फोटो सौजन्य- pinterest
समुद्र देव वरूण यांना समर्पित केलेला हा एक महत्त्वाचा सण आहे. या दिवशी महाराष्ट्र, दक्षिण भारत आणि उत्तर भारतात श्रावण पौर्णिमेच्या दिवशी हा नारळी पौर्णिमेचा सण साजरा केला जातो. नारळी पौर्णिमेचा सण भारताच्या पश्चिम किनारपट्टीवरील मच्छीमार समुदायाद्वारे मोठ्या उत्साहाने आणि आनंदाने साजरा केला जातो. जाणून घ्या यंदा नारळी पौर्णिमा कधी आहे, काय आहे शुभ मुहूर्त आणि नारळी पौर्णिमेचा इतिहास.
यंदा श्रावण पौर्णिमेची सुरुवात शुक्रवार, 8 ऑगस्ट रोजी दुपारी 2.12 वाजता होईल आणि या पौर्णिमेची समाप्ती शनिवार, 9 ऑगस्ट रोजी दुपारी 1.24 वाजता होईल. त्यामुळे नारळी पौर्णिमेचा सण शनिवार 9 ऑगस्ट रोजी साजरा केला जाईल. या दिवशी पूजा करण्यासाठी मुहूर्त सकाळी 7.27 ते 9.7 वाजेपर्यंत असेल. तर दुपारी मुहूर्त 12.26 ते 2.6 वाजेपर्यंत राहील.
नारळी पौर्णिमेला समुद्राची पूजा करुन त्यात नारळ अर्पण करण्याची परंपरा आहे. मान्यतेनुसार, या दिवशी समुद्र देवतेला प्रसन्न केल्याने मच्छिमारांना जलमार्गात सुरक्षितता मिळते आणि त्यांच्या कामातील अडथळे दूर होतात. या दिवशी मच्छीमारांसाठी नवीन मासेमारी हंगामाची सुरुवात होते, कारण या वेळेनंतर समुद्राच्या लाटा आणि वारे अनुकूल मानले जातात.
या दिवशी कोळी बांधव पारंपरिक गाणी गातात आणि नृत्य करत नारळी पौर्णिमेचा सण साजरा करतात.
तसेच खास पदार्थांमध्ये गोड नारळाचा भात असतो, जो बहुतेकदा मसालेदार कढीपत्तासोबत दिला जातो.
यावेळी समुद्राची पूजा करुन त्यामध्ये नारळ अर्पण केला जातो. असे मानले जाते की, समुद्रात नारळ अर्पण करणे म्हणजे सुरक्षितता आणि समृद्धीसाठी भगवान वरुणला प्रार्थना करणे.
या दिवशी मच्छीमार समुद्रासोबत त्यांच्या बोटींची पूजा करतात. कारण समुद्र त्यांच्या जीवनाचा आधार आहे.
नारळी पौर्णिमेचा संबंध वरुण देवता आणि जलदेवता यांच्याशी आहे. या दिवशी समुद्रामध्ये नारळ अर्पण करतात आणि सुरक्षित प्रवास, चांगले हवामान आणि मासेमारीत यश मिळावे यासाठी प्रार्थना करतात. या दिवशी समुद्राला नारळ अर्पण केल्यानंतर ते पुढील मासेमारी हंगामाची सुरुवात दर्शवतात. यालाच नारळी पौर्णिमा किंवा श्रावण पुन्वनावा असेही म्हटले जाते.
यावेळी नारळी पौर्णिमा आणि रक्षाबंधनाचा सण एकाच दिवशी येत आहे म्हणजे शनिवार, 9 ऑगस्ट रोजी साजरी करण्यात येणार आहे. असे मानले जाते की, श्रावण पौर्णिमेच्या दिवशी बहिणी दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करतात आणि समुद्रकिनारी राहणारे समुदाय समुद्राच्या आशीर्वादासाठी प्रार्थना करतात. या दिवशी भावा-बहिणीच्या नात्याचे रक्षण करण्याची भावना असते आणि निसर्गाबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याची परंपरा आहे. दोघांच्या संगममुळे हा दिवस आणखी शुभ बनतो. या दिवशी समुद्रकिनारी नारळ अर्पण केले जातात. समुद्रत नारळ अर्पण करते वेळी सर्वप्रथम नारळाला हळद, कुंकू, तांदूळ, फुले इत्यादी गोष्टींनी सजवले जाते. त्यानंतर ते मंत्रांचा जप करुन पाण्यात अर्पण केले जाते.
(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)