फोटो सौजन्य- pinterest
ज्योतिषशास्त्रामध्ये एखादा ग्रह जेव्हा तारुण्य अवस्थेत येतो त्यावेळी त्याचा परिणाम सर्व राशीच्या लोकांवर स्पष्टपणे दिसून येतो. ज्यावेळी मिथुन राशीतून प्रवास करत असल्यास त्याचा प्रभाव सर्व राशीच्या लोकांवर पडताना दिसून येतो. गुरु ग्रहाची स्थिती ही शुभ असल्याचे म्हटले जाते. यामुळे शिक्षण, कुटुंब आणि व्यवसाय या सर्वांवर त्याचा चांगला परिणाम घडताना दिसून येतो.
असे म्हटले जाते की, काही राशींच्या लोकांवर गुरुचा विशेष आशीर्वाद राहतो. यामुळे या लोकांना अचानक आर्थिक लाभ, कामात यश, नशिबाचा साथ यांसारख्या गोष्टींमध्ये यश मिळते. ज्या लोकांना बऱ्याच काळापासून समस्या किंवा काही कामामध्ये अडथळे येत आहे अशा लोकांची आता त्यातून सुटका होऊ शकते. त्याचप्रमाणे जे लोक कठोर मेहनत घेत आलेले आहेत त्यांना यश मिळू शकते. कोणत्या राशीच्या लोकांना करिअर आणि व्यवसायात प्रगती होऊ शकते, जाणून घ्या
मिथुन राशीच्या लोकांना गुरु ग्रहाच्या हालचालीचा हा काळ खूप शुभ राहील. या राशीमध्ये सातव्या आणि दहाव्या घराचा स्वामी गुरू आहे, तर शनि दहाव्या घरात आहे. यामुळे या राशीच्या लोकांचे वैवाहिक जीवन आनंदी राहील. तसेच अविवाहित लोकांना लग्नाचे प्रस्ताव येऊ शकतात. त्याचसोबत या लोकांची समाजामध्ये पद आणि प्रतिष्ठा वाढलेली राहील. उच्च पदावर असलेल्या लोकांशी तुमचे संबंध दृध होतील.
सिंह राशीच्या लोकांसाठी ग्रहांची ही हालचाल खूप फायदेशीर राहील. या हालचालींचा परिणाम म्हणजे ज्या घरामध्ये गुरु ग्रह आहे त्याच ठिकाणी सूर्य देव देखील स्थित आहे. गुरु ग्रह पाचव्या आणि आठव्या घराचा स्वामी देखील आहे. अशा वेळी या लोकांना अपत्यप्राप्तीची शक्यता निर्माण होते तर जे विद्यार्थी स्पर्धा परीक्षेची तयारी करत आहे त्यांना यश मिळू शकते. तसेच या लोकांचे वैवाहिक जीवन आनंदी राहील. शेअर बाजार, सट्टेबाजी किंवा लॉटरीमध्ये नफा मिळण्याची शक्यता आहे.
गुरु ग्रहाची हालचाल कन्या राशीच्या लोकांसाठी शुभ राहील. या लोकांना करिअर आणि व्यवसायामध्ये अनेक प्रगतीच्या संधी उपलब्ध होतील. तुमच्या राशीपासून गुरू कर्मभावात स्थित आहे आणि तुमच्या कुंडलीतील चौथ्या आणि सातव्या घराचा स्वामी देखील आहे. त्याचसोबत तुम्हाला भौतिक सुख सुविधा मिळतील. हे लोक जमीन, मालमत्ता किंवा वाहन इत्यादी गोष्टींची खरेदी करु शकता. जे लोक बेरोजगार आहेत अशा लोकांना रोजगार मिळू शकतो. तर व्यावसायिकांना चांगला नफा मिळेल. आर्थिक समृद्धी आणि प्रगतीसाठी हा काळ खूप चांगला आहे.
(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)