फोटो सौजन्य- pinterest
ज्योतिषशास्त्रानुसार, शनिवार 28 जून रोजी बुध आणि शनि यांच्या संयोगाने नवपंचम योग तयार होत आहे. हे दोन्ही ग्रह कुंडलीमध्ये नवव्या आणि पाचव्या घरात असल्याने 120 अंशाच्या कोनात स्थित असल्याने त्यांना नवपंचम योग असे म्हणण्यात येते. बुद्धिमत्ता, रणनीती आणि कठोर मेहनत यांच्या संयोजनामुळे त्यांना यश मिळविण्याचे प्रतीक मानले जाते.
नवपंचम योगाचा प्रभाव करिअर आणि व्यवसायाच्या दृष्टीने एक नवीन संधी निर्माण करणारा आहे. या योगामुळे योजना आखण्यास, संयमाने काम करण्यास मदत होते. यामुळे व्यक्तीच्या जीवनातील आर्थिक स्थिती मजबूत होते. त्यामुळे व्यक्तीच्या जीवनात सकारात्मक बदल झालेले दिसून येतात. व्यक्ती नवीन ध्येय मनात ठेवून ते साध्य करण्यासाठी नवपंचम योग अनुकूल ठरेल. करिअर आणि व्यवसायात कोणत्या राशीच्या लोकांना फायदा होईल, जाणून घ्या
नवपंचम योगाचा मेष राशीच्या लोकांना करिअरच्या क्षेत्रात फायदा होऊ शकतो. नोकरी करणाऱ्या लोकांना पदोन्नतीची संधी मिळू शकते. एखाद्या व्यवसायामध्ये जुनी गुंतवणूक केली असल्यास त्यात फायदा होईल. व्यवसायानिमित्त परदेशी प्रवास करण्याची संधी मिळू शकते. आर्थिक परिस्थिती चांगली राहून उत्पन्नाचे स्त्रोत तयार होतील.
कर्क राशीच्या लोकांना नवपंचम योगामुळे नशिबाची साथ मिळेल. नवीन नोकरीच्या शोधात असणाऱ्यांना नोकरीची संधी मिळेल. सरकारी कामात यश मिळेल. कोणत्याही योजनेत गुंतवणूक करण्यासाठी हा दिवस चांगला राहील.
कन्या राशीच्या लोकांसाठी नवपंचम योगाचा दिवस शुभ राहणार आहे. या लोकांना करिअरमध्ये नवीन संधी उपलब्ध होतील. जे विद्यार्थी स्पर्धा परीक्षांची तयारी करत आहे त्यांना यश मिळेल. व्यवसायामध्ये भागीदारीमध्ये काम करणाऱ्यांसाठी हा काळ अनुकूल आहे. आर्थिकदृष्ट्या हा काळ फायदेशीर राहील.
तूळ राशीच्या लोकांना नवपंचम योगाचा फायदा होईल. नोकरी करणाऱ्या लोकांना कामाच्या ठिकाणी प्रशंसा होईल. व्यवसायिकांना मोठी ऑर्डर मिळेल. तुम्ही कोणत्याही योजनेत गुंतवणूक करु शकता. शेअर मार्केटमध्ये देखील गुंतवणूक करणे फायदेशीर आहे. मुलांसंबंधित चांगली बातमी मिळू शकते.
मकर राशीच्या लोकांमध्ये नवपंचम योगामुळे अस्थिरता येईल. हा योग व्यवस्थापन, नियोजन आणि विश्लेषणात तुमची कार्यक्षमता वाढवेल. सरकारी नोकरीत काम करणाऱ्यांना नवीन जबाबदारी मिळू शकते. व्यवसायामध्ये भागीदारीत काम करणाऱ्यांना फायदा होईल.
(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)