फोटो सौजन्य- istock
व्रत वैकल्यांचा सर्वांत पवित्र महिना श्रावण. हा महिना श्रद्धा आणि भक्तीने भरलेला आहे. या महिन्यामध्ये अनेक व्रत वैकल्ये सण उपवास येत आहे. तर दुसरीकडे ग्रहांच्या सतत होणाऱ्या हालचालींमुळे हा महिना विशेष महत्त्वाचा ठरणारा आहे. ज्यावेळी मंगळ ग्रह सिंह राशीमध्ये प्रवेश करणार आहे त्यावेळी खप्पर योग तयार होईल. ज्योतिषशास्त्रात ही एक महत्त्वाची घटना मानली जाते. हा योग 13 ऑगस्टपर्यंत राहणार आहे. मात्र हा योग भयंकर आणि अशुभ मानला जातो. यावेळी व्यक्तीच्या जीवनावर मानसिक, आर्थिक आणि वैवाहिक जीवनात देखील परिणाम होऊ शकतो.
ज्योतिषशास्त्रानुसार, ज्यावेळी सूर्य आणि मंगळ हे ग्रह एकत्र येतात त्यावेळी त्याचा प्रभाव सर्व राशीच्या लोकांवर पडतो. त्यामुळे काही राशीच्या लोकांना आव्हानांना तोंड द्यावे लागते तर काहींसाठी हा काळ शुभ असतो. या काळात राग, अहंकार आणि सत्ता संघर्षाची शक्यता वाढते, ज्यामुळे अपघात आणि तणावपूर्ण परिस्थिती निर्माण होऊ शकते. त्यामुळे या काळामध्ये काही राशीच्या लोकांना सावधगिरी बाळगावी लागते. त्याचप्रमाणे, सप्टेंबरमध्ये कन्या राशीत बुधचा प्रवेश भद्रा राजयोग निर्माण करेल, ज्यामुळे काही राशींना आर्थिक लाभ होण्याची शक्यता निर्माण होईल. भद्रा आणि खप्पर योगामुळे कोणत्या राशीच्या लोकांना सावध राहावे लागणार आहे, जाणून घ्या
खप्पर योग हा ज्योतिषशास्त्रातील अत्यंत अशुभ असा योग आहे. जो मंगळ आणि सूर्य ग्रह एका विशिष्ट खगोलीय स्थितीत आल्यावर तयार होतो. या योगाला जीवनामधील ताणतणाव, संघर्ष, नुकसान आणि विनाशकारी घटनांचे सूचक मानले जाते. ज्यावेळी मंगळ सूर्याच्या नक्षत्रात प्रवेश करतो म्हणजे त्तर फाल्गुनी, कृतिका, उत्तराषाद प्रवेश करतो त्यावेळी खप्पर योग तयार होतो. सूर्य आणि मंगळाचा संयोग किंवा एकमेकांच्या नक्षत्रात असलेला प्रभाव काही लोकांमध्ये आकर्षक आणि संघर्ष निर्माण करणारी ऊर्जा असते. यामुळे व्यक्तीच्या जीवनामध्ये चुकीचे निर्णय, वाद, अपघात आणि नातेसंबंधांमध्ये संघर्ष निर्माण होऊ शकतात.
या योगामुळे मिथुन राशीच्या लोकांना मानसिक ताण येऊ शकतो. या लोकांना बोलण्यावर नियंत्रण ठेवावे लागेल. त्याचप्रमाणे हे लोक नकळत वाद आणि संघर्षामध्ये अडकण्याची शक्यता असते. नातेसंबंधांमध्ये दुरावा येऊ शकतो. कामाच्या ठिकाणी गैरसमज निर्माण होऊ शकतात. त्यामुळे या राशीच्या लोकांनी बोलण्यात वागण्यामध्ये संयम आणि सावधगिरी बाळगावी.
खप्पर योगाचा प्रभाव कर्क राशीच्या लोकांवर पडताना दिसू शकतो. यामुळे या लोकांच्या कौटुंबिक जीवनामध्ये असंतोष आणि कलह निर्माण होऊ शकतो. कुटुंबातील सदस्यांमधील वाद वाढू शकतात, ज्याचा परिणाम मानसिक शांतीवर होऊ शकतो. ज्यांना आर्थिक गोष्टींचा ताण आहे त्यांच्यामधील आत्मविश्वास कमी होऊ शकतो. हा काळ आव्हानात्मक असू शकतो. महत्त्वाचे निर्णय घेताना काळजी घ्यावी.
या काळामध्ये कन्या राशीच्या लोकांच्या जीवनात करिअर आणि नोकरीशी संबंधित समस्या येऊ शकतात. वरिष्ठ अधिकाऱ्यांशी मतभेद होऊ शकतात, ज्यामुळे कामाच्या ठिकाणी तणाव वाढेल. पदोन्नतीमध्ये अडथळे येऊ शकतात. मोठे निर्णय घेण्यास विलंब होऊ शकतो.
यावेळी वृश्चिक राशीच्या लोकांवर मालमत्ता किंवा कायदेशीर बाबींमध्ये गुंतागुंत होऊ शकते. त्याचप्रमाणे न्यायालयीन खटले आणि मालमत्तेच्या संबंधित गोष्टींवर वाद होऊ शकतात. ज्यामुळे तुमच्या वरील मानसिक ताण वाढू शकतो. तसेच आरोग्याची काळजी घ्यावी लागेल. समस्या सोडवण्यासाठी संयम आणि संयम आवश्यक असेल.
(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)