Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 27 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Kaal Bhairav Jayanti: कालभैरव जयंती कधी आहे? भगवान शिवाच्या भयंकर रुपाची अशी करा पूजा, जाणून घ्या पूजेसाठी वेळ

काल भैरवांचा जन्म मार्गशीर्ष कृष्ण अष्टमी तिथीला झाला म्हणून या तिथीला ही कालभैरव जयंती साजरी केली जाते. कालभैरवाची पूजा केल्याने अकाली मृत्युचे भय दूर होते, अशी मान्यता आहे. कालभैरव जयंती कधी आहे, जाणून घ्या

  • By प्राजक्ता प्रधान
Updated On: Nov 08, 2025 | 09:46 AM
फोटो सौजन्य- pinterest

फोटो सौजन्य- pinterest

Follow Us
Follow Us:
  • कालभैरव जयंती कधी आहे
  • कालभैरव जयंतीला पूजेसाठी मुहूर्त
  • कालभैरव जयंतीचे महत्त्व
भगवान शिवाचे उग्र रूप असलेल्या कालभैरवाचा जन्म मार्गशीर्ष महिन्यातील कृष्ण पक्षामध्ये आठव्या दिवशी झाला होता. दरवर्षी या दिवशी कालभैरव जयंती साजरी केली जाते. कालभैरवाची पूजा केल्याने सर्व नकारात्मकता दूर होते. तंत्र आणि मंत्र सिद्धीसाठी देखील तो पूजनीय आहे. ग्रहांच्या त्रासांपासून मुक्त होण्यासाठी देखील कालभैरवाची पूजा केली जाते. कालभैरवाच्या जयंतीनिमित्त उपवास आणि पूजा केल्याने अकाली मृत्युचे भय कमी होते. रोग आणि दोष देखील दूर होतात. जाणून घ्या कालभैरव जयंती कधी आहे, पूजेसाठी मुहूर्त

कधी आहे कालभैरव जयंती

पंचांगानुसार, काल भैरव जयंती मार्गशीर्ष कृष्ण अष्टमी तिथीची सुरुवात मंगळवार, 11 नोव्हेंबर रोजी रात्री 11.8 वाजता सुरु होणार आहे. ही तिथी 12 नोव्हेंबर रोजी रात्री 10:58 पर्यंत असणार आहे. अशा वेळी कालभैरव जयंती बुधवार, 12 नोव्हेंबर रोजी साजरी केली जाणार आहे.

तसेच या दिवशी दोन शुभ योग देखील तयार होत आहे. कालभैरव जयंतीला शुक्ल आणि ब्रह्म योग तयार होणार आहेत. शुक्ल योगाची सुरुवात सकाळी होऊन तो 8.2 वाजेपर्यंत असेल. त्यानंतर ब्रम्हयोग सुरु होणार आहे. जो संपूर्ण रात्रभर राहील. त्यासोबतच त्या दिवशी आश्लेषा नक्षत्र पहाटेपासून संध्याकाळी 6.35 पर्यंत असणार आहे. त्यानंतर, मघ नक्षत्राची सुरुवात होईल.

ज्योतिषसास्त्रानुसार या काळामध्ये तुम्ही कालभैरवाची दिवसा पूजा करु शकता. पूजेसाठी शुभ वेळ सकाळी 6.41 ते 9.23 पर्यंत आहे, तर 10.44 ते दुपारी 12.5 हा देखील पूजेसाठी शुभ वेळ राहील. काल भैरव जयंतीला निशिता पूजा महत्त्वपूर्ण आहे, जिथे तंत्र आणि मंत्र पद्धती केल्या जातात. काल भैरव जयंतीचा निशिता मुहूर्त रात्री 11:39 ते 12:32 पर्यंत राहील.

Zodiac Sign: संकष्टी चतुर्थी आणि शिव गौरी योगामुळे या राशीच्या लोकांना होणार फायदा

कालभैरव जयंतीच्या दिवशी ब्रम्ह मुहूर्त पहाटे 4.56 ते 5.49 पर्यंत राहील. त्या दिवशी अभिजित नसेल. यावेळी राहूकाळ दुपारी 12.5 ते 1.26 पर्यंत असेल.

