फोटो सौजन्य- pinterest
चंद्र देव दर महिन्याला काही दिवसांसाठी अस्त होतो. ज्यावेळी चंद्र देव अस्त होतो त्यावेळी त्याचा परिणाम सर्व राशींच्या लोकांवर शुभ आणि अशुभ प्रकारे होतो. आता जुलै महिन्यामध्ये चंद्र देव तीन दिवसांसाठी अस्त होणार आहे. आता तो 11 जुलै ते 9 ऑगस्टपर्यंत अस्त राहील. त्यानंतर 24 जुलै रोजी सकाळी 4.44 वाजता मावळेल आणि 26 जुलैला रात्री 8.34 वाजता उगवेल. यावेळी चंद्र कर्क राशीमध्ये असेल. परंतु तो कर्क राशीत संक्रमण करण्यापूर्वी मिथुन राशीत अस्तवेल आणि कन्या राशीत उगवेल.
तसे बघायला गेल्यास 24 जुलै रोजी सकाळी 10.58 वाजता मावळल्यानंतर चंद्र कर्क राशीत संक्रमण करेल जिथे तो 26 जुलै रोजी दुपारी 3.51 पर्यंत असेल. मावळताना बहुतेक वेळा चंद्र कर्क राशीत राहील. यावेळी कर्क राशीच्या लोकांना याचा विशेष फायदा होणार आहे. जुलै महिन्यामध्ये चंद्राच्या अस्तामुळे कर्क राशीशिवाय इतर कोणत्या राशींच्या लोकांना फायदा होईल, जाणून घ्या
चंद्र मावळत्या स्थितीत असल्याने कर्क राशीच्या लोकांना सर्वाधिक फायदा होणार आहे. या लोकांच्या व्यवसायात स्थिरता आल्यामुळे या लोकांवरील मानसिक ताण कमी होईल. जर तुम्ही काही काळापासून नोकरीच्या शोधात असाल तर तुम्हाला लवकरच इच्छित नोकरीची संधी मिळेल. विवाहित लोकांना सुख समृद्धी लाभेल तसेच तुम्हाला चांगल्या बातम्या ऐकायला मिळू शकतात.
चंद्राचे अस्त होणे सिंह राशीच्या लोकांसाठी फायदेशीर राहणार आहे. कारण चंद्र या राशीमध्ये राहून अस्त होणार आहे. दुकानदार आणि व्यावसायिकांना आर्थिक समस्यांपासून मुक्तता मिळेल आणि अचानक आर्थिक लाभ होईल. कुटुंबामध्ये आनंदाचे वातावरण राहील. घरातील ज्येष्ठ व्यक्तीचे आरोग्य चांगले राहील. जे लोक नवीन नोकरी शोधत आहेत त्यांना नशिबाची साथ मिळेल आणि हळूहळू सर्व कामे पूर्ण होतील.
कर्क आणि सिहं राशीच्या व्यक्तिरिक्त चंद्र अस्ताचा लाभ कन्या राशीच्या लोकांना देखील होणार आहे. जर एखाद्याच्या नात्यांमध्ये मतभेद असल्यास ते दूर होतील. जर तुम्ही धार्मिक स्थळाला जाण्याचा विचार करत असाल तर ते तुमच्यासाठी फायदेशीर राहील किंवा वृद्ध लोक धार्मिक यात्रेला जात असतील तर त्यांना आरोग्याची साथ मिळेल. या लोकांना गुंतवणुकीसाठी काळ चांगला आहे. दुकानदारांची आर्थिक स्थिती पूर्वीपेक्षा चांगली होईल. व्यवसाय करणाऱ्यांसाठी हा काळ अनुकूल राहील.
(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)