फोटो सौजन्य- pinterest
श्रावण महिन्याची सुरुवात गुरुवार, 24 जुलैपासून होत आहे. हा महिना भगवान शिवाला समर्पित आहे. यावेळी भक्तांनी योग्य पद्धतीने शिवाची पूजा केल्यास व्यक्तीच्या सर्व इच्छा पूर्ण होतात, अशी मान्यता आहे. हिंदू धर्मामध्ये श्रावण महिन्याला विशेष महत्त्व आहे. श्रावण महिन्यामध्ये शिवलिंगावर पाण्यासोबत या वस्तू अर्पण केल्याने महादेव प्रसन्न होतात आणि भक्तांवर त्यांची कृपा राहते, अशी मान्यता आहे. तसेच व्यक्तीच्या जीवनामधील दुःख आणि अडथळे दूर होण्यास मदत होते. शिवलिंगावर कोणत्या गोष्टी अर्पण केल्याने महादेवांचा विशेष आशीर्वाद मिळतो, ते जाणून घ्या
शिवलिंगावर गंगाजल अर्पण करणे खूप फायदेशीर मानले जाते. त्यामुळे महादेव प्रसन्न होतात आणि त्यांचा भक्तांवर आशीर्वाद राहतो, अशी मान्यता आहे. तसेच श्रावणामध्ये शिवलिंगावर गंगाजल अर्पण केल्याने सर्व ग्रहदोषांचे परिणाम कमी होतात आणि जीवनातील नकारात्मकता दूर होऊन सकारात्मकता वाढते.
शिवलिंगावर पाण्यासोबत दूध मिसळून ते अर्पण करणे खूप फायदेशीर मानले जाते. असे मानले जाते की, त्यामुळे व्यक्तीच्या जीवनातील सर्व दुःखामधून मुक्तता होते. त्यासोबतच व्यक्तीला मानसिक शांती देखील मिळते. तसेच कुटुंबामध्ये सुख शांतीचे वातावरण राहते. जर तुमच्या घरामध्ये वारंवार समस्या उद्भवत असल्यास हा उपाय करणे खूप फायदेशीर आहे. यामुळे घरामध्ये येणाऱ्या समस्या दूर होण्यास मदत होते.
सकाळी लवकर उठल्याने आंघोळ करुन स्वच्छ कपडे परिधान करावे. पाण्यामध्ये थोडे मध टाकून ते शिवलिंगावर अर्पण करावे. यामुळे व्यक्तीला खूप शुभ परिणाम मिळतात तसेच व्यक्तीला जीवनातील येणाऱ्या अडथळ्यांपासून मुक्ती मिळते. जर तुम्ही करिअर आणि व्यवसायामध्ये समस्या असल्यास त्या दूर होण्यास मदत होते.
शिवलिंगावर पाणी अर्पण करताना त्यात चंदन टाकून ते अर्पण करणे शुभ मानले जाते. असे केल्याने व्यक्तीच्या जीवनामध्ये आनंद येतो. तसेच व्यक्तीच्या जीवनामध्ये येणारी दुःख दूर होतात.
शिवलिंगावर पाण्यासोबत दही अर्पण करणे खूप फायदेशीर मानले जाते. त्यामुळे व्यक्तीच्या जीवनातील समस्या दूर होतात. त्यासोबतच मानसिक शांती देखील मिळते. तसेच आर्थिक समस्या देखील दूर होतात. दह्यासोबतच तुम्ही शिवलिंगावर बेलपत्र, धतुरा, पांढरी फुले देखील अर्पण करू शकता.
(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)