
मकर संक्रांतीपासून पुढचे काही दिवस संंमिश्र फलदायी असणार आहे. संयमाने घेतलेले निर्णय भविष्यात फायदेशीर ठरतील. नोकरी बदलण्याचा निर्णय घेत असाल तर ग्रहांची स्थिती तुमच्या बाजूने आहे. आर्थिक बाजू भक्कम राहील. मात्र आरोग्याकडे दुर्लक्ष करु नका. एकंदरितच संक्रांतीपासून पुढचे काही दिवस करिअरच्या दृष्टीने सकारात्मक असला तरी आरोग्याची काळजी घेणं गरजेचं आहे. तसंच प्रवासाचे योग येतील. कुटुंब आणि मित्रपरिवाराबरोबर चांगला वेळ घालवाल. या राशी म्हणजे मेष,सिंह आणि वृश्चिक राशी आहेत.
नोकरदार वर्गासाठी मकर संक्रांतीचा काळ शुभ फळादायी आहे अशा राशी म्हणजे वृषभ, तूळ आणि कर्क राशीच्या मंडळींची आर्थिक बाजू भक्कम राहणार आहे. कौटुंबिक वातावरणात चढउतार पाहायला मिळत आहे. वाहन आणि वास्तू खेरदीबबात सावधानता बाळगणं आवश्यक आहे. तसच मानसिक स्वास्थ जपणं देखील तितकंच महत्वाचं आहे.
मीन,धनू, कुंभ आणि मकर राशीच्या मंडळींनी आरोग्याच्या दृष्टीने हा काळ काळजी घेण्याचा आहे. या मंडळीनी चिंता, तणाव यापासून काही काळ लांब राहणं गरजेचं आहे. संक्रातीच्या नंतर काळ शारिरीक थकवा, चिडचिडेपणा जाणवतो. त्यामुळे प्राणायाम किंवा इष्ट देवतेचं नामस्मरण तुम्हाला फायदेशीर ठरेल. तर मिथुन,मकर आणि कन्या यांनी नोकरी व्यवसायात भागीदारी करताना खबरदारी बाळगणं गरजेचं आहे. व्यवहार करताना भावना नाही तर प्रॅक्टिकल विचार करणं फायद्याचं ठरेल.
(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)