काल भैरवाची उत्पत्ती कशी झाली

स्कंद पुराणानुसार, ब्रह्मदेव एकदा गर्विष्ठ झाले आणि त्यांनी रागाच्या भरात भगवान शिवाचा अपमान केला. यामुळे त्यांना राग आला आणि त्यांचे चौथे डोके जळून गेले. त्यानंतर भगवान शिवाने कालभैरवाची निर्मिती केली. शिवाच्या आज्ञेनुसार कालभैरवाने ब्रह्मदेवाचे चौथे मस्तक कापले.

यामुळे, त्याच्यावर ब्रह्महत्येच्या पापाचा आरोप करण्यात आला होता. या पापापासून मुक्त होण्यासाठी काळभैरव शिवनगरी काशीला गेला. तो ब्रह्महत्येच्या पापापासून मुक्त झाला. त्यानंतर काळभैरव कायमचा काशीतच राहिला.

Sankashti Chaturthi 2025: संकष्टी चतुर्थीच्या दिवशी गणपती बाप्पाला या गोष्टीचा दाखवा नैवेद्य, सर्व दुःखातून होईल सुटका

कालभैरव जयंतीचे महत्त्व

कालभैरव यांना काशीचा कोतवाल या नावाने देखील ओळखले जाते. या दिवशी त्यांची पूजा करण्याला विशेष महत्त्व आहे. असे मानले जाते की या दिवशी त्यांची पूजा केल्याने सर्व भीती, शत्रू आणि अडथळे दूर होतात. याशिवाय ज्यांच्या कुंडलीमध्ये राहू-केतू किंवा शनि दोष आहे त्यांच्यासाठी या दिवशी भैरवाची पूजा करणे खूप फायदेशीर मानले जाते. तंत्र आणि मंत्र पद्धतींसाठी देखील या तिथीचे विशेष महत्त्व आहे.

(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)

💡

Frequently Asked Questions

  • Que: कालभैरव जयंती कधी आहे?

    Ans: कालभैरव जयंती बुधवार, 12 नोव्हेंबर रोजी अष्टमी तिथीला आहे.

  • Que: कालभैरव जयंतीच्या दिवशी पूजा करण्यासाठी मुहूर्त काय आहे

    Ans: कालभैरव जयंतीच्या दिवशी निशा काळामध्ये पूजा केली जाणार आहे

  • Que: कालभैरव दिवसाचे महत्त्व काय आहे

    Ans: कालभैरव हे भगवान शिवाचे भयंकर रुप आहे. या दिवशी पूजा केल्याने अडथळे दूर होतात असे म्हटले जाते.

Web Title: Kaal bhairav jayanti 2025 shubh muhurat importance worship of the fierce form of lord shiva

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 08, 2025 | 09:46 AM

Topics:  

  • astrology news
  • dharm
  • religions

संबंधित बातम्या

Numberlogy: पितृपक्षाचा पहिला दिवस सर्व मुलांकांच्या लोकांसाठी कसा राहील जाणून घ्या
1

Numberlogy: पितृपक्षाचा पहिला दिवस सर्व मुलांकांच्या लोकांसाठी कसा राहील जाणून घ्या

Pitru Paksha: २७ सप्टेंबरला पितृपक्षातील पहिले श्राद्ध, जाणून घ्या तर्पण दान करण्याचे महत्त्व
2

Pitru Paksha: २७ सप्टेंबरला पितृपक्षातील पहिले श्राद्ध, जाणून घ्या तर्पण दान करण्याचे महत्त्व

Raj Panchak: राज पंचकात जन्मलेल्या मुलांमध्ये असतात ‘हे’ खास गुण, स्वभाव असतो इतरांपेक्षा वेगळा
3

Raj Panchak: राज पंचकात जन्मलेल्या मुलांमध्ये असतात ‘हे’ खास गुण, स्वभाव असतो इतरांपेक्षा वेगळा

Garuda Purana: संध्याकाळच्या वेळी घरामध्ये केर का काढू नये? जाणून घ्या गरुडपुराणाशी काय आहे संबंध
4

Garuda Purana: संध्याकाळच्या वेळी घरामध्ये केर का काढू नये? जाणून घ्या गरुडपुराणाशी काय आहे संबंध

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.