फोटो सौजन्य- pinterest
नवीन वर्षांची सुरुवात होण्यासाठी अवघे काही दिवस उरले आहेत. ही 2026 ची सुरुवात असेल. नवीन वर्षाच्या पहिल्या महिन्यात म्हणजेच जानेवारीमध्ये अनेक प्रमुख ग्रह त्यांच्या राशी किंवा हालचाली बदलतील. याचा परिणाम व्यक्तीच्या जीवनावर तसेच सर्व राशींवर होताना दिसून येणार आहे. यावेळी काही राशीच्या लोकांचे नशीब चमकू शकते.
ज्योतिषशास्त्रानुसार तुमच्या जीवनामध्ये सुखसोयी वाढू शकतात. दीर्घकालीन समस्या देखील दूर होऊ शकतात. नवीन वर्षाच्या पहिल्या महिन्यात कोणते ग्रह आपल्या राशी बदलणार आहेत आणि कोणत्या राशीच्या लोकांना फायदा होणार आहे ते जाणून घ्या.
इंग्रजी कॅलेंडरनुसार, नवीन वर्षाची सुरुवात होण्यास आता फक्त काही दिवस शिल्लक आहेत. नवीन वर्षाच्या पहिल्या महिन्यामध्ये सूर्य, शनि, बुध आणि शुक्र असे अनेक मोठे ग्रह त्यांची हालचाल आणि राशी बदलणार आहेत.
सूर्य 10 जानेवारी रोजी उत्तराषाढा नक्षत्रात आणि 15 जानेवारी रोजी मकर राशीत प्रवेश करणार आहे. त्यानंतर बुध 7 जानेवारी रोजी पूर्वाषाढा नक्षत्रात, 15 जानेवारी रोजी उत्तराषाढा नक्षत्रात आणि 17 जानेवारी रोजी मकर राशीत प्रवेश करेल. यानंतर, 16 जानेवारी रोजी मंगळ मकर राशीत प्रवेश करेल. 13 जानेवारी रोजी शुक्र मकर राशीत प्रवेश करेल.
10 जानेवारी रोजी शनि उत्तराषाढा, 21 जानेवारी रोजी श्रावण आणि 31 जानेवारी रोजी धनिष्ठा राशीत प्रवेश करणार आहे. न्यायाची देवता असलेला शनि 20 जानेवारी रोजी स्वतःच्या नक्षत्रात, उत्तराभाद्रपदेत देखील प्रवेश करेल. ज्याचा प्रभाव काही राशीच्या लोकांवर सकारात्मक पडणार आहे. कोणत्या राशीच्या लोकांना फायदा होणार आहे जाणून घ्या
मिथुन राशीच्या लोकांसाठी नवीन वर्ष खूप शुभ राहणार आहे. या राशीच्या लोकांना जानेवारीमध्ये नशिबाची चांगली साथ मिळणार आहे. दीर्घकालीन समस्या सोडवल्या जाऊ शकतात. तुमच्या आर्थिक अडचणी कमी होण्यास सुरुवात होईल. जुन्या गुंतवणुकीतून तुम्हाला अचानक पैसे मिळू शकतात.
कर्क राशीच्या लोकांसाठी हा काळ खूप शुभ असणार आहे. जानेवारीमध्ये या ग्रहांची होणारी हालचाल या राशीच्या लोकांसाठी खूप फायदेशीर राहणार आहे. या काळात तु्म्ही कुटुंबासोबत सहलीला जाऊ शकता. तुम्हाला वडिलोपार्जित संपत्ती मिळू शकते. व्यवसायात वाढ करण्यासाठी हा काळ खूप चांगला आहे. नोकरी करणाऱ्यांना कामाच्या ठिकाणी नवीन जबाबदारी मिळू शकते.
तूळ राशीच्या लोकांसाठी जानेवारीचा महिना खूप शुभ राहणार आहे. या काळात उत्पन्नाचे स्त्रोत वाढतील. तसेच नशिबाची चांगली साथ मिळेल. नोकरी करणाऱ्यांना त्यांच्या कामाच्या ठिकाणी अपेक्षित फायदा होऊ शकतो. तुमच्या अपूर्ण इच्छा पूर्ण होतील. या काळात तुम्हाला शेअर बाजारातून चांगला फायदा देखील होऊ शकतो.
मकर राशीच्या लोकांसाठी जानेवारीचा महिना फायदेशीर राहणार आहे. नवीन महिना या राशीच्या लोकांसाठी अनुकूल राहणार आहे. या काळात तुम्हाला गुंतवणुकीतून फायदा होऊ शकतो. कामाच्या ठिकाणी तुमच्या कामाचे कौतुक होईल. व्यवसायामध्ये अपेक्षित सुधारणा होऊ शकते. कौटुंबिक जीवन चांगले राहील.
(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)
Ans: 2026 च्या सुरुवातीला गुरु (बृहस्पती), शनि, राहू-केतू आणि बुध यांचे महत्त्वाचे गोचर होणार आहे. या ग्रहबदलांचा सर्व राशींवर परिणाम दिसून येईल.
Ans: मकर राशीसह वृषभ, कन्या, वृश्चिक आणि मीन या राशींवर सकारात्मक परिणाम होण्याची शक्यता आहे.
Ans: मकर राशीच्या जातकांसाठी 2026 च्या सुरुवातीला करिअर, व्यवसाय आणि आर्थिक बाबतीत प्रगतीचे संकेत आहेत. रखडलेली कामे पूर्ण होण्याची शक्यता आहे.






