
फोटो सौजन्य- pinterest
नवीन वर्षाच्या सुरुवातीला पहिले संक्रमण होणार आहे. नवीन ऊर्जा आणि संधी आल्या आहेत. मकर राशीत होणारे संक्रमण हे विशेष महत्त्वाचे आहे. जेव्हा बुध, जो बुद्धिमत्ता, वाणी, व्यवसाय आणि निर्णय घेण्याच्या शक्तीचा कारक आहे, त्याची राशी बदलतो तेव्हा त्याचा परिणाम सर्व राशींवर दिसून येतो. प्रत्येक व्यक्तीसाठी याचा प्रभाव वेगवेगळा असतो. हा काळ काही राशींच्या लोकांसाठी खूप फायदेशीर राहणार आहे. बुध ग्रहांचे संक्रमण ज्योतिषशास्त्राच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचे मानले जाते. याचा परिणाम आपल्या कामावर, आर्थिक परिस्थितीवर आणि कौटुंबिक जीवनावर देखील परिणाम करते. बुध संक्रमणाचा कोणत्या राशीच्या लोकांना फायदा होणार आहे ते जाणून घ्या
शनिवार, 17 जानेवारी रोजी सकाळी 10.27 वाजता बुध धनु राशीतून संक्रमण करून मकर राशीत प्रवेश करणार आहे. हे संक्रमण 3 फेब्रुवारीपर्यंत सुरू राहणार आहे. त्यानंतर शनि कुंभ राशीत प्रवेश करेल. या काळात, ग्रहांची स्थिती काही राशींसाठी यश आणि समृद्धी आणेल तर काही राशीच्या लोकांना सावधगिरी बाळगावी लागेल.
बुधाचे मकर राशीतील संक्रमण तीन राशींसाठी विशेष फायदेशीर राहणार आहे. या काळात काही राशींच्या लोकांना त्यांच्या करिअर, शिक्षण, आर्थिक आणि कौटुंबिक जीवनात सकारात्मक परिणाम अनुभवायला मिळतील.
मेष राशीच्या लोकांसाठी हे संक्रमण दहाव्या घरात होणार आहे. हे संक्रमण करिअर, प्रतिष्ठा आणि पितृत्वाशी संबंधित आहे. हे संक्रमण तुम्हाला करिअरमध्ये प्रगती आणि कामाच्या ठिकाणी आदर वाढवेल. या काळात वडिलांशी असलेले तुमचे संबंध अधिक दृढ होतील. या काळात नवीन गोष्टी शिकण्याची आवड वाढेल आणि व्यवसायातील निर्णय यशस्वी होतील.
वृषभ राशीच्या लोकांसाठी हे संक्रमण नवव्या घऱात होणार आहे. याचा संबध नशीब आणि उच्च शिक्षण यांच्याशी संबंधित आहे. या काळात नशीब तुम्हाला नशिबाची साथ मिळेल. कुटुंबाचा पाठिंबा मिळेल. आरोग्य उत्तम राहील आणि तुम्हाला शुभ परिणाम मिळतील. तुमची जीवनशैली अधिक स्थिर होईल आणि तुमच्या कौटुंबिक नात्यांमध्ये सुसंवाद वाढेल.
मकर राशीच्या लोकांसाठी बुध ग्रहांचे हे संक्रमण पहिल्या घरात होणार आहे. याचा संबंध शरीर, आरोग्य आणि व्यक्तिमत्व यांच्याशी संबंधित आहे. या संक्रमणाचा आर्थिक लाभ होऊ शकतो. सामाजिक आदर वाढेल आणि नातेसंबंध मजबूत होतील. या काळात तुम्ही तुमच्या कार्यक्षेत्रात सक्रिय असाल आणि नवीन संधी मिळतील.
बुध ग्रहाचे हे संक्रमण तिन्ही राशींसाठी नवीन संधी आणि जीवनात सकारात्मक बदल आणेल. हा काळ करिअर, आरोग्य, आर्थिक आणि कौटुंबिक जीवनासाठी विशेषतः अनुकूल असेल. या राशीच्या लोकांनी या काळात विचारपूर्वक निर्णय घ्यावेत आणि नवीन योजना सुरू कराव्यात.
(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)
Ans: या दिवशी बुधाची स्थिती अनुकूल होत असल्याने काही राशींना धन, कीर्ती आणि यश मिळण्याच्या संधी वाढतात.
Ans: बुध गोचर काळात कोणती काळजी घ्यावी?
Ans: बुध ग्रहांचे संक्रमण मेष, वृषभ आणि मकर राशीच्या लोकांसाठी फायदेशीर आहे