.
रात्री झोपण्यापूर्वी तुमच्या आवडत्या देवतेचे ध्यान केल्याने मन शांत होते आणि आत्मविश्वास वाढतो. ही सवय मनाला सकारात्मक विचारांनी झोपायला घेऊन जाते.
हिरवी वेलची खाल्ल्याने पचनक्रिया चांगली राहते आणि झोप चांगली लागते. त्याचा परिणाम म्हणजे मनाला आणि शरीराला आराम मिळतो.
रात्री झोपण्यापूर्वी उशीखाली मोरपंख आणि एक रुपयाचे नाणे ठेवल्याने नकारात्मकता दूर होते असे प्राचीन काळापासून मानले जाते. असे मानले जाते की यामुळे घरात सुख, समृद्धी आणि सौभाग्य येते.
ज्यांना भीती किंवा वाईट स्वप्नांचा त्रास आहे त्यांच्यासाठी हा उपाय खूप प्रभावी मानला जातो. उशीजवळ किंवा डोक्याजवळ हनुमान चालीसा ठेवून झोपल्याने वाईट शक्तींचा प्रभाव कमी होतो आणि गाढ झोप येण्यास मदत होते.
(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)