
फोटो सौजन्य- pinterest
भगवद्गीतेमध्ये मार्गशीर्ष महिन्याचा उल्लेख आहे. दहाव्या अध्यायातील विभूतीयोगात भगवान श्रीकृष्णाने स्वतःला “मासानां मार्गशीर्षोऽहम” (महिन्यांमध्ये मी मार्गशीर्ष आहे) असे म्हटले आहे, या उल्लेखातून या महिन्याचे महत्त्व अधोरेखित होते.
मार्गशीर्ष महिन्याची सुरुवात आज शुक्रवार, 21 नोव्हेंबरपासून होत आहे. हा महिना कार्तिकी अमावस्या संपल्यानंतर सुरु होतो. हिंदू धर्मामध्ये मार्गशीर्ष महिन्याला विशेष महत्त्व आहे. या महिन्यात अनेक शुभ कार्य, व्रत वैकल्य, सण साजरे केले जातात. महत्त्वाचं म्हणजे अनेक जण मार्गशार्ष महिन्याच्या प्रत्येक गुरूवारी देवी लक्ष्मीचे प्रतीक म्हणून घटाची स्थापना करतात आणि त्याचे व्रत करतात. यामुळे कुंटुंबावर देवीचे कायम आशीर्वाद राहतात, आशीर्वाद राहतात, अशी श्रध्दा आहे. तसेच जीवनात सुख-शांती, समृद्धी देखील येते. मार्गशीर्ष महिन्यामध्ये किती गुरुवार आहेत आणि या महिन्याचे महत्त्व जाणून घेऊया
ज्योतिषशास्त्रानुसार, अमावस्या संपल्यानंतर मार्गशीर्ष महिन्याची सुरुवात होते. त्यामुळे यंदा मार्गशीर्ष महिना शुक्रवार, 21 नोव्हेंबरपासून सुरु होत आहे.
20 नोव्हेंबर रोजी मार्गशीर्षचा गुरुवार असला तरी तो मार्गशीर्ष महिन्याचा नसून अमावस्येचा दिवस आहे. त्यामुळे या दिवशी घटाची स्थापना केली जाणार नाही. पहिले मार्गशीर्ष गुरुवार व्रत हे पुढील आठवड्यात म्हणजेच गुरुवार, 27 नोव्हेंबर रोजी असेल.
पहिला गुरूवार: 27 नोव्हेंबर
दुसरा गुरूवार: 04 डिसेंबर
तिसरा गुरूवार: 11 डिसेंबर
चौथा गुरूवार: 18 डिसेंबर
ज्या घटाची स्थापना करणार आहात त्या ठिकाणची जागा स्वच्छ करून रांगोळीने स्वस्तिक काढावा.
त्यानंतर त्यावर चौरंग किंवा पाट ठेवावा.
चौरंगावर लाल कापड ठेवून त्यावर तांदूळ, तांब्याचा कलश ठेवावा.
नंतर कलशाला हळदीकुंकु लावून त्यामध्ये पाणी, तांदूळ, दूर्वा, एक नाणं आणि सुपारी ठेवावी.
विड्याची पाने किंवा आंब्याची डहाळी, पंचपात्र कलशावर ठेवावी, त्यावर नारळ ठेवावा.
लाल कापडावर थोडे तांदूळ पसरवून त्यावर कलशाची स्थापना करावी.
आता त्याठिकाणी श्री लक्ष्मीदेवीचा फोटो किंवा लक्ष्मी श्रीयंत्र ठेवावे.
कलशापुढे विडा, खोबरे, खारीक, बदाम, इतर फळे, खडीसाखर किंवा गूळ ठेवावा.
यथाशक्ती नैवेद्य दाखवू शकता.
मार्गशीर्ष महिन्यात देवी महालक्ष्मीचे व्रत करण्याला अत्यंत महत्त्व आहे. असे म्हणतात की, हे व्रत पूर्ण श्रद्धेने आणि विश्वासाने केल्यास देवीचे आशीर्वाद भक्तांवर राहतात. हे व्रत विवाहित स्त्रिया आपल्या सुखी संसारासाठी, कुटुंबात समृद्धी यावी, भरभराट व्हावी यासाठी हे व्रत करतात अशी मान्यता आहे. मात्र तुम्ही कोणत्याही मनोकामनेसाठी हे व्रत नियमांनुसार करू शकता. प्रत्येक गुरुवारी पूजा मांडून हे व्रत केले जाते व शेवटच्या गुरुवारी व्रताचे उद्यापन केले जाते. असे व्यवस्थित व्रत केले तर याचे शुभ फळ मिळते अशी मान्यता आहे.
मार्गशीर्ष महिन्यामध्ये अन्नदान, वस्त्रदान आणि गरजू लोकांना मदत करणे हे खूप पुण्याचे मानले जाते. या महिन्यामध्ये केलेले दान आणि उपासना देवी देवतांचे आशीर्वाद मिळविण्यासाठी तसेच सुख, समृद्धी आणि मानसिक शांती मिळते.
(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)
Ans: मार्गशीर्ष महिन्याची सुरुवात 21 नोव्हेंबरपासून होत आहे
Ans: मार्गशीर्ष महिन्यात एकूण चार गुरुवार आहेत. पहिला गुरूवार: 27 नोव्हेंबर दुसरा गुरूवार: 04 डिसेंबर तिसरा गुरूवार: 11 डिसेंबर चौथा गुरूवार: 18 डिसेंबर
Ans: हे व्रत महालक्ष्मी देवीशी संबंधित मानले जाते. विवाहित स्त्रिया आपल्या सुखी संसारासाठी, कुटुंबात समृद्धी यावी, भरभराट व्हावी यासाठी हे व्रत करतात