फोटो सौजन्य- pinterest
ग्रहांचे संक्रमण एका राशीमधून दुसऱ्या राशीमध्ये होत असते. व्यक्तीच्या जीवनात अनेक प्रकारचे बदल घडवून आणते. त्यामुळे सर्वांत प्रभावशाली ग्रह म्हणून गुरु ग्रहाला ओळखले जाते.
ऑगस्ट महिन्यामध्ये गुरु ग्रहांचे दुहेरी संक्रमण होत असल्याने हे संक्रमण ज्योतिषशास्त्रानुसार खूप महत्त्वाचे मानले जाते. हे संक्रमण बुधवार, 13 ऑगस्ट रोजी गुरु पुनर्वसु नक्षत्रामध्ये पहिल्या टप्प्यात प्रवेश करणार आहे. तर दुसरा टप्पा शनिवार, 30 ऑगस्ट रोजी संक्रमण करेल. त्याच्या या दुहेरी बदलांमुळे काही राशीच्या लोकांना नवीन संधी मिळू शकतात.
यावेळी काही लोकांना करिअरमध्ये प्रगती, व्यवसायात नफा, आदर आणि जीवनात स्थिरता असे अनेक मोठ्या बदलांना ते सामोरे जावू शकतात. काही राशीच्या लोकांसाठी हे संक्रमण परदेश प्रवास, नवीन नोकरी यासाठी हे संक्रमण फायदेशीर ठरणार आहे. गुरु ग्रहाच्या या संक्रमणाचा कोणत्या राशीच्या लोकांवर कसा परिणाम होईल ते जाणून घेऊया
मेष राशीच्या लोकांना गुरु ग्रहांचे संक्रमण सकारात्मक राहील. या संक्रमणामुळे व्यवसायाशी संबंधित लोकांना अनेक फायदे होऊ शकतात. नोकरी करणाऱ्या लोकांच्या उत्पन्नात वाढ होऊ शकते. तसेच पदोन्नतीत देखील वाढ होऊ शकते. जे विद्यार्थी स्पर्धा परीक्षेची तयारी करत आहे त्या लोकांना अपेक्षित यश मिळेल. नातेसंबंध सुधारतील. आर्थिक बाबतीत हा कळ चांगला राहील. गुंतवणुकीतूमधून तुम्हाला फायदा होईल. त्यामुळे आर्थिक स्थिती स्थिर राहील.
कर्क राशीच्या लोकांसाठी गुरु ग्रहांचे संक्रमण सकारात्मक राहील. या काळात तुम्हाला मानसिक शांती मिळेल. कुटुंबामध्ये आनंदाचे वातावरण राहील. तुम्ही नवीन वाहन किंवा मालमत्ता देखील खरेदी करू शकता. व्यवसायामध्ये भागीदारीमध्ये काम करणाऱ्या लोकांना अनेक संधी मिळू शकतात. जुन्या गुंतवणुकीतून चांगली कमाई होण्याची शक्यता आहे. नात्यामध्ये गोडवा राहील. तुमची प्रलंबित राहिलेली कामे पूर्ण होतील.
मीन राशीच्या लोकांसाठी गुरु ग्रहांचे संक्रमण फायदेशीर राहणार आहे. यावेळी तुम्ही धार्मिक कार्यक्रमामध्ये सहभागी होऊ शकतात. ज्यामुळे मानसिक शांती आणि आध्यात्मिक ऊर्जा मिळेल. नवीन नोकरीच्या शोधात असलेल्यांसाठी हा काळ अनुकूल राहील. व्यवसायामध्ये गुंतवणूक करणाऱ्यांना अपेक्षित यश मिळेल. यामुळे तुमची आर्थिक स्थिती चांगली राहील. प्रगती, स्थिरता आणि समृद्धीकडे वाटचाल करण्यासाठी हा काळ एक उत्तम ठरु शकतो.
(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)