फोटो सौजन्य- pinterest
कामिका एकादशीला हिंदू धर्मात खूप महत्त्व आहे. ही एकादशी भगवान विष्णू आणि लक्ष्मीच्या पूजेसाठी समर्पित आहे. या दिवशी भक्त उपवास पाळतात आणि विधीपूर्वक पूजा करतात. त्यासोबतच या दिवशी दानधर्म देखील करण्याला विशेष महत्त्व आहे. उपवासासोबतच या दिवशी काही खास गोष्टींचे दान केल्याने भक्ताला अनेक पटींनी फायदे मिळतात असे म्हटले जाते. कामिका एकादशीच्या दिवशी कोणते उपाय करावे, जाणून घ्या.
कामिका एकादशीची तिथी 20 जुलै रोजी दुपारी 12.12 वाजता सुरु होणार आहे. तर 21 जुलै रोजी सकाळी 9.38 वाजता संपेल. उद्यतिथीनुसार एकादशीचे व्रत 21 जुलै रोजी पाळले जाणार आहे. तसेच कामिका एकादशीच्या दिवशी गुरु पुष्य योग, सर्वार्थ सिद्धि योग आणि अमृत सिद्धि योग देखील तयार होत आहे.
कामिका एकादशीच्या दिवशी पिवळ्या वस्तूंचे दान करणे खूप चांगले मानले जाते. कारण भगवान विष्णूंना पिवळा रंग खूप आवडतो. असे म्हटले जाते की या दिवशी पिवळे कपडे दान केल्याने भगवान विष्णूंचा आशीर्वाद मिळतो. तसेच घरात सुख-शांती राहते.
या दिवशी तुम्ही हंगामी फळे आणि पिवळ्या मिठाईचे दान करू शकता. या दानामुळे गरिबी दूर होते आणि घरात अन्न आणि संपत्ती वाढते.
अन्नधान्य दान करणे हे महादान मानले जाते. कामिका एकादशीला तांदूळ, डाळी, गहू किंवा इतर धान्य दान केल्याने घरात कधीही अन्नाची कमतरता भासत नाही आणि भगवान विष्णूंचा आशीर्वाद मिळतो. विशेषतः या दिवशी तांदूळ दान करणे खूप शुभ मानले जाते, कारण ते फायदेशीर मानले जाते.
पितरांच्या शांतीसाठी तिळाचे दान करणे विशेष मानले जाते. कामिका एकादशीला काळे किंवा पांढरे तीळ दान केल्याने पूर्वजांना मोक्ष मिळतो आणि त्यांच्या आत्म्याला शांती मिळते. तसेच सर्व पापांचा नाश होतो.
कामिका एकादशीला शुद्ध तूपाचे दान करणेदेखील फायदेशीर मानले जाते. असे म्हटले जाते की ते दान केल्याने आरोग्य आणि समृद्धी मिळते.
कामिका एकादशीच्या दिवशी खऱ्या मनाने दान करावे.
तसेच दान करताना नेहमी ब्राम्हण किंवा गरजू व्यक्तीला करावे.
शक्यतो सूर्यास्तानंतर दान करु नये
दिवसभरात कधीही दान करु शकता.
(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)