
फोटो सौजन्य- pinterest
ज्योतिषशास्त्रात नवपंचम योग हा अत्यंत फायदेशीर योग मानला जातो. हा राजयोगांपैकी एक मानला जातो. या योगात शुभ स्थाने, केंद्र आणि त्रिकोण एकमेकांशी जोडलेले असतात. ज्यावेळी हे दोन्ही ग्रह एकमेकांशी संबंध निर्माण करतात तेव्हा कर्म आणि भाग्य यांचे संयोजन तयार होते, जे स्वाभाविकपणे खूप शुभ मानले जाते. पंचांगानुसार, शनिवार, 6 डिसेंबर रोजी संध्याकाळी 6.32 वाजता बुध आणि गुरु ग्रह मिळून शक्तिशाली नवपंचम योग तयार करणार आहे.
बुध आणि गुरु ग्रह यांच्यातील हा शक्तिशाली नवपंचम योग 12 वर्षांपूर्वी तयार झाला होता. 6 डिसेंबरपासून सुरू होणारा नवपंचम योग ज्यावेळी गुरु बुध राशीत, मिथुन राशीत प्रवेश करेल त्यावेळी तयार होईल. बुध-गुरू युतीचा कोणत्या राशीच्या लोकांवर सकारात्मक परिणाम होणार आहे. जाणून घ्या भाग्यशाली राशी कोणत्या आहेत त्या
मिथुन राशीच्या लोकांसाठी हा योग वरदान ठरणार आहे. यावेळी तुमची आर्थिक स्थिती सुधारेल तुमचे अडकलेले पैसे तुम्हाला परत मिळतील. एखादा मोठा व्यवसाय करार होऊ शकतो. कुटुंबाचा पाठिंबा मिळेल. या काळात जुने स्वप्न अचानक पूर्ण होईल. या काळात तुम्हाला नशिबाची साथ मिळेल. तुम्ही अनेक उत्तम कामगिरी करू शकाल.
कन्या राशीच्या लोकांसाठी हा काळ खूप शुभ ठरणार आहे. या काळात उत्पन्नाचे नवीन स्त्रोत तयार होतील. तसेच तुमची आर्थिक स्थिती सुधारेल. नोकरी करणाऱ्यांना पदोन्नती किंवा महत्त्वाची जबाबदारी मिळण्याची शक्यता आहे. व्यवसायात अनपेक्षित होऊ शकतो आणि गुंतवणुकीतून तुम्हाला चांगले उत्पन्न मिळू शकते. कुटुंबामध्ये आनंदाचे वातावरण राहू शकते. मानसिक संतुलन आणि आत्मविश्वास वाढेल.
धनु राशीच्या लोकांसाठी बुध आणि गुरुचा नवपंचम योग खूप फायदेशीर ठरणार आहे. या काळात तुमच्या आर्थिक अडचणी दूर होतील. मर्यादित प्रयत्नांमुळेही लक्षणीय फायदे होतील. अचानक करिअरमध्ये वाढ होईल आणि नवीन संधी पुढे जाण्याचा मार्ग मोकळा करतील. मालमत्तेशी संबंधित बाबीमध्ये फायदा होईल. कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील. या काळात तुमच्या सर्व प्रयत्नांमध्ये नशीब तुमची साथ देईल.
(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)
Ans: ज्यावेळी दोन शुभ ग्रह नवम आणि पंचम भावाच्या संबंधात येतात. त्यावेळी होणाऱ्या शुभ स्थितीला नवपंचम योग म्हणतात
Ans: गुरुचा संक्रमण काळ मोठा असल्याने त्याची राशीस्थाने कमी वेळा बदलतात. त्यामुळे बुध गुरु नवपंचम योग 12 वर्षांनी तयार होतो
Ans: नवपंचम राजयोगाचा मिथुन, कन्या आणि धनु राशीच्या लोकांना फायदा होणार आहे