
फोटो सौजन्य- pinterest
हिंदू पंचांगानुसार, नोव्हेंबर महिना खूप महत्त्वाचा मानला जातो. या महिन्यामध्ये गुरूसह अनेक प्रमुख ग्रहांचे संक्रमण होणार आहे. ज्यावेळी ग्रह त्यांची स्थिती बदलतो त्यावेळी त्याचा परिणाम सर्व राशीच्या लोकांवर होताना दिसून येतो. जो कधी सकारात्मक तर कधी नकारात्मक दिसतो. ज्योतिषशास्त्रानुसार, 11 नोव्हेंबर रोजी गुरु ग्रह कर्क राशीत वक्री होईल आणि मार्च 2026 पर्यंत याच वक्री स्थितीत राहील. गुरुच्या हालचालीतील हा बदल काही राशींसाठी फायदेशीर ठरू शकतो. या वक्री स्थितीचा काही राशीच्या लोकांना फायदा होणार आहे. कोणत्या आहेत त्या राशी जाणून घ्या
पंचांगानुसार, 11 नोव्हेंबर रोजी रात्री 10.11 वाजता गुरु ग्रह कर्क राशीमध्ये वक्री होणार आहे. या बदलाचा काही राशींवर खूप शुभ परिणाम होईल. यामध्ये वृश्चिक, कर्क आणि वृषभ राशीच्या लोकांचा समावेश आहे. या काळात तुम्हाला तुमच्या जोडीदाराकडून पूर्ण सहकार्य मिळेल, कुटुंब आणि मित्रांसोबतचे संबंध अधिक मजबूत होतील आणि अनेक बाबतीत सकारात्मक परिस्थिती निर्माण होईल. आर्थिक स्थिती चांगली राहील. व्यवसाय आणि नोकरी करणाऱ्या लोकांना अपेक्षित यश मिळेल.
वृषभ राशीच्या लोकांसाठी हा काळ चांगला असणार आहे. यावेळी तुमचे नातेसंबंध मजबूत होतील. कुटुंब आणि मित्रांसोबतचे संबंध सुधारतील. करिअरमध्ये महत्त्वाचे निर्णय घेणे फायदेशीर ठरेल. तुम्हाला तुमच्या बोलण्यावर संयम ठेवावा लागेल. दीर्घकालीन समस्या सुटतील आणि न्यायालयीन खटल्यांमध्ये सकारात्मक निकाल लागण्याची शक्यता आहे.
कर्क राशीच्या लोकांसाठी हा काळ खूप फायदेशीर असणार आहे. व्यवसाय करणाऱ्यासाठी हा काळ खूप फायदेशीर राहील. भागीदारीत केलेले काम यशस्वी होईल. व्यवसायात नफा मिळण्याची शक्यता जास्त असेल. घरात आणि कुटुंबात शांतता राहील आणि दीर्घकालीन समस्या सुटतील. कुटुंबामध्ये आनंदाचे वातावरण राहील. तुम्ही जोडीदारासोबत बाहेर फिरायला जाण्याचा प्लॅन करु शकता.
वृश्चिक राशीच्या लोकांसाठी हा काळ खूप शुभ राहणार आहे. यावेळी तुमच्या जीवनात सुरु असलेल्या समस्या दूर होतील. तुम्हाला नोकरीमध्ये अपेक्षित यश मिळेल. तुम्हाला तुमच्या मित्रांकडून पूर्ण पाठिंबा मिळेल. वैवाहिक जीवनात आनंद, शांती आणि प्रेम वाढेल. व्यवसाय वाढीबरोबरच आर्थिक लाभ देखील होऊ शकतो.
(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)
Ans: ज्यावेळी ग्रह पृथ्वीच्या दिशेने मागे जाताना दिसतात त्याला वक्री म्हणतात.
Ans: गुरु ग्रह 11 नोव्हेंबर रोजी वक्री होणार आहे
Ans: गुरु ग्रह कर्क राशीमध्ये वक्री होणार आहे