फोटो सौजन्य- pinterest
रविवार, 29 जून रोजी चंद्र सिंह राशीत प्रवेश करत असल्याने ग्रहण योग तयार होण्याची शक्यता निर्माण होत आहे. केतू आधीच सिंह राशीत असल्याने चंद्राच्या प्रवेशामुळे प्रतिकूल योग तयार होत आहे. अशा वेळी या राशीमध्ये मंगळ देखील आहे यामुळे हा योग अतिशय मजबूत होऊ शकतो. तसेच शनि मीन राशीत असल्यामुळे चंद्र आणि केतू षडाष्टक योग देखील तयार होईल. तसेच रविवार, 29 जून रोजी पुष्य योग तयार होत आहे. ग्रहण योगामुळे मेष आणि कर्क राशीसह इतर राशीच्या लोकांच्या जीवनात समस्या येऊ शकतात आणि व्यवसायामध्ये देखील नुकसान होऊ शकते. ग्रहण योगामुळे कोणत्या राशीच्या लोकांना नुकसानाला सामोरे जावे लागू शकते, जाणून घ्या
मेष राशीच्या लोकांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागू शकते. या लोकांवर मानसिक ताण येऊ शकतो. तसेच जोडीदाराशी मतभेद होऊ शकतात. आरोग्यात चढ-उतार येऊ शकतो. तुम्हाला काही अडथळ्यांना तोंड द्यावे लागू शकते.
कर्क राशीच्या लोकांना मानसिक गोंधळाचा सामना करावा लागू शकतो. या लोकांना कामाच्या ठिकाणी कोणतेही निर्णय घेताना काळजी घ्यावी लागू शकते. चुकीचे निर्णय घेतल्यास नुकसान होऊ शकते. या लोकांचे अनावश्यक खर्च वाढू शकतात. ज्यामुळे तुमच्यावर मानसिक ताण येऊ शकतो. जर एखाद्या व्यक्तीला कोणताही जुना आजार असल्यास तुमचा त्रास वाढू शकतो.
सिंह राशीच्या लोकांच्या मनामध्ये गोंधळ निर्माण होऊ शकतो. तुम्हाला आरोग्याच्या समस्येकडे लक्ष द्यावे लागेल. कोणतेही काम करताना विचारपूर्वक करा. परिवारामध्ये कोणत्यातरी गोष्टींवरुन तणाव असू शकतो. जोडीदारासोबत मतभेद होण्याची शक्यता. शेअर बाजारात गुंतवणूक करताना विचारपूर्वक करा अन्यथा नुकसान होऊ शकते.
शनिसोबत षडाष्टक योग तयार होत असल्याने मकर राशीच्या लोकांना व्यवसायात नुकसान होऊ शकते यामुळे तुमचा तणाव देखील वाढू शकतो. कामाच्या ठिकाणी तणावाचे वातावरण राहू शकते. तुमचे मन अस्वस्थ राहू शकते. कोणतेही काम करताना काळजीपूर्वक करा.
शनि मंगळ आणि चंद्रासोबत षडाष्टक योग तयार करत आहे. यामुळे काही राशीच्या लोकांच्या नात्यामध्ये तणाव निर्माण होऊ शकतो. या योगाचा परिणाम तुमच्या आर्थिक स्थितीवर देखील होऊ शकतो. तुम्हाला आर्थिक अडचण जाणवू शकते. कामामध्ये तुम्हाला आर्थिक अडथळे आणि समस्या येऊ शकतात. तुमच्या खर्चामध्ये वाढ होऊ शकते.
(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)