फोटो सौजन्य- pinterest
गुरुवार 10 जुलै रोजी चंद्राचे संक्रमण धनु राशीमध्ये होणार आहे. आजचा गुरुवारचा दिवस असल्यामुळे सर्व लोकांवर गुरुचा प्रभाव राहील. गुरु आणि सूर्याच्या युतीमुळे गुरु आदित्य योग तयार होत आहे. ज्यावेळी गुरु आणि शुक्र द्विद्वादश योग तयार करत आहे. यावेळी शुक्र मालव्य राज्य योग तयार होणार आहे. त्यासोबतच आज सूर्याच्या पुढे आणि पाठीमागे शुभ ग्रह असल्याने उभयचारी योग तयार होईल. त्यासोबतच पूर्वाषाढात नक्षत्रात इंद्रिय योग तयार होईल. आज गुरुपौर्णिमा असल्याने आजचा दिवस विशेष असणार आहे. त्यामुळे या राशींच्या लोकांना व्यवसायामध्ये लाभ होईल. आज कोणत्या राशींना फायदा होणार आहे ते जाणून घेऊया
वृषभ राशींच्या लोकांसाठी आजचा दिवस खुप फायदेशीर राहील. तुम्हाला करिअरमध्ये मोठे बदलताना दिसून येतील. नोकरी करणाऱ्या लोकांना नंबर लिहावी असल्यास बदली होईल. आरोग्याच्या दृष्टीने आजचा दिवस अनुकूल राहील. परिवारामध्ये सुख समृद्धीचे वातावरण राहील.
मिथुन राशीच्या लोकांचा आजचा दिवस चांगला राहील. तुम्हाला व्यवसायामध्ये सोबत असणार्याची साथ मिळेल. वादविवाद घालणे टाळा. कामाच्या ठिकाणी वरिष्ठांचे मार्गदर्शन मिळेल. तुमच्यातील आत्मविश्वास वाढलेला राहील. तुम्हाला एखाद्या योजनेत गुंतवणूक करायची असल्यास आजचा दिवस चांगला राहील. या लोकांचा आत्मविश्वास वाढलेला राहील.
कर्क राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस चांगला आहे. व्यवसायात तुम्हाला कठोरपणे मेहनत घ्यावी लागेल. तुम्ही घेतलेले मेहनत यशस्वी व्हाल. तुमचा आजचा दिवस अनुकूल राहील. तुम्ही व्यवसायामध्ये नवीन योजना आखू शकता. तुम्ही जवळच्या व्यक्तीवर अधिक विश्वास ठेवू नका. मालमत्तेच्या वादातही घेतलेले निर्णय तुमच्या बाजूने लागेल. तुमच्या कुटुंबात उत्साहाचे वातावरण राहील.
तूळ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस चांगला राहील. या लोकांचा आत्मविश्वास वाढलेला राहील. कोणत्याही प्रकारची निष्काळजीपणा करणार नाही आणि सहन करणार नाही. तुमच्या वक्तृत्वाने उच्च पदांवर असलेल्या लोकांना प्रभावित करू शकाल. संशोधन, लेखन, प्रकाशन, मीडिया, चित्रपट या क्षेत्रांमध्ये चांगला नफा मिळू शकेल.
धनु राशीच्या लोकांचा आजचा दिवस फायदेशीर राहील. व्यवसाय करणाऱ्या लोकांसाठी उद्याचा दिवस अनुकूल राहणार आहे. सामाजिक आणि राजकीय क्षेत्रांशी संबंधित लोकांसाठी आजचा दिवस चांगला राहील. कुटुंबामध्ये आनंदाचे वातावरण राहील. वैवाहिक जीवन आनंदी राहील.
(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)