Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Gold Rate |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Guru Gochar: गुरुच्या स्व नक्षत्र संक्रमणामुळे या राशीच्या लोकांची होणार भरभराट

२० एप्रिल रोजी संध्याकाळी 4.43 वाजता गुरू ग्रह पुनर्वसू नक्षत्रात प्रवेश करणार आहेत. हे संक्रमण विशेष मानले जाते, कारण हे गुरूचे स्व-नक्षत्र आहे. हे संक्रमण काही राशींच्या लोकांसाठी फायदेशीर राहणार आहे.

  • By प्राजक्ता प्रधान
Updated On: Apr 01, 2026 | 10:00 AM
फोटो सौजन्य- pinterest

फोटो सौजन्य- pinterest

Follow Us
Close
Follow Us:
  • गुरू ग्रह करणार स्व नक्षत्रात संक्रमण
  • २० एप्रिल रोजी पुनर्वसू नक्षत्रात संक्रमण
  • या राशींच्या लोकांना होणार फायदा
 

गुरु ग्रह सोमवार, २० एप्रिल रोजी दुपारी ४ वाजून ४३ मिनिटांनी पुनर्वसू नक्षत्रात प्रवेश करेल. ज्योतिषशास्त्रानुसार गुरुचे हे संक्रमण अत्यंत शुभ मानले जाते, कारण गुरु हा पुनर्वसू नक्षत्राचा स्वामी आहे म्हणजेच हे गुरुचे स्वतःचेच नक्षत्र संक्रमण आहे. ज्योतिषशास्त्रानुसार, स्वतःच्या नक्षत्रातील संक्रमणामुळे गुरूवरील प्रभाव बळकट करते आणि फळ देण्याची त्याची शक्ती वाढवते. जेव्हा गुरू पुनर्वसू नक्षत्रात असतो, तेव्हा हा काळ वाढलेले ज्ञान, संपत्ती, आध्यात्मिक प्रगती आणि नवीन संधी दर्शवतो. गुरूच्या नक्षत्र संक्रमणाचा कोणत्या राशींच्या लोकांना फायदा होणार आहे जाणून घ्या

मेष रास

मेष राशींच्या लोकांसाठी हे संक्रमण उत्साहाचे राहणार आहे. दीर्घकाळापासूनच्या समस्या हळूहळू कमी होतील. कर्जाचा दबाव कमी होईल आणि तुमचे मन हलके वाटेल. तुमच्या करिअरमधील नवीन जबाबदाऱ्या तुम्हाला प्रगतीची संधी देतील. कौटुंबिक पाठिंब्यामुळे तुमचा आत्मविश्वास वाढेल. पूर्वीच्या गुंतवणुकीतून तुम्हाला अपेक्षित यश मिळेल. तुमचे आरोग्यही तुम्हाला साथ देईल, ज्यामुळे तुम्ही प्रेरित राहाल.

Zodiac Sign: अमल योगामुळे वृषभ आणि मिथुन राशीसह या राशीच्या लोकांना होणार फायदा

मिथुन रास

गुरूचे हे संक्रमण मिथुन राशींच्या लोकांसाठी उत्तम संधी घेऊन येणारा राहील. यावेळी तुमची आर्थिक स्थिती मजबूत राहील. उत्पन्नाचे नवीन मार्ग निर्माण होतील. प्रलंबित कामे वेगाने पूर्ण होऊ लागतील. शिक्षण आणि स्पर्धात्मक क्षेत्रांमध्ये यश मिळण्याचे संकेत आहेत. नातेसंबंध अधिक गोड होतील. नवीन प्रकल्प सुरू करण्यासाठी ही उत्तम वेळ आहे.

कर्क रास

कर्क राशीच्या लोकांसाठी पुनर्वसू नक्षत्रातील गुरूचे संक्रमण फायदेशीर ठरेल. करिअरमध्ये प्रगतीची नवीन संधी मिळेल. तुम्ही घेतलेल्या मेहनतीचे तुम्हाला अपेक्षित यश मिळेल. गुंतवणुकीतून तुम्हाला अपेक्षित फायदा मिळेल. तुमचे मन शांत राहील आणि तुम्हाला आत्म-समाधान अनुभवायला मिळेल. कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील. कामाच्या ठिकाणी तुमच्या मेहनतीचे कौतुक होईल आणि प्रवास फायदेशीर ठरेल.

Numberlogy: मूलांक 7 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस कसा राहील जाणून घ्या

तूळ रास

पुनर्वसू नक्षत्रातील गुरूचे संक्रमण तूळ राशीच्या लोकांसाठी नवीन आशा आणि यशाचे संकेत देत आहे. कामात आणि व्यवसायात स्थिरता सुधारेल आणि आर्थिक सुबत्ता येण्याची शक्यता आहे. प्रलंबित निधी मिळण्याची शक्यता आहे. समाजामध्ये मान सन्मान वाढेल. तुमच्यामधील आत्मविश्वास वाढलेला राहील. कुटुंबासोबत वेळ घालवल्याने तुम्हाला शांती आणि आनंद मिळेल.

धनु रास

धनु राशींच्या लोकांसाठी हे संक्रमण फायदेशीर राहील. करिअरमध्ये प्रगती आणि नवीन मार्ग खुले होण्याचे प्रबळ संकेत आहेत. परदेशाशी संबंधित प्रयत्नांमध्ये यश मिळण्याची शक्यता आहे. कर्जमुक्ती देखील शक्य आहे. कुटुंबात शांतता आणि आनंदाचे वातावरण राहील. आध्यात्मिक प्रवृत्ती वाढून मन स्थिर होईल. प्रलंबित कामे लवकर पूर्ण होतील आणि सुज्ञ आर्थिक निर्णयामुळे भविष्यात मोठे फायदे मिळू शकतील.

(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)

💡

Frequently Asked Questions

  • Que: स्व-नक्षत्र संक्रमण म्हणजे काय?

    Ans: गुरू स्वतःच्या नक्षत्रात प्रवेश करतो, तेव्हा त्याचा सकारात्मक प्रभाव अधिक वाढतो, यालाच स्व-नक्षत्र संक्रमण म्हणतात.

  • Que: गुरू गोचर म्हणजे काय?

    Ans: गुरू ग्रह एका राशीतून किंवा नक्षत्रातून दुसऱ्यात जाण्याला ‘गुरू गोचर’ म्हणतात, ज्याचा परिणाम ज्ञान, भाग्य आणि प्रगतीवर होतो

  • Que: गुरुच्या स्व नक्षत्र संक्रमणाचा कोणत्या राशीच्या लोकांना फायदा होणार

    Ans: गुरुच्या स्व नक्षत्र संक्रमणाचा मेष, मिथुन, कर्क, तूळ आणि धनु राशीच्या लोकांना फायदा होणार

Web Title: Guru gochar jupiter transit in its nakshatra punarvasu people of this zodiac sign will benefit

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 01, 2026 | 10:00 AM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.