फोटो सौजन्य- pinterest
26 जूनपासून गुप्त नवरात्रीची सुरुवात झालेली आहे. उद्या शनिवार, 28 जून रोजी आषाढ गुप्त नवरात्रीचा तिसरा दिवस आहे या दिवशी देवी चंद्रघंटाची पूजा करण्याची प्रथा आहे. जाणून घ्या पूजा पद्धत
आषाढ महिन्यात गुप्त नवरात्र साजरी केली जाते. यावेळी 26 जूनपासून आषाढ गुप्त नवरात्र सुरु झाली आहे. आषाढ गुप्त नवरात्रीच्या तिसऱ्या दिवशी चंद्रघंटा देवीची पूजा केली जाते. चंद्रघंटा देवीच्या या रुपाला महिषासुरमर्दिनी या नावाने देखील ओळखले जाते.
असे म्हटले जाते की, महिषासुराच्या दहशतीपासून लोकांना सोडवण्यासाठी चंद्रघंटा देवी प्रकट झाली होती. कथेमध्ये उल्लेख केल्याप्रमाणे देवी दुर्गेने चंद्रघंटा रूप धारण केले. तिने महिषासुराचा वध करून देवांचे रक्षण केले. ती तिच्या भक्तांचे रक्षण करते आणि त्यांना संरक्षण देते. असे म्हटले जाते की, महिषासुराचा वध करण्यासाठी भगवान शंकरांनी त्यांचे त्रिशूळ देवीला दिले तर भगवान विष्णूने त्यांचे चक्र दिले. यानंतर, सर्व देवी-देवतांनीही त्यांचे शस्त्र देवीला दिले होते.
मान्यतेनुसार, देवी चंद्रघंटेची पूजा केल्याने भक्तांमधील अध्यात्मिक शक्ती, धैर्य आणि त्यांच्यामधील आत्मविश्वास वाढतो. यामुळे भक्ताला सुख, समृद्धी आणि शांती लाभते. तसेच प्रत्येक क्षेत्रात यश मिळते आणि सामाजिक क्षेत्रामध्ये मान सन्मान प्रतिष्ठा देखील वाढते.
देवीच्या कपाळावर घंटेच्या आकाराचा चंद्र आहे म्हणून तिला चंद्रघंटा देवी असे म्हटले जाते. तिच्या एका हातात त्रिशूळ, तर एका हातात गदा, एका हातात तलवार, एका हातात कमळाचे फूल आणि एका हातात वार मुद्रेचा समावेश आहे.
सकाळी लवकर उठून तुमची दैनंदिन कामे आवरल्यानंतर देवीची फोटो किंवा चित्र एका पाठावर ठेवा. फोटो किंवा चित्र नसल्यास मूर्ती ठेवली तरी चालेल. त्यानंतर देवीला कुंकू, तांदूळ, धूप, दिवा आणि नैवेद्य इत्यादी गोष्टी अर्पण करा. देवीचे आवडते असलेले लाल आणि पिवळ्या रंगांचे झेंडूचे फूल देवीला अर्पण करा.
त्यानंतर देवीला नैवेद्य दाखवताना केशर आणि दुधापासून बनवलेली खीर याचा नैवेद्य तुम्ही दाखवू शकता. नंतर देवीच्या मंत्रांचा जप करा. आरती करुन पूजेची सांगता करा.
ओम देवी चंद्रघंटाय नमः”
“पिंडजप्रवरारुधा चंडकोपस्त्रकैरियुता। प्रसादम् तनुते मह्यम् चंद्रघन्तेति विश्रुता।”
“यं देवी सर्वभूतेषु मां चंद्रघण्टा रूपेण संस्था । नमस्तेस्यै, नमस्तेस्यै, नमस्तेस्यै, नमो नमः।
(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)