फोटो सौजन्य- istock
आजचा गुरुवारचा दिवस. आजचा स्वामी ग्रह केतू आहे. त्यामुळे आज सर्व मूलांकाच्या लोकांवर केतूचा प्रभाव राहील. तर आजचा गुरुवारचा गुरू ग्रह गुरू आहे. त्याचा अंक 3 आहे. मूलांक 3 असणाऱ्या लोकांचे बोलणे, व्यवसायात लाभ होईल. तसेच तुमच्या इच्छा पूर्ण होऊ शकतात. तर मूलांक 7 असलेल्याना नशिबाची साथ मिळेल आणि धार्मिक कार्यामध्ये आवड निर्माण होईल. मूलांक 1 ते 9 असणाऱ्यांसाठी आजचा दिवस कसा असेल, जाणून घ्या
मूलांक 1 असलेल्या लोकांचा आजचा दिवस मिश्रित राहील. आर्थिक बाबतीत आजचा दिवस चांगला राहील. कोणतेही निर्णय विचारपूर्वक घ्यावे. कुटुंबामध्ये एकत्र रहावे. नोकरी करणारे लोक कामाच्या ठिकाणी व्यस्त राहतील. शिक्षणाच्या बाबतीत आजचा दिवस शुभ राहील.
मूलांक 2 असलेले लोक कामामध्ये व्यस्त राहतील. तुम्हाला कामाच्या ठिकाणी सहकार्याकडून अपेक्षित सहकार्य मिळेल. काही गोष्टीत समस्या येऊ शकतात त्यामुळे तुम्ही थोडे अस्वस्थ रहाल. दुसऱ्यावर जास्त विश्वास ठेवू नये. सरकारी काम पूर्ण होऊ शकतात.
मूलांक 3 असणाऱ्या आजचा दिवस सामान्य राहील. व्यवसायात तुम्हाला अपेक्षित लाभ होईल. विद्यार्थ्यांना परीक्षेत अपेक्षित यश मिळेल. वाहन चालवताना काळजी घ्या. नोकरी करणाऱ्या लोकांचा आजचा दिवस मिश्रित राहील. तुमच्या इच्छा पूर्ण होऊ शकतात.
मूलांक 4 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस सामान्य राहील. तुम्ही एखाद्या नवीन कामाची सुरुवात करू शकता. तुम्ही प्रवास देखील करू शकता. तुमची नियोजित कामे वेळेवर पूर्ण होतील. मालमत्तेच्या बाबतीत तुम्हाला अपेक्षित यश मिळेल.
मूलांक 5 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस मिश्रित राहील. कामाच्या ठिकाणी समस्या येऊ शकतात. कामाच्या ठिकाणी लक्ष केंद्रित करावे. आर्थिक बाबतीत आजचा दिवस अनुकूल राहील. कुटुंबामध्ये आनंदाचे वातावरण राहील.
मूलांक 6 असलेल्या लोकांचा आजचा दिवस मिश्रित राहील. कामाच्या ठिकाणी तुम्ही घेतलेल्या मेहनतीचे तुम्हाला अपेक्षित लाभ मिळेल. एखाद्या व्यक्तीच्या मदतीने तुमचे अपूर्ण काम पूर्ण होईल.
मूलांक 7 असलेल्या लोकांचा आजचा दिवस सामान्य राहील. कामाच्या ठिकाणी काही समस्या येऊ शकतात. काही गोष्टीत तुम्हाला नशिबाची साथ मिळेल. कुटुंबातील वातावरण आज सामान्य राहील. धार्मिक कार्यात तुमची आवड वाढेल. नोकरी करणाऱ्याना अपेक्षित लाभ होईल.
मूलांक 8 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस सामान्य राहील. महत्त्वाच्या कामात समस्या येऊ शकतात. नोकरी करणाऱ्याना प्रगती होण्यात वेळ लागेल. व्यवसायात अपेक्षित लाभ मिळेल. कुटुंबात आज सामान्य वातावरण राहील.
मूलांक 9 असलेल्या लोकांचा आजचा दिवस चांगला राहील. या लोकांना नवीन काम करण्याची संधी मिळू शकते. आर्थिक लाभ होण्याची शक्यता. तुमच्या जोडीदाराशी एखाद्या गोष्टीवरून वाद किंवा मतभेद होऊ शकतात. मुलांकडून चांगली बातमी ऐकायला मिळेल.
(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)