यंदाची मकर संक्रात मेष, सिंह, वृश्चिक आणि मीन राशीच्या मंडळींसाठी शुभफळ देणारं आहे. मकरसंक्रातीच्या दोन दिवसांनी म्हणजेच १६ जानेवारीला मंगळाचं गोचर होणार आहे.
मेष
मेष राशीच्या मंडळींसाठी हे गोचर अत्यंत शुभदायी ठरणार आहे. मंगळाच्या गोचरामुळे या मंडळींच्या सर्व इच्छा पूर्ण होणार आहेत. शैक्षणिकदृष्ट्या हे गोचर विद्यार्थ्यांसाठी फायदेशीर आहे. स्पर्धा परिक्षेची तयारी करण्यांना मेहनत घेतली तर यश हमखास मिळणार आहे. जे अविवाहित आहेत अशांना देखील हे गोचर सकारात्मक असणार आहे. या काळात विवाहाचे प्रस्ताव येतील. गुंतवणूक फायदेशीर ठरेल. त्याचबरोबर नोकरदार वर्गाला या काळात पगारवाढीची शक्यता आहे. एकंदरीतच पाहायच झालं तर हे मंगळ गोचर मेषेच्या व्यक्तींना शुभफळ देणारं आहे.
सिंह
कौटुंबिक वातावरणात सकारात्मकता लाभेल. मानसिक तणाव कमी होतील हा काळ तुम्हाला आत्मिक शांतता देणारा ठरेल. त्याचबरोबर तुम्ही जर राजकारण किंवा सामाजिक क्षेत्रात कार्यरत असाला तर या काळात सामाजिक मान सन्मान मिळणार आहे. वैवाहिक आयुष्यात जोडीदाराशी मनमोकळा संवाद घडेल त्यामुळे नातं आणखीनच मजबूत होणार आहे.
वृश्चिक
वृश्चिक राशीच्या मंडळींना हे गोचर सकारात्मक असणार आहे. वृश्चिक राशीचा स्वामी देखील मंगळ असल्याने या मंडळींवर मंगळाची कृपादृष्टी राहिल. वृश्चिक मंडळींना आता पर्यंत जर आर्थिक अडचणी जाणवत होत्या त्या आता कमी होणार असून धनलाभाचा योग आहे. या गोचरामुळे कुंटुबातील किंवा मित्रपरिवाराबरोबर प्रवास घडेल.आता पर्यंत घेतलेल्या मेहनतीला फळ मिळणार आहे. नोकरीत पदोन्नती होणार असून स्वत:ला तुम्ही सिद्ध कराल. त्यामुळे तुमचा आत्मविश्वास देखील वाढणार आहे.
मीन राशीच्या व्यक्तींना देखील हा काळ खूप सकारात्मक फळ देणारा ठरणार आहे. या काळात भाग्याची पूरेपूर साथ मिळेल. बराच काळ अडकलेली कामं आता पूर्ण होतील, नोकरी व्यवसायात पन्नोदती होईल किंवा मेहनतीला फळ मिळणार आहे. करियर आणि शिक्षणाच्या दृष्टीने काळ सकारात्मिक आहे.अविवाहितांना लग्नाचे प्रस्ताव येतील. कौटुंबिक वातावरण सकारात्मक असेल.
(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)






