फोटो सौजन्य- pinterest
हिंदू धर्मातील एक अतिशय पवित्र असा सण म्हणजे गुरुपौर्णिमा. दरवर्षी हा सण आषाढ महिन्यातील शुक्ल पक्षाच्या पौर्णिमेला साजरा केला जातो. त्यामुळे यंदा हा सण आज 10 जुलै रोजी साजरा केला जाणार आहे. या दिवसाला आषाढी पौर्णिमा किंवा व्यास पौर्णिमा या नावांनी देखील ओळखले जाते. हा दिवस गुरुंच्याप्रती आदर, कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी हा दिवस मानला जातो. पौर्णिमेच्या दिवशी महर्षी वेद व्यासांचा जन्म झाला असल्याचे म्हटले जाते म्हणून गुरुपौर्णिमा हा दिवस साजरा केला जातो.
गुरुपौर्णिमेला केवळ धार्मिकच नाही तर अध्यात्मिक आणि सांस्कृतिकदृष्ट्या देखील खूप महत्त्व आहे. हा दिवस शिष्य आणि गुरु यांच्या नात्यामधील सन्मानाचे प्रतीक मानले जाते. या दिवशी आध्यात्मिक, शैक्षणिक किंवा जीवन-तत्वज्ञान मार्गदर्शकांचे कृतज्ञता व्यक्त केली जाते. तसेच आध्यात्मिक शुद्धीकरण, दान, ध्यान इत्यादी साधनेसाठी हा दिवस शुभ मानला जातो. या दिवशी गुरुंचे आशीर्वाद मिळविण्यासाठी हा दिवस विशेष मानला जातो.
गुरुपौर्णिमेच्या दिवशी घरामध्ये भगवद्गीता आणणे शुभ मानले जाते. भगवद्गीता ही भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला दिलेला ज्ञानाचा अमूल्य स्रोत असल्याने यामुळे जीवनामधील प्रत्येक संकट आणि समस्येचे निराकरण केले जाते. तसेच नियमित भगवद्गीता वाचल्यास मानसिक ताण कमी होऊन मनाला शांती मिळण्यास मदत होते. त्याचसोबतच जीवनामधील सकारात्मकता आणि संयम वाढण्यास मदत होते. या सर्वांमुळे व्यक्तीला त्यांचे असलेले ध्येय साध्य करण्यास मदत होते. त्याचप्रमाणे गुरुपौर्णिमेला भगद्वतगीतेचे पठण केल्याने व्यक्तीच्या जीवनात कायम आनंद आणि सुख समृद्धी राहते.
श्री यंत्र हे एक शक्तिशाली असे ज्योतिषीय उपकरण आहे. या यंत्रामध्ये देवी लक्ष्मीचा वास असल्याचे म्हटले जाते. हे यंत्र गुरुपौर्णिमेच्या दिवशी घरी आणणे खूप शुभ मानले जाते. घरामध्ये हे यंत्र आणल्याने संपत्तीमध्ये वाढ होऊन आर्थिक समस्या दूर होतात. घरामध्ये असलेली नकारात्मक ऊर्जा दूर करुन सकारात्मक ऊर्जा आणण्यास हे यंत्र मदत करते. देवी लक्ष्मीच्या आशीर्वादामुळे परिवारामध्ये सुख, समृद्धी आणि शांती कायम टिकून राहते. गुरुपौर्णिमेला देव्हाऱ्यात श्रीयंत्र ठेवून त्याची पूजा करणे शुभ मानले जाते.
लाफिंग बुद्ध सुख, समृद्धी आणि शुभतेचे प्रतीक मानले जाते. लाफिंग बुद्ध गुरुपौर्णिमेच्या दिवशी घरात आणणे खूप फायदेशीर मानले जाते. लाफिंग बुद्ध हसत असलेली मूर्ती घरात आणणे योग्य मानले जाते त्यामुळे घरामध्ये कायम सकारात्मक वातावरण राहते आणि नकारात्मक ऊर्जा दूर होते. त्यासोबत कुटुंबामध्ये आनंदाचे वातावरण राहते. तसेच व्यक्तीच्या जीवनात आर्थिक वाढ होते. समाजामध्ये या लोकांची सामाजिक प्रतिष्ठा वाढते. घरामध्ये लाफिंग बुद्धांची मूर्ती ठेवल्याने घरातील वातावरण आनंदी राहते त्याबरोबर मानसिक ताण देखील कमी होतो. लाफिंग बुद्धाची पूजा करुन घरात ठेवल्याने जीवनात आनंद आणि समृद्धी येते.
(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)