Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 13 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Hartalika: हरतालिकेचे व्रत म्हणजे काय? माता पार्वतीने शंकरांना मिळविण्यासाठी केलेले व्रत

हरतालिका व्रत हे माता पार्वतीने भगवान शंकरांना पती म्हणून प्राप्त करण्यासाठी केलेल्या कठोर तपश्चर्येचे प्रतीक मानले जाते. यंदा हे व्रत सोमवार, 14 सप्टेंबर रोजी पाळले जाणार आहे. या व्रतामागची पौराणिक कथा जाणून घेऊया.

  • By प्राजक्ता प्रधान
Updated On: Sep 13, 2026 | 10:29 AM
फोटो सौजन्य- pinterest

फोटो सौजन्य- pinterest

Follow Us
Follow Us:
  • हरतालिका व्रत म्हणजे काय
  • हरतालिका व्रतामागची पौराणिक कथा
  • भगवान शंकरांना पती म्हणून मिळवण्यासाठी पार्वतीने काय केले?
 

हरतालिका व्रताचे महत्त्व

हरतालिका हे व्रत माता पार्वतीने भगवान शंकरांना प्राप्त करण्यासाठी केलं होतं. कठोर तपश्चर्येची आठवण करून देणारं असं हे व्रत आहे. भाद्रपद शुक्ल तृतीयेच्या दिवशी हे व्रत केलं जातं. हरतालिका या शब्दांत हरत म्हणजे हरण करून घेणे आणि आलिका म्हणजेच सखी असा अर्थ होतो. पार्वतीच्या सखीने तिला घरातून दूर नेलं म्हणून या व्रताला हरतालिका असं नाव पडलं.

पार्वतीचा पुनर्जन्म

पूर्वजन्मी सतीने आपल्या पित्याच्या यज्ञात आत्मधन केलं होतं. त्यानंतर ती हिमालय आणि नेना यांच्या पोटी पार्वती म्हणून जन्माला आली. बालपणापासूनच तिच्या मनात भंगवान शंकरांबाबात अपार अशी भक्ती होती. तिने शंकरांनाच पती म्हणून स्वीकारण्याचा निश्चय केला होता. त्यामुळे ती लहान वयापासूनच त्यांची उपासना आणि तप करू लागली.

Hartalika 2026: हरतालिकेच्या दिवशी राशीनुसार करा या गोष्टींचे दान, ग्रहदोष होतील दूर

भगवान विष्णूंचा विवाह प्रस्ताव

एकेदिवशी नारदमुनी हिमालय राज्याच्या भेटीस आले त्यांनी पार्वतीच्या विवाहासाठी भगवान विष्णूंचा प्रस्ताव सांगितला. विष्णूंसारखा श्रेष्ठ वर मिळत असल्यामुळे हिमालय राजांनी आनंदाने होकार दिला. मात्र ही बातमी जेव्हा पार्वती यांना समजली तेव्हा त्या अत्यंत दुखी झाल्या कारण तिच्या मनात शंकराशिवाय अन्य कोणाचाही विचार नव्हता.

सखीने पार्वतीला अरण्यात नेले

पार्वतीची अवस्था पाहून तिच्या जिवलग सखीने तिला विचारलं. पार्वतीने आपल्या मनातील इच्छा देखील सांगितली तेव्हा पार्वतीच्या सखीने तिला घरातून दूर एका घनदाट अरण्यात नेलं. हिमालय राजाला वाटलं कोणीतरी पार्वतीचं अपहरण केलं आहे याच घटनेमुळे पार्वतीचं नाव हरतालिका हे नाव प्रसिद्ध झालं.

पार्वतीची कठोर तपश्चर्या

अरण्यात एका नदीकिनारी वाळूच शिवलिंग तिने तयार केलं. तिने निर्जळ उपवास करून भगवान शंकरांची मनोभावे पूजा केली. दिवसभर अन्नपाणी त्यागून ती शिवनामस्मरण करत राहिली. रात्रभर जागरण करून तिने शिवध्यान केलं.

Hartalika 2026: हरतालिकेच्या दिवशी तयार होत आहे दुर्मिळ योग, या राशींच्या महिलांचे चमकणार नशीब

भगवान शंकर झाले प्रसन्न

तिची भक्ती, श्रद्धा आणि तपश्चर्या इतकी प्रकर होती की संपूर्ण सृष्टी प्रभावित झाली. अखेर पार्वतीच्या अखंड तपश्चर्येमुळे भगवान शंकर प्रसन्न झाले ते तिच्यासमोर प्रकट होऊन वर मागण्यासा सांगितला. पार्वतीने नम्रपणे त्यांनाच पती म्हणून मिळावे अशी इच्छा व्यक्त केली.

पार्वतीची इच्छा झाली पूर्ण

मग शंकरांने तिची इच्छा मान्य केली आणि योग्य वेळी विवाह करण्याचं वचन दिलं. दरम्यान, हिमालय राज आपल्या मुलीचा शोध घेत अरण्यात आले त्यांनी पार्वतीला परत येण्याची विनंती केली तेव्हा पार्वतीने स्पष्ट शब्दांत सांगितलं माझा विवाह भगवान शंकरांशी करण्याचे वचन दिल्यास मी परत येईल.

शिव-पार्वतीचा विवाह

आपल्या मुलीचा निर्धार पाहून हिमालय राजाने तिची इच्छा मान्य केली. यानंतर शुभ मुहूर्तावरती भगवान शंकर आणि माता पार्वती यांचा भव्य विवाह संपन्न झाला. हा विवाह केवळ दोन व्यक्तींचा नव्हता. तर शक्ती आणि शिव यांच्या मिलनाचं ते प्रतीक होतं. म्हणूनच हरतालिका व्रत हे अखंड सौभाग्य, उत्तम पतीप्राप्ती आणि सुखी वैवाहिक जीवनासाठी अत्यंत महत्त्वाचं मानलं जातं.

(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)

Web Title: Hartalika 2026 what is the meaning of the hartalika fast and the story

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 13, 2026 | 10:29 AM

Topics:  

  • dharm
  • hindu religion
  • religions

संबंधित बातम्या

Guru Gochar: कर्क राशीत गुरु-सेनापती संयोग; या ४ राशींना सर्वाधिक लाभ, मनातील इच्छा होणार पूर्ण
1

Guru Gochar: कर्क राशीत गुरु-सेनापती संयोग; या ४ राशींना सर्वाधिक लाभ, मनातील इच्छा होणार पूर्ण

Numberlogy: मूलांक २ असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस कसा राहील जाणून घ्या
2

Numberlogy: मूलांक २ असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस कसा राहील जाणून घ्या

Budh Nakshatra parivartan: १३ सप्टेंबरला बुध बदलणार नक्षत्र, नोकरी-व्यवसायासह धन-धान्यात होऊ शकते वाढ
3

Budh Nakshatra parivartan: १३ सप्टेंबरला बुध बदलणार नक्षत्र, नोकरी-व्यवसायासह धन-धान्यात होऊ शकते वाढ

Varaha Jayanti 2026: कधी आहे वराह जयंती, जाणून घ्या शुभ वेळ आणि पूजेची पद्धत
4

Varaha Jayanti 2026: कधी आहे वराह जयंती, जाणून घ्या शुभ वेळ आणि पूजेची पद्धत

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.