फोटो सौजन्य- pinterest
जुलैचा महिना काही राशीच्या लोकांसाठी विशेष असणार आहे. या महिन्यामध्ये गुरु, शनि, सूर्य आणि बुध हे ग्रह आपले स्थान आणि हालचाल बदलणार आहे. या बदलाचा काही राशीच्या लोकांवर खोलवर परिणाम होऊ शकतो. महिन्याच्या सुरुवातीलाच म्हणजे 9 जुलै रोजी गुरूचा मिथुन राशीमध्ये प्रवेश करेल. तर 13 जुलै रोजी शनि मीन राशीमध्ये वक्री होणार आहे. 16 जुलै रोजी मध्ये कर्क राशीमध्ये सूर्याचे संक्रमण होणार आहे आणि 18 जुलै रोजी बुध वक्री होणार आहे त्यामुळे काही राशीच्या लोकांना सावधिगिरी बाळगावी लागेल. मेष ते मीन राशीपर्यंतच्या लोकांसाठी कसा राहील जुलैचा महिना, जाणून घ्या
मेष राशीच्या लोकांचा जुलैचा महिना चढ उताराचा राहील. या महिन्यात तुम्ही पैशांची गुंतवणूक योग्य पद्धतीने करावी. या महिन्यात तुम्हाला प्रचंड मेहनत घ्यावी लागेल त्याचे तुम्हाला योग्य ते फळ मिळेल. जुने मित्र परिवार भेटू शकतात. तुम्हाला नशिबाची साथ मिळेल. दैनंदिन कामात अडथळे येऊ शकतात. आर्थिक दृष्टिकोनातून हा काळ तुमच्यासाठी फायदेशीर राहणार आहे.
वृषभ राशीच्या लोकांसाठी जुलैचा महिना चांगला राहणार आहे. या महिन्यामध्ये तुमची स्वप्ने पूर्ण होतील. मालमत्ता खरेदी किंवा विक्री करण्याचा विचार करू शकता. करिअर किंवा व्यवसायामुळे तुम्हाला प्रवास करावा लागू शकतो. व्यवसायासंबंधित लोकांसाठी हा काळ उत्तम असू शकतो. विद्यार्थ्यांना त्यांच्या मेहनतीचा फायदा होईल. मात्र कामाच्या ठिकाणी तुमच्यावर ताण राहील. नातेसंबंधामध्ये कायम गोडवा राहील.
मिथुन राशीच्या लोकांसाठी जुलैचा महिना खास राहणार आहे. हे लोक करिअर आणि व्यवसायाशी संबंधित महत्त्वाचे मोठे निर्णय घेऊ शकतात. नवीन नोकरी शोधणाऱ्या लोकांना नवीन नोकरी मिळू शकते किंवा इच्छित ठिकाणी बदली मिळू शकते. तुम्ही एखाद्या समस्येत असाल तर ती समस्या दूर होईल. व्यवसायामधील अडकलेले पैसे परत मिळतील.
कर्क राशीच्या लोकांसाठी जुलैचा महिना मिश्रित असेल. तुम्हाला कामामध्ये काही अडथळे येऊ शकतात. तुम्हाला तुमच्या वागण्या बोलण्यावर नियंत्रण ठेवावे लागेल. कोणाशीही वाद घालणे टाळा. महिलांनी आरोग्याची काळजी घ्यावी. जे विद्यार्थी स्पर्धा परीक्षेची तयारी करत आहे त्यांना यश मिळेल. या लोकांना मेहनत घ्यावी लागेल. तुम्हाला कोणत्याही कामात निष्काळजीपणा करुन चालणार नाही.
सिंह राशीच्या लोकांसाठी आजचा जुलैचा महिना संमिश्र असणार आहे. व्यवसाय करणाऱ्यांसाठी हा महिना खूप फायदेशीर असणार आहे. उत्पन्नाचे स्त्रोत वाढतील. नवीन व्यवसायाची सुरुवात करणार असाल तर हा महिना चांगला आहे. या महिन्यात तुम्ही नवीन वाहन खरेदी करु शकतात. कामाच्या वरिष्ठांचे मार्गदर्शन मिळेल. कुटुंबामध्ये असलेले मतभेद संपतील.
कन्या राशीच्या लोकांना जुलै महिन्यात नशिबाची साथ मिळेल. कामाच्या ठिकाणी तुमच्यावर तणाव असू शकतो. तुमचे खर्च वाढू शकतात अनावश्यक खर्च करणे टाळा. दीर्घकालीन योजनेमध्ये तुम्ही गुंतवणूक करु शकता. जोडीदारासोबत असलेले मतभेद दूर होतील.
तूळ राशीच्या लोकांसाठी जुलैचा महिना आनंदाचा असेल. हे लोक या महिन्यामध्ये खूप धावपळ करुन आपली कामे पूर्ण करतील. घरगुती वादामुळे तुमचे मन अस्वस्थ राहू शकते. नोकरी करणाऱ्या लोकांना कामाच्या ठिकाणी ताण येऊ शकतो. व्यवसायात सकारात्मक बदल दिसू लागतील.
वृश्चिक राशीच्या लोकांसाठी जुलैचा महिना समिश्र राहील. या लोकांना त्यांच्या खाण्याच्या सवयी, बोलणे आणि वर्तनावर नियंत्रण ठेवावे लागेल, अन्यथा आरोग्य आणि नातेसंबंध दोन्ही बिघडू शकतात. कोणताही निर्णय घेताना विचारपूर्वक घ्यावे घाईमध्ये निर्णय घेऊ नका.
धनु राशीच्या लोकांसाठी जुलैचा महिना सामान्य राहील. काही कामांमध्ये अडथळे येऊ शकतात. नियोजित कामे वेळेवर पूर्ण होतील. या लोकांना पदोन्नती मिळू शकते. जुलैच्या मध्यापर्यंत वडिलोपार्जित मालमत्ता मिळण्यात येणारे अडथळे दूर होऊ शकतात. उत्पन्नात वाढ होण्याची शक्यता मिळेल.
मकर राशीच्या लोकांना जुलैचा महिना मिश्रित परिणाम देणारा राहील. या महिन्यात तुमच्या उत्पन्नापेक्षा जास्त तुमचा खर्च होईल. या महिन्यात तुमचे आर्थिक नुकसान होऊ शकते. जर नवीन कामाची सुरुवात करणार असाल तर हा महिना तुमच्यासाठी अनुकूल आहे.
कुंभ राशीच्या लोकांसाठी जुलैचा महिना शुभ असणार आहे. यावेळी तुमची इच्छित कामे पूर्ण होऊ शकतात. कामाच्या ठिकाणी तुमचा आदर वाढेल आणि तुमची प्रशंसा होईल. उत्पन्नाचे नवीन स्त्रोत निर्माण होतील. धार्मिक आणि सामाजिक कार्यात व्यस्त राहू शकता. करिअर आणि व्यवसायासाठी हा महिना चांगला आहे.
मीन राशीच्या लोकांसाठी हा महिना मिश्रित राहील. नवीन योजना आखत असल्यास त्यात तुम्हाला निश्चितच यश मिळेल. काही कामामध्ये तुम्हाला अडथळे येऊ शकतात. महिलांनी आरोग्याची काळजी घ्यावी. कामाच्या ठिकाणी तुम्हाला ताण येऊ शकतो. न्यायालयाशी संबंधित कोणत्याही प्रकरणाशी संबंधित चिंता दूर होईल.
(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)