Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Krishna Janmashtami 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Mahabharat Katha: शेवटचा श्वास घेताना दुर्योधनाने श्रीकृष्णाला का दाखवली 3 बोटं? द्वारकाधिशाने काय केले

महाभारतामध्ये अनेक कथा आहेत, ज्या अजूनही अनेकांना माहीत नाहीत. दुर्योधन जेव्हा युद्धात धारातिर्थी पडला होता तेव्हा त्याने भगवान श्रीकृष्णाला आपली ३ बोटं दाखवली होती, काय होता अर्थ? जाणून घ्या

  • By दिपाली नाफडे
Updated On: Jul 29, 2025 | 12:34 PM
दुर्योधनाने मरताना श्रीकृष्णाला का दाखवली तीन बोटं (फोटो सौजन्य - Google Gemini AI)

दुर्योधनाने मरताना श्रीकृष्णाला का दाखवली तीन बोटं (फोटो सौजन्य - Google Gemini AI)

Follow Us
Close
Follow Us:

महाभारतामध्ये अनेक कथा आहेत आणि आपण कितीही मोठे झालो तर पौराणिक कथा वाचताना कधीही कंटाळा येत नाही. दुर्योधनाचा जेव्हा शेवट जवळ आला तेव्हा काय घडले तुम्हाला माहीत आहे का? महाभारताचे युद्ध त्याच्या शेवटच्या टप्प्यात होते. दुर्योधनाचा अभिमान भंग पावत होता. हा तोच दुर्योधन होता ज्याला त्याच्या सैन्याचा आणि धैर्याचा खूप अभिमान होता. सर्वांच्या समजूतीनंतरही तो पांडवांना पाच गावे देण्यास तयार नव्हता आणि शांतीचा मार्ग स्वीकारण्यास तयार नव्हता. 

अखेर युद्धाच्या शेवटी तो जमिनीवर पडला होता. पराक्रमी भीमाच्या गदेच्या हल्ल्याने तो गंभीर जखमी झाला होता आणि तो त्याचे शेवटचे श्वास मोजत होता. मग तो वारंवार भगवान श्रीकृष्णाकडे बोट दाखवू लागला. शेवटी, दुर्योधन त्याच्या शेवटच्या क्षणी पांडवांना साथ देणाऱ्या कृष्णाकडे बोट का दाखवत होता? महाभारताची ही रंजक कहाणी जाणून घेऊया (फोटो सौजन्य – Google Gemini AI) 

श्रीकृष्णाकडे का दाखवले बोट?

महाभारताच्या काळात दुर्योधन आणि भीम यांच्यात भयंकर युद्ध झाले. त्यानंतर भीमाच्या शक्तीशाली गदेच्या वारामुळे दुर्योधन रक्ताने माखला होता. दुर्योधनाला त्याचा मृत्यू जवळ येत असल्याचे दिसले. मग त्याने श्रीकृष्णाकडे तीन बोटे उंचावून काहीतरी बोलण्याचा प्रयत्न केला. जेव्हा श्रीकृष्णाने दुर्योधनाला पाहिले तेव्हा तो त्याच्या जवळ गेला आणि त्याला काय म्हणायचे आहे हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर दुर्योधनाने शेवटच्या क्षणी त्याच्या चुकांबद्दल सांगितले.

Mahabharat: महाभारत युद्ध कुरुक्षेत्रात या विध्वंसक शस्त्रांनी लढले, क्षणार्धात झाला होता विनाश

काय घडली दुर्योधनाची पहिली चूक 

दुर्योधनाने श्रीकृष्णाला सांगितले की त्याने महाभारताच्या काळात तीन चुका केल्या. यामुळेच तो युद्ध जिंकू शकला नाही आणि आता तो स्वतःच आपला जीव जाताना पाहत आहे. जर त्याने या चुका केल्या नसत्या तर त्याचा विजय निश्चित झाला असता. मग दुर्योधन म्हणाला की त्याची पहिली चूक म्हणजे त्याने नारायणाची निवड केली नाही तर त्याची नारायणी सेना निवडण्याचा प्रयत्न केला. जर नारायण म्हणजेच श्रीकृष्ण त्याच्यासोबत असते तर तो जिंकू शकला असता.

दुसरी आणि तिसरी मोठी चूक 

दुर्योधनाने मान्य केली चूक

दुर्योधन म्हणतो की माझी दुसरी चूक म्हणजे मी माझ्या आई गांधारी यांच्या वारंवार विनंती करूनही त्यांच्यासमोर नग्न न जाता लंगोट बांधून गेलो. जर मी लंगोट बांधून गेलो नसतो तर कोणत्याही योद्ध्याच्या हल्ल्याचा माझ्या संपूर्ण शरीरावर कोणताही परिणाम झाला नसता आणि कोणीही मला पराभूत करू शकले नसते. मग दुर्योधन त्याच्या शेवटच्या चुकीबद्दल सांगतो. दुर्योधन म्हणतो की माझी तिसरी आणि शेवटची चूक म्हणजे मी शेवटच्या वेळी युद्धात गेलो होतो, तर जर मी आधी युद्धात गेलो असतो तर माझ्या भावांचे आणि नातेवाईकांचे प्राण वाचू शकले असते.

Mahabharat: भगवान श्रीकृष्णाने शिशुपालाचे 100 गुन्हे का माफ केले?

भगवान श्रीकृष्ण काय म्हणाले

यावर श्रीकृष्ण दुर्योधनला समजावून सांगतात की, तुझ्या पराभवाचे मुख्य कारण अधर्माच्या मार्गावर चालणे आणि पांडवांची पत्नी द्रौपदीचे वस्त्रहरण करणे आहे. हेच कारण आहे की तू चुकीची कृत्ये केलीस आणि तुझे भाग्य तूच लिहिले आहेस. श्रीकृष्ण म्हणाले की तू तुझ्या या ३ चुकांमुळे हरला नाहीस तर तू फक्त अधर्माचा मार्ग निवडलास म्हणून हरलास. अशा प्रकारे, शेवटी दुर्योधनला त्याची खरी चूक समजली आणि त्याने प्राण सोडला.

टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra.com या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.

Web Title: Mahabharat katha why duryodhan showed 3 fingers to shri krishna and then told about his mistake

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 29, 2025 | 12:34 PM

Topics:  

  • hindu religion
  • Mahabharat facts
  • Religion

संबंधित बातम्या

Samudrik Shastra: पाठीवर केस असणे शुभ की अशुभ, काय सांगते सामुद्रिकशास्त्र जाणून घ्या
1

Samudrik Shastra: पाठीवर केस असणे शुभ की अशुभ, काय सांगते सामुद्रिकशास्त्र जाणून घ्या

Mahabharat Katha: ‘त्या’ दिवशी सूर्यग्रहण नसते तर अर्जुनाने आत्महत्या करून गमावले असते प्राण, थरारक कथेचे सत्य
2

Mahabharat Katha: ‘त्या’ दिवशी सूर्यग्रहण नसते तर अर्जुनाने आत्महत्या करून गमावले असते प्राण, थरारक कथेचे सत्य

Surya Gochar 2025: सिंह राशीत होणार सूर्य गोचर, 5 राशींना मिळणार जबरदस्त लाभ; पैसाच पेसा येणार!
3

Surya Gochar 2025: सिंह राशीत होणार सूर्य गोचर, 5 राशींना मिळणार जबरदस्त लाभ; पैसाच पेसा येणार!

मृत्यूच्या १ तासाआधी शरीरात दिसून येतात हे ५ संकेत; जाणून घ्या गरुड पुराणातील ते आश्चर्य करणारं रहस्य
4

मृत्यूच्या १ तासाआधी शरीरात दिसून येतात हे ५ संकेत; जाणून घ्या गरुड पुराणातील ते आश्चर्य करणारं रहस्य

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.