फोटो सौजन्य- istock
ज्योतिषशास्त्रामध्ये शनि हा कर्माचा दाता आणि न्यायाचा देव मानला जातो. शनी सध्या कुंभ राशीत आहे, सुमारे 30 वर्षांनी शनी कुंभ राशीत आला आहे. शनी कुंभ राशीत असल्यामुळे मकर, कुंभ आणि मीन राशीच्यालोकांवर शनीच्या साढेसतीचा प्रभाव पडतो. कुंभ राशीच्या लोकांसाठी शनीच्या सादेसतीचा दुसरा चरण सुरू आहे. अशा स्थितीत कुंभ राशीच्या लोकांना काही समस्यांना सामोरे जावे लागू शकते. ज्योतिषशास्त्रात काही अशा रत्नांबद्दल सांगितले गेले आहे की, जे धारण केल्याने शनि कृपा आहे असे मानले जाते.
हेदेखील वाचा- घरगुती त्रासांपासून मुक्ती मिळवण्यासाठी या वास्तुच्या सोप्या उपायांबद्दल जाणून घ्या
कुंभ राशीच्या लोकांसाठी ही रत्ने धारण करणे शुभ असते
ज्योतिषशास्त्रानुसार, कुंभ राशीच्या लोकांना नीलम रत्न धारण केले पाहिजे. कुंभ राशीच्या लोकांसाठी नीलम रत्न धारण करणे फायदेशीर आहे. असे म्हटले जाते की, हे रत्न धारण केल्याने कुंभ राशीच्या लोकांना शुभ परिणाम प्राप्त होतात. जीवनात संपत्ती वाढते.
हेदेखील वाचा- रक्षाबंधनाच्या दिवशी राशीनुसार बहिणीला कोणते गिफ्ट द्यावे, ते जाणून घ्या
कोणत्या दिवशी अंगठी घालायची
शनिदेवाचा आशीर्वाद मिळविण्यासाठी कुंभ राशीच्या लोकांनी शनिवारी सोन्याच्या अंगठीत चार रत्ती नीलम धारण करावे. मधल्या बोटात धारण करणे शुभ मानले जाते.
या राशीच्या लोकांनी नीलम धारण करू नये
रत्नशास्त्रानुसार, मेष, सिंह, धनु, कर्क, वृश्चिक व मीन राशींच्या लोकांनी नीलम रत्न धारण करु नये. ज्योतिषशास्त्रानुसार, जर तुम्ही हे रत्न धारण केले तर तुम्हाला अडचणींचा सामना करावा लागू शकतो.
मकर राशीच्या लोकांनी हे रत्न धारण करावे
मकर राशीवर शनीचे राज्य आहे. अशा स्थितीत या राशीच्या लोकांनी शनीची कृपा मिळवण्यासाठी नीलम धारण करावा. असे म्हटले जाते की, हे रत्न धारण केल्याने शनीची साडेसाती आणि धैयाचा अशुभ प्रभाव कमी होतो.