Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 11 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • Navbharat Conclave
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

घरात Wind Chime लावण्याचे फायदे कोणते?

फेंगशुईमध्ये Wind Chime (विंड चाइम) ला विशेष महत्त्व आहे. विंड चाइममध्ये अनेक प्रकार येतात त्यापैकी असे काही प्रकार असतात ज्यामध्ये आवाज येतो. घरात हे ठेवल्याने त्याचे अनेक फायदे मिळतात असे म्हटले जाते. मात्र ते घरात लावण्याची योग्य पद्धत आणि दिशा माहिती असायला हवी.

  • By प्राजक्ता प्रधान
Updated On: Sep 23, 2024 | 10:22 AM
फोटो सौजन्य- istock

फोटो सौजन्य- istock

Follow Us
Follow Us:

विंड चाइममुळे घरातील नकारात्मकता दूर होते. घरात सकारात्मक ऊर्जा पसरते. वास्तू दोष दूर होतो. घर प्रसन्न राहातं, त्यातून येणाऱ्या मधूर आवाजमुळे घरातील नकारात्मक भाव दूर होतात. घर प्रसन्न राहातं.

फेंगशुईमध्ये विंड चाइमला सकारात्मकतेचे प्रतीक मानले जाते. विंड चाइम जीवनाशी संबंधित सर्व समस्या दूर करून सुख-समृद्धी आणतात असे मानले जाते.फेंगशुईच्या मते, विंड चाइम्सद्वारे, तुम्ही तुमच्या आजूबाजूला वाहत असलेल्या नकारात्मक ऊर्जेचे सकारात्मक उर्जेमध्ये रूपांतर होते.विंड चाइम वेगवेगळ्या धातू आणि पद्धतींनी बनलेले असतात. फेंगशुईमध्येही त्यांचे वेगवेगळे उपयोग आहेत.

फेंगशुईनुसार दुष्ट आत्मा दूर करण्यासाठी घरात विंड चाइम लावणे खूप शुभ मानले जाते. असे मानले जाते की, गोड आवाज कौटुंबिक जीवनात सकारात्मक ऊर्जा देतात आणि नकारात्मकतेपासून मुक्ती देतात. विंड चाइम्सचा मधुर आवाज संपत्ती, आनंद, समृद्धी आणि सकारात्मक ऊर्जा आकर्षित करतो. मात्र, घरात विंड चाइम लावताना फेंगशुईच्या काही गोष्टींची काळजी घेणे अत्यंत अनिवार्य मानले जाते. घर किंवा ऑफिसमध्ये विंड चाइम लावताना दिशेची विशेष काळजी घ्यावी. असे मानले जाते की विंड चाइम चुकीच्या दिशेने ठेवल्यास नकारात्मक परिणाम होतात. घरात विंड चाइम लावण्यासाठी फेंगशुई टिप्स जाणून घेऊया.

फेंगशुई टिप्स

फेंगशुईनुसार, चांदीच्या रंगाच्या पाच रॉडसह धातूपासून बनवलेले विंड चाइम घराच्या पश्चिम दिशेला लावावेत. यामुळे कुटुंबातील सदस्यांना मानसिक शांती मिळते आणि जीवनात सुख-समृद्धी येते.

हेदेखील वाचा- वास्तुशास्त्रानुसार तुमचे घर कसे असावे? जाणून घ्या

सोनेरी किंवा पिवळ्या रंगाचे धातूचे विंडचाइम घराच्या किंवा खोलीच्या उत्तर-पश्चिम दिशेला लावावेत. असे मानले जाते की, यामुळे कुटुंबातील सदस्यांना प्रगतीच्या नवीन संधी मिळतील आणि परदेशात जाण्याची शक्यता आहे.

पूर्व, दक्षिण-पूर्व किंवा दक्षिण दिशेला लाकडापासून बनवलेले विंड चाइम लावणे उत्तम मानले जाते. दक्षिण-पूर्व दिशेला लाकडी विंड चाइम लावल्याने धनसंपत्ती मिळते आणि कौटुंबिक जीवन सुखी राहते, असे म्हटले जाते.

याशिवाय घराच्या दक्षिण-पश्चिम दिशेला सिरॅमिक विंड चाइम लावू शकता.

दिशा लक्षात घेऊन तुम्ही तुमच्या घराच्या किंवा ऑफिसच्या कोणत्याही दरवाजाजवळ किंवा खिडकीजवळ विंड चाइम लावू शकता.

हेदेखील वाचा- मूलांक 6 असलेल्यांचा आजचा दिवस कसा असेल ते जाणून घेऊया

विंड चाइम्सचे महत्त्व

फेंगशुईनुसार काही वस्तू घरात ठेवल्याने सुख-समृद्धी वाढते आणि घरातील लोकांचे नाते चांगले राहते. विंड चाइम्स किंवा विंड बेल्स हे फेंगसुई उपायांशी संबंधित असेच एक सुंदर वाद्य आहे, जे घरात लावल्याने आजूबाजूला निर्माण होणारी नकारात्मक ऊर्जा दूर होते आणि सकारात्मक ऊर्जा प्रवाहित होते. वारा वाहत असताना विंड चाइम्सच्या घंटा एकमेकांवर आदळतात तेव्हा त्यातून निघणारा मधुर आवाज मनाला शांती देतो.

 

Web Title: Know the benefits to plant wind chime in your house

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 23, 2024 | 10:22 AM

Topics:  

  • Vastu Shastra
  • Vastu Tips

संबंधित बातम्या

Vastu Tips: सेकंड हँड वस्तू खरेदी करताय? घरात आणण्यापूर्वी जाणून घ्या वास्तूचे नियम
1

Vastu Tips: सेकंड हँड वस्तू खरेदी करताय? घरात आणण्यापूर्वी जाणून घ्या वास्तूचे नियम

Vastu Tips: पोळपाट-लाटण्याशी संबंधित ‘या’ चुका ठरू शकतात गरिबीचे कारण; सुख-समृद्धीवर होऊ शकतो परिणाम
2

Vastu Tips: पोळपाट-लाटण्याशी संबंधित ‘या’ चुका ठरू शकतात गरिबीचे कारण; सुख-समृद्धीवर होऊ शकतो परिणाम

Vastu Tips For kitchen: स्वयंपाकघरातील या वस्तू संपल्यास वाढू शकतात आर्थिक अडचणी, काय आहेत वास्तुशास्त्राचे नियम
3

Vastu Tips For kitchen: स्वयंपाकघरातील या वस्तू संपल्यास वाढू शकतात आर्थिक अडचणी, काय आहेत वास्तुशास्त्राचे नियम

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.