फोटो सौजन्य- pinterest
प्रत्येक व्यक्तीमधील विचार करण्याची आणि समजण्याची क्षमता ही सारखी नसते. हा फरक त्यांच्यामधील स्वभाव आणि व्यक्तिमत्वाशी संबंधित असतो. ज्योतिषशास्त्राच्या म्हणण्यानुसार, एखाद्या व्यक्तीचा स्वभाव, सवय आणि जीवनशैली जाणून घेता येते. यामध्ये व्यक्तीची जन्मतारीख, ग्रहांची स्थिती यावरुन त्यांचे भविष्य ठरविता येते.
जसे राशी आपल्या स्वभावावर परिणाम करतात त्याप्रमाणे आपल्या जन्माचा महिना आपल्या सवयींवर अवलंबून असतो. उदाहरण घ्यायचे झाल्यास ऑक्टोबर महिन्यामध्ये जन्मलेले लोक छंदाचे शौकीन असतात आणि हे लोक जास्त खर्चिक असतात. या लोकांना विलासी जीवनशैली आवडते. ते त्यांच्या जीवनशैलीमध्ये आराम आणि प्रतिष्ठेसाठी मुक्तपणे खर्च करतात. जाणून घ्या कोणत्या महिन्यात जन्मलेले लोक जास्त खर्चित असतात.
ज्योतिषशास्त्रानुसार ऑक्टोबर महिन्यामध्ये जन्मलेले लोक खूप भावनिक आणि संवेदनशील असतात. या लोकांच्या स्वभावानुसार ते त्यांच्या भावना हृद्यामध्ये ठेवतात कधीही व्यक्त करत नाही. मात्र जेव्हा ते भावनांमध्ये वाहून जातात तेव्हा ते स्वतःवर नियंत्रण ठेवू शकत नाहीत. परंतु ते मनापासून एखाद्याशी जोडल्यास ते त्या व्यक्तीसाठी प्रत्येक मर्यादा ओलांडण्यास तयार असतात. बहुतेक वेळा लोक त्यांच्या भावनेचा फायदा उचलतात.
असे म्हटले जाते की, हे लोक स्वभावाने खर्चिक असतात. ऑक्टोबरमध्ये जन्मलेल्या व्यक्तीला एखादी गोष्ट आवडत असेल तर ती खरेदी करण्यापूर्वी तो जास्त विचार करत नाही. बऱ्याचदा ते आपल्या भावनांमुळे पैसे खर्च करतात. या लोकांची आर्थिक स्थिती स्थिर असते. मात्र हे लोक जितके कमावतात तितके खर्च करण्यात पुढे असतात. त्यामुळे या लोकांची कोणत्याही प्रकारची बचत होत नाही.
या लोकांचा स्वभाव खूप रोमॅटिक असतो. हे लोक जेव्हा एखाद्या व्यक्तीवर प्रेम करतात तेव्हा ते पूर्ण प्रामाणिकपणा आणि समर्पणाने करतात. हे लोक आपल्या जोडीदाराच्या अगदी लहानसहान गोष्टींचीही काळजी घेतात. त्यांना आनंदी ठेवण्यासाठी जमेल ते करण्यास हे लोक पुढे असतात.
या लोकांची प्रामाणिकपणा ही खरी ओळख मानली जाते. ऑक्टोबरमध्ये जन्मलेले लोक खरे बोलतात अर्थात त्यांचा स्वभाव प्रामाणिक असतो आणि ही लोक इतरांकडूनही तशीच अपेक्षा करतात. त्यांना खोटेपणा अजिबात आवडत नाही. त्यांना कोणीही फसवले तर आवडत नाही. जी व्यक्ती त्यांची फसवणूक करते त्या व्यक्तींना ते कधीही माप करत नाही.
(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)