Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Mumbai Crime |
  • Lifestyles |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Navnath Parayan: श्री नवनाथ कथासार ग्रंथाचे पारायण कसे करावे? जाणून घ्या पारायणाची पद्धत

श्री नवनाथ कथासार नाथ संप्रदायातील नऊ नाथांच्या चमत्कारीक आणि प्रेरणादायी कथांचा संग्रह असलेला एक अत्यंत पवित्र ग्रंथ आहे. यामध्ये नवनाथांच्या कथा आहेत. हे पारायण कसे करावे आणि पारायणाची पद्धत जाणून घ्या

  • By प्राजक्ता प्रधान
Updated On: Mar 12, 2026 | 12:50 PM
फोटो सौजन्य- pinterest

फोटो सौजन्य- pinterest