
फोटो सौजन्य- pinterest
कार्तिक महिन्यानंतर मार्गशीर्ष महिन्याची सुरुवात होते. मार्गशीर्षचा महिना हिंदू पंचांगानुसार नववा महिना आहे. या महिन्याला धार्मिक आणि आध्यात्मिकदृष्ट्या विशेष महत्त्व आहे. हिंदू धर्मामध्ये मार्गशीर्ष महिन्याला विशेष महत्त्व आहे. या महिन्यामध्ये देवीची उपासना केल्याने घरामध्ये सुख समृद्धी, धनधान्यामध्ये वृद्धी आणि कुटुंबामध्ये ऐक्य राहते. मार्गशीर्षातील प्रत्येक गुरुवार हा देवीच्या पूजा-अर्चनेसाठी शुभ मानला जातो. विशेष म्हणजे मार्गशीर्ष महिन्यातील शेवटचा गुरुवार महालक्ष्मी व्रत उद्यापनाचा दिवस म्हणून साजरा केला जातो. या महिन्यात प्रत्येक गुरुवारचे व्रत महिला करतात आणि शेवटच्या गुरुवारी विशेष पूजा करून देवीला नॆवैद्य अर्पण करतात. तसेच हळदीकुंकूचे देखील आयोजन केले जाते. महालक्ष्मीचे व्रत हे स्त्रियांनी पाळले जाणारे व्रत म्हणून ओळखले जाते. घरात सुख-शांती, पती-पत्नीमध्ये प्रेम, आणि आर्थिक स्थितीत सुधारणा व्हावी, यासाठी महिला मनोभावे प्रार्थना देखील करतात. शेवटच्या गुरुवारी उद्यापन करण्याची पद्धत, मुहूर्त आणि महत्त्व जाणून घ्या
मार्गशीर्ष महिन्याची सुरुवात 21 नोव्हेंबर रोजी झाली. या महिन्यामध्ये एकूण चार गुरुवार येतात. महालक्ष्मीचे व्रत करणाऱ्या भाविकांसाठी हा गुरुवार खूप शुभ मानला जातो. यंदा मार्गशीर्ष महिन्यातील शेवटचा गुरुवार 18 डिसेंबर रोजी आहे. याच दिवशी महालक्ष्मी व्रताचे उद्यापन केले जाणार आहे.
उद्यापनाच्या दिवशी सकाळी लवकर उठून आवरुन झाल्यानंतर स्वच्छ वस्त्र परिधान करावे. घर स्वच्छ करून चौरंगावर लाल वस्त्र अंथरुन घटाची स्थापना करावी. त्यानंतर कळशामध्ये पाणी, तांदूळ, दुर्वा, सुपारी आणि नाणं ठेवून महालक्ष्मी देवीचा फोटो ठेवून देवीची प्रतिष्ठापना करावी. उद्यापनाच्या दिवशी दानधर्माला देखील विशेष महत्त्व आहे. या दिवशी सुहासिनी किंवा गरजू व्यक्तींना अन्नधान्य आणि वस्तूंचेदेखील दान केले जाते.
मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारी महालक्ष्मी देवीची पूजा करण्याला विशेष महत्त्व आहे. धार्मिक श्रद्धेनुसार, भगद्शवाराच्या कथेतून महालक्ष्मी देवीने समाधान, कृतज्ञता आणि सद्भावनेचे महत्त्व सांगितले गेले आहे. त्यामुळे या दिवशी व्रत कथेचे वाचन करणे, मंत्र जप करणे आणि मनोभावे देवीची पूजा करण्याला विशेष महत्त्व आहे.
मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारी महालक्ष्मी देवीच्या व्रताचे उद्यापन केले जाते. उद्यापन केल्याशिवाय हे व्रत पूर्ण झाले असे मानले जात नाही. धार्मिक श्रद्धेनुसार नियमांचे पालन करून उद्यापन केल्यास देवी प्रसन्न होते आणि घरामध्ये सुख समृद्धी आणि धनधान्याचे आगमन होते असे म्हटले जाते.
(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)
Ans: मार्गशीर्ष महिन्यात केलेल्या गुरुवार व्रताची किंवा लक्ष्मी-नारायण पूजेची सांगता म्हणजे उद्यापन होय. या दिवशी विधीपूर्वक पूजा करून व्रत पूर्ण केले जाते.
Ans: उद्यापन केल्याने व्रताचे पूर्ण फल प्राप्त होते. माता लक्ष्मी आणि भगवान विष्णूची कृपा होऊन घरात सुख-समृद्धी आणि धनवृद्धी होते.
Ans: या उद्यापनामुळे घरात लक्ष्मीचा वास, आर्थिक स्थैर्य, मानसिक शांती आणि वर्षभर शुभफल प्राप्त होते.