Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Bigg Boss 19 |
  • Sankashti Chaturthi |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

India vs Pakistan 2025: भारत-पाकिस्तान सामन्यावर शनि आणि मंगळाची सावली, जाणून घ्या ज्योतिषाचे भाकीत

रविवार, 14 सप्टेंबर रोजी आशिया कपमधील सर्वात रोमांचक सामना भारत आणि पाकिस्तान यांच्यात खेळला जाणार आहे. ज्योतिषशास्त्रानुसार ग्रह ताऱ्याच्या संयोजनामुळे सामन्यावर याचा विपरित परिणाम होऊ शकतो.

  • By प्राजक्ता प्रधान
Updated On: Sep 13, 2025 | 02:56 PM
फोटो सौजन्य- pinterest

फोटो सौजन्य- pinterest

Follow Us
Close
Follow Us:

आशिया कप 2025 मधील सर्वात मोठा सामना भारत आणि पाकिस्तान यांच्यात रविवार, 14 सप्टेंबर रोजी रंगणार आहे. दोन्ही देशांचे करोडो चाहते या दिवसाची वाट पाहत आहेत. जे जास्त क्रिकेट पाहत नाही किंवा ज्यांना जास्त सामने आवडत नाही ते देखील भारत आणि पाकिस्तानमधील सामना पाहण्यासाठी उत्सुक आहे. दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर होणाऱ्या भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामन्यात जर आपण आशिया कप २०२५ च्या पॉइंट टेबलवर नजर टाकली तर भारत आणि पाकिस्तानने ग्रुप अ मध्ये आपले खाते उघडले आहे. कोणाचा वरचष्मा असणार आहे. दोन्ही देशांच्या ग्रह आणि नक्षत्रांची स्थिती पाहिली असता राशींचे संयोजन सामन्याच्या निकालावर परिणाम करू शकते. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना कोण जिंकू शकेल, जाणून घेऊया ज्योतिषशास्त्राच्या भाकितावरुन

भारत आणि पाकिस्तानमधील होणारा सामना

भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना नेहमीच रोमांचक राहिला आहे. कारण केवळ भारत-पाकच नाही तर जगभरातील क्रिकेट चाहते या सामन्याकडे लक्ष देत आहेत. आशिया कपमधील 19 सामन्यांमध्ये भारताने पाकिस्तानला 10 वेळा हरवले आहे आणि पाकिस्तानने 6 वेळा भारताला हरवले आहे. तर 2023 मध्ये ग्रुप-स्टेज सामन्यासह तीन सामने खराब हवामानामुळे रद्द करण्यात आले होते. भारताने पाकिस्तानवर शेवटचा आशिया कप विजय 2022 मध्ये यूएईमध्ये केला होता. जर आपण आशिया कप 2025 च्या पॉइंट टेबलवर नजर टाकली तर भारत आणि पाकिस्तानने ग्रुप अ मध्ये आपले खाते उघडले आहे. गट अ मध्ये भारत आणि पाकिस्तानने आपले खाते उघडले आहे. दोन्ही संघांचे प्रत्येकी 2 गुण आहेत. गट ब मध्ये पाहिले तर अफगाणिस्तान आणि बांगलादेशने आपले खाते उघडले आहे. दोन्ही संघांचे प्रत्येकी 2 गुण आहेत.

Shadashtak Yoga: 18 सप्टेंबरपासून या लोकांनी राहावे सावध, षडाष्टक योगामुळे काही राशीच्या लोकांना होऊ शकते नुकसान

भारत आणि पाकिस्तान सामन्यात गुरुची भूमिका

ज्योतिषशास्त्रानुसार, देवतांच्या गुरु ग्रहाने नेहमीच भारताला विजय मिळवून देण्यात विशेष भूमिका बजावली आहे. यावेळी गुरुचे स्थान अतिचरी अवस्थेत आहे, त्यामुळे ज्योतिषशास्त्रात ही घटना शुभ मानली जात नाही. गुरु ग्रह सध्या बुध आणि मिथुन राशीत आहे त्यानंतर तो पुनर्वसु नक्षत्रात प्रवेश करणार आहे, जो वैदिक ज्योतिषशास्त्रातील सातवा नक्षत्र आहे.

मंगळ, गुरु आणि शनि यांच्यातील भूमिका

ज्योतिषशास्त्रानुसार, ग्रहांचा सेनापती मंगळ ग्रह खेळांमध्ये विशेष स्थान राखतो कारण खेळाचे मैदान आणि खेळाडू यांच्याशी मंगळाचा संबंध मानला जातो. मंगळ हा ऊर्जा, शक्ती, धैर्य, युद्ध, रक्त, शौर्य, शौर्य, आक्रमकता यासारख्या गुणांसाठी जबाबदार ग्रह मानला जातो, जो खेळाडूंसाठी अत्यंत आवश्यक आहे. यावेळी मंगळ ग्रह 13 सप्टेंबर रोजी शुक्र राशीच्या तूळ आणि चित्रा नक्षत्राच्या तिसऱ्या टप्प्यात प्रवेश करत आहे. तर शनि ग्रह उत्तराभाद्रपद नक्षत्रात वक्री अवस्थेत राहील.

या काळात भारताला सामना जिंकण्यासाठी खूप मेहनत घ्यावी लागेल. कारण शनि वक्री अवस्थेत फिरत असल्याने त्याला कठोर परिश्रम करणारा ग्रह मानला जातो. भारत-पाकिस्तान सामना रात्री 8 वाजता सुरु होणार आहे. यावेळी चंद्र मिथुन राशीत असले तर त्यामध्ये गुरु आधीच उपस्थित आहे. गुरु आणि चंद्राच्या युतीमुळे गजकेसरी योग देखील तयार होईल.

Kalashtami 2025: सप्टेंबर महिन्यामध्ये कालाष्टमी कधी आहे? जाणून घ्या कालभैरवाची पूजा करण्यासाठी मुहूर्त आणि महत्त्व

भारताला मिळेल का अपेक्षित यश

भारताची कुंडली पाहिली गेल्यास ग्रहांचा राजा असलेल्या सूर्याची स्थिती मजबूत असेल आणि चंद्राची अनुकूल स्थिती आत्मविश्वास आणि स्थिरता देईल. याचा अर्थ असा की संघाच्या फलंदाजांची कामगिरी मजबूत असल्याचे दिसून येते. तर पाकिस्तानची कुंडली पाहिल्या गेल्यास शनीची वक्र दृष्टी थोडी आव्हानात्मक मानली जाते. याचा परिणाम म्हणजे संघातील खेळाडूंना दबाव सहन करणे कठीण होऊ शकते. दरम्यान ग्रहांचा सेनापती असलेल्या मंगळाचा प्रभाव त्यांना आक्रमकता आणि उत्साह देईल. ज्योतिषशास्त्राच्या मते, भारतासाठी सुरुवातीचा काळ हा शुभ राहील. तर मधल्या षटकांचा खेळ पाकिस्तानकडे झुकू शकतो.

(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)

Web Title: India vs pakistan 2025 saturn and mars influence on match astrologer prediction revealed

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 13, 2025 | 02:56 PM

Topics:  

  • Asia cup 2025
  • astrology news
  • dharm

संबंधित बातम्या

Asia Cup 2025 : पाकिस्तानविरुद्ध भारताच्या संघाची कशी असेल प्लेइंग 11? अर्शदीपचे होणार पुनरागमन तर या खेळाडूला वगळणार
1

Asia Cup 2025 : पाकिस्तानविरुद्ध भारताच्या संघाची कशी असेल प्लेइंग 11? अर्शदीपचे होणार पुनरागमन तर या खेळाडूला वगळणार

Asia cup 2025 : ‘BCCI सरकारच्या निर्णयाशी…’, भारत-पाकिस्तान सामन्यापूर्वी, फलंदाजी प्रशिक्षकाने केला मोठा दावा 
2

Asia cup 2025 : ‘BCCI सरकारच्या निर्णयाशी…’, भारत-पाकिस्तान सामन्यापूर्वी, फलंदाजी प्रशिक्षकाने केला मोठा दावा 

Shadashtak Yoga: 18 सप्टेंबरपासून या लोकांनी राहावे सावध, षडाष्टक योगामुळे काही राशीच्या लोकांना होऊ शकते नुकसान
3

Shadashtak Yoga: 18 सप्टेंबरपासून या लोकांनी राहावे सावध, षडाष्टक योगामुळे काही राशीच्या लोकांना होऊ शकते नुकसान

India vs Pakistan Asia Cup 2025: “भारत पाकिस्तान सामना देशभक्तीची थट्टा, देशभक्तीचा व्यापार सुरू”, उद्धव ठाकरेंचा भाजपला सवाल
4

India vs Pakistan Asia Cup 2025: “भारत पाकिस्तान सामना देशभक्तीची थट्टा, देशभक्तीचा व्यापार सुरू”, उद्धव ठाकरेंचा भाजपला सवाल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.