Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 30 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Mangal Parivartan: डिसेंबरमध्ये मंगळ करणार संक्रमण, 45 दिवस या राशीच्या लोकांच्या समस्येमध्ये होणार वाढ

ग्रहांचा सेनापती मंगळ 7 डिसेंबर रोजी आपली राशी बदलणार आहे. तो वृश्चिक राशीतून प्रवास संपवून संध्याकाळी 7.26 वाजता धनु राशीत प्रवेश करणार आहे. कोणत्या राशीच्य समस्येमध्ये होणार वाढ जाणून घ्या

  • By प्राजक्ता प्रधान
Updated On: Nov 20, 2025 | 02:46 PM
फोटो सौजन्य- pinterest

फोटो सौजन्य- pinterest

Follow Us
Follow Us:
  • डिसेंबरमध्ये मंगळ करणार संक्रमण
  • 45 दिवस या राशीच्या लोकांना जाणवणार समस्या
  • कोणत्या राशीच्या लोकांनी सावध राहावे
 

 

ग्रहांचा सेनापती मंगळ 7 डिसेंबर रोजी आपली राशी बदलणार आहे. तो वृश्चिक राशीतून प्रवास संपवून संध्याकाळी 7.26 वाजता धनु राशीत प्रवेश करेल. मंगळ दर 45 दिवसांनी राशी बदलत असल्याने, हे संक्रमण खूप काळानंतर होत आहे. त्याचे परिणाम सर्व राशीच्या लोकांवर होणार आहे. ज्योतिषशास्त्रात मंगळ ग्रहाला शौर्य, ऊर्जा आणि युद्धाचा कारक मानले जाते. त्याचे हे संक्रमण नेहमी प्रत्येक क्षेत्रावर परिणाम करते. काही राशींच्या लोकांसाठी हा काळ महत्त्वपूर्ण आणि फायदेशीर मानला जातो. तर काहींना वाढत्या समस्यांना तोंड द्यावे लागते. या राशीच्या लोकांना त्यांच्या करिअर, नोकरी आणि मालमत्तेशी संबंधित बाबींमध्ये अडचणी येतात. मंगळाच्या धनु राशीत प्रवेशामुळे कोणत्या राशीच्या लोकांना समस्या जाणवू शकतात ते जाणून घ्या

वृषभ रास

वृषभ राशीच्या लोकांसाठी मंगळाचे संक्रमण आव्हानात्मक असू शकते. या काळात मंगळ सातव्या आणि बाराव्या घरात असेल. धनु राशीत होणारे मंगळाचे संक्रमण आठव्या घरामध्ये संक्रमण करणारे आहे. यामुळे आर्थिक नुकसान, व्यवसायातील समस्या आणि आर्थिक अडचणी येऊ शकतात. जमीन आणि इमारतीशी संबंधित कामांमुळे ताण निर्माण होईल. कामाच्या ठिकाणी तुमचे विरोधक तुमच्यावर वर्चस्व गाजवतील. यावेळी, मुलांशी संबंधित समस्यांबाबत संघर्ष आणि तणाव दोन्ही असतील.

Vivah Panchami 2025: यंदा कधी आहे विवाह पंचमी? जाणून घ्या शुभ वेळ, शुभ योग आणि महत्त्व

कर्क रास

कर्क राशीच्या लोकांसाठी मंगळाचे भ्रमण आव्हानात्मक राहील. कर्क राशीच्या लोकांसाठी, सेनापती मंगळ पाचव्या आणि दहाव्या घरात राज्य करणार आहे. तर हे संक्रमण सहाव्या घरात होईल. या काळात त्यांच्या कारकिर्दीत काही अडथळे येऊ शकतात. व्यवसायामध्ये तुम्हाला अनावश्यक समस्यांना तोंड द्यावे लागू शकते. कामाच्या ठिकाणी तुम्हाला अपमानाचा सामना करावा लागू शकतो. स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना या काळात जास्त मेहनत घ्यावी लागेल. या काळात तुम्हाला आरोग्याची काळजी घ्यावी लागेल. तसेच पोटाच्या समस्या देखील उद्भवू शकतात.

Vastu Tips: घरात कासव आणण्यापूर्वी या गोष्टी ठेवा लक्षात, नोकरी व्यवसायात होईल प्रगती

मकर रास

मकर राशीच्या लोकांसाठी हे संक्रमण बाराव्या घरात होणार आहे. या काळात तुमच्या उत्पन्नामध्ये अपेक्षित यश होईल. नोकरी करणाऱ्यांना अधिक समस्यांना तोंड द्यावे लागू शकते. दरम्यान तुमचे ध्येय साध्य करण्यासाठी तुम्हाला अधिक आव्हानांना तोंड द्यावे लागेल. कोणतेही काम पूर्ण करण्यासाठी खूप मेहनत घेणे गरजेचे आहे. बेरोजगार लोकांना नोकरीसाठी थोडी जास्त वेळ वाट पाहवी लागू शकते. या काळात तुमच्या बोलण्यावर आणि वागण्यावर नियंत्रण ठेवा.

(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)

💡

Frequently Asked Questions

  • Que: मंगळ ग्रह कधी संक्रमण करणार आहे

    Ans: मंगळ ग्रह 7 डिसेंबर रोजी संक्रमण करणार आहे

  • Que: मंगळ ग्रह किती दिवसांनी राशी बदलतो

    Ans: मंगळ ग्रह 45 दिवसांनी राशी बदलतो

  • Que: मंगळ ग्रहाच्या संक्रमणामुळे कोणत्या राशीच्या लोकांना समस्या जाणवणार

    Ans: मंगळ ग्रहाच्या संक्रमणामुळे वृषभ, कर्क आणि मकर राशीच्या लोकांना समस्या जाणवणार

Web Title: Mangal rashi parivartan the problems of people born under this zodiac sign will increase for 45 days

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 20, 2025 | 02:46 PM

Topics:  

  • astrology news
  • dharm
  • religions

संबंधित बातम्या

Shardiya Navratri 2026 Date: शारदीय नवरात्र १० की ११ ऑक्टोबरपासून? तारीख ठरली! जाणून घ्या घटस्थापनेचा शुभ मुहूर्त
1

Shardiya Navratri 2026 Date: शारदीय नवरात्र १० की ११ ऑक्टोबरपासून? तारीख ठरली! जाणून घ्या घटस्थापनेचा शुभ मुहूर्त

Sankashti Chaturthi: मंगळदोष आणि विवाहातील अडथळे दूर करण्यासाठी अंगारकी चतुर्थीला करा हे उपाय
2

Sankashti Chaturthi: मंगळदोष आणि विवाहातील अडथळे दूर करण्यासाठी अंगारकी चतुर्थीला करा हे उपाय

Pitru Paksha: पितृपक्षात राशीनुसार ‘या’ रंगाच्या वस्तूंचे करा दान, पितरांसाठी मानले जाते विशेष
3

Pitru Paksha: पितृपक्षात राशीनुसार ‘या’ रंगाच्या वस्तूंचे करा दान, पितरांसाठी मानले जाते विशेष

Shukra Uday: शुक्राचा उदय मेष राशींसह या राशींच्या लोकांना करिअरमध्ये मिळणार नवीन संधी
4

Shukra Uday: शुक्राचा उदय मेष राशींसह या राशींच्या लोकांना करिअरमध्ये मिळणार नवीन संधी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.