
फोटो सौजन्य- pinterest
नऊ ग्रहांपैकी गुरु ग्रह हा सर्वात मोठा आणि शुभ ग्रह मानला जातो. ज्याला आपण गुरु ग्रह असे म्हणतो. ज्योतिषशास्त्रात गुरु ग्रहाला ज्ञान, बुद्धी, धर्म, अध्यात्म, शिक्षण, नैतिकता, भाग्य, मुले आणि समृद्धीसाठी जबाबदार असलेला ग्रह आहे. गुरु ग्रहाची वक्री मंगळवार, 11 नोव्हेंबर रोजी संध्याकाळी 6.31 वाजता कर्क राशीमध्ये होणार आहे. यापूर्वी, गुरु ग्रहाने कर्क राशीत प्रवेश केला होता. आता, तो 5 डिसेंबरपर्यंत या राशीत उलट दिशेने राहणार आहे. गुरु ग्रहाच्या वक्री गतीचा प्रत्येक राशीच्या लोकांवर वेगवेगळ्या प्रकारे प्रभाव पडणार आहे. ज्या राशींच्या लोकांवर त्याचा सकारात्मक प्रभाव त्या राशीच्या लोकांच्या जीवनामध्ये संपत्ती, यश आणि नातेसंबंधांमध्ये सुधारणा होण्याच्या संधी वाढत जातील. गुरु ग्रहाच्या वक्रीमुळे कोणत्या राशीच्या लोकांचे नशीब बदलणार आहे जाणून घ्या
वृषभ राशीच्या लोकांसाठी गुरु ग्रहाची वक्री खूप शुभ असणार आहे. या काळात तुम्हाला आर्थिक लाभ होऊ शकतो. तसेच अडकलेला पैसा देखील तुम्हाला परत मिळू शकतो. वैवाहिक जीवनात गोडवा वाढेल आणि तुम्ही तुमच्या जोडीदारासोबत चांगला वेळ घालवाल. भावंडांवर काही खर्च होऊ शकतो, परंतु यामुळे तुमचे नाते चांगले राहील. काही बाबींमध्ये विलंब होऊ शकतो मात्र तुम्हाला त्याचा फायदा होईल.
कन्या राशीच्या लोकांसाठी हा काळ खूप चांगला राहील. नवीन आणि उपयुक्त संपर्क साधतील. नवीन मित्र तुमच्या कामात मदत करतील. करिअर क्षेत्रात सकारात्मक परिणाम मिळण्याची शक्यता आहे आणि व्यवसायात गुंतलेल्यांनाही अपेक्षित फायदा होईल. तुमच्या प्रयत्नांवर तुम्हाला समाधान वाटेल. तुमच्या जोडीदारासोबतचे तुमचे नाते पूर्वीपेक्षा चांगले होईल. या काळात तुमचे आरोग्य सामान्य राहील.
वृश्चिक राशीच्या लोकांसाठी गुरु ग्रहाची वक्री चाल शुभ राहील. या काळात तुम्हाला नशिबाची पूर्ण साथ मिळेल. करिअरमध्ये प्रगतीच्या संधी उपलब्ध होतील. तुम्हाला कामाच्या ठिकाणी खूप मेहनत घ्यावी लागेल आणि तुमच्या नेतृत्व कौशल्याचे कौतुक देखील केले जाईल. आर्थिकदृष्ट्या हा काळ तुमच्यासाठी खूप अनुकूल राहील. या काळात तुम्हाला आर्थिक नफा देखील मिळू शकतो. गुंतवणूक केल्याने तुम्हाला दीर्घकालीन फायदे होतील. यावेळी तुम्हाला वडिलांच्या आरोग्याची विशेष काळजी घ्यावी लागेल.
धनु राशीच्या लोकांसाठी गुरु ग्रहाची वक्री चाल खूप फायदेशीर ठरणार आहे. या काळात तुम्हाला यशाच्या अनेक संधी मिळतील. घरात सुखसोयी आणि सुविधा वाढतील आणि कुटुंबामध्ये काही सौम्य चिंता कायम राहू शकतात. गुंतवणुकीतून तु्म्हाला चांगला फायदा होऊ शकतो. तुम्ही घेतलेल्या मेहनतीचे तुम्हाला अपेक्षित फळ मिळेल. प्रलंबित कामे पूर्ण होतील. कोणतेही निर्णय घाईने घेणे टाळा.
(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)
Ans: गुरु अर्थात बृहस्पति ग्रह ज्याला शिक्षण, विस्तार, समृद्धी, तत्वज्ञान अशा गोष्टींशी जोडले गेले आहे. ज्यावेळी हे ग्रह उलटे चालतात त्याला गुरु वक्री म्हटले जाते.
Ans: गुरु वक्री मंगळवार, 11 नोव्हेंबर रोजी होणार आहे
Ans: या राशीच्या लोकांमध्ये गुरुची होणारी वक्री भावनिक सुरक्षितता, मूलभूत मूल्यं आणि आत्मसंवर्धन यांच्याशी जोडलेले आहे.