Swami Samarth : 'असा' बनतो अक्कलकोटला स्वामी महाराजांचा प्रसाद
अक्कलकोट हे श्री स्वामी समर्थ महाराजाचं निवासस्थान म्हटलं जातं. स्वामींचे लाखो भक्त अक्कलकोटला दर्शनाला येत असतात. अक्कलकोटला स्वामी महाराजांचा शुभशिर्वाद प्राप्त झाल्यावर एक कृतज्ञता व्यक्त करायची म्हणून अनेक भक्त सेवा देतात. अक्कलकोट स्वामी महाराज संस्थानाबाबत सांगायचं झालंच तर शिस्तबद्ध पद्धतीने भक्तांच्या सोयी सुविधांचा विचार केला जातो. स्वामींच्या दरबार दिवसाला लाखो भाविक येतात. त्यामुळे त्यांच्यासाठी महाप्रसादाची .सोय अत्यंत चोख पार पाडली जाते. अक्कलकोटला स्वामींच्या दर्शना व्यतिरिक्त अन्य बाब सांगायची तर तेथील अन्नछत्र. या अन्नछत्रामध्ये दररोज 12 ते 3 आणि संध्याकाळी 7 ते 10 या वेळेत भाविकांसाठी महाप्रसादाची सोय केली जाते.
दर गुरुवारी आणि विशेषत: पौर्णिमेला या ठिकाणी भाविक येत असतात. येथील अन्नछत्राबाबत सांगायच तर दिवसाला किमान 30 ते 40 भाविक या ठिकाणी महाप्रसादाचा लाभ घेतात. गुरुपौर्णिमेला आणि स्वामींच्या प्रकटदिनाला एक ते दीड लाख लोक जेवतात. वरण भात, ताक, भाजी आणि चपाती या पदार्थांचा समावेश असतो. याबाबत अधिकचा व्हिडीओ हा प्रसिद्ध युट्युबर सुकिर्त गुमस्ते याने केला आहे. इतक्या जणांचा स्वयंपाक असतानाही कोणत्याही प्रकारचे यंत्राच्य़ा सहाय्याने चपात्या किंवा अन्य जेवण न करता सेवेकरी स्वत: च्या हाताने स्वयंपाक करतात. 300 किलो बटाट्याची भाजी एका वेळी बनवली जाते. स्वामींच्या या अन्नछत्रात शिस्तीला आणि स्वच्छतेला महत्त्व जास्त आहे. एका वेळेला जवळपास तीन ते साडेतीन हजार लोकांचं जेवण याठिकाणी होत असतं. एका वेळेला 100 किलोचा भात असे दिवसभरात 20 पातेले भात तयार केला जातो. याबाबत सविस्तर माहिती देताना तेथील आचाऱ्याचं असं म्हणणं होतं की, आज पर्यंत अन्नछत्रात कोणालाही काहीही कमी पडलेलं नाही.
सोलापुरी पद्धतीने केलेली बटाट्याची भाजी, वरण भात, ताक आणि शिरा असा हा महाप्रसाद तयार केला जातो. या महाप्रसादाला सुरुवात करण्याआधी अन्नपुर्णा देवीची पूजा केली जाते. एका पंगतीमध्ये हजार सेवेकरी जेवतात असं दिवसभरात कितीतरी पंगती उठतात. त्यानंतर स्वामींना नेैवेद्य देखील दिला जातो. यानंतर स्वामी महाराजांची आरती होते. या जेवणाचा भाविकांकडून कसलाही मोबदला घेतला जात नाही. असं हे स्वामी महाराजांचं अन्नछत्र त्यांच्या भाविकांसाठी कायमच खुले असते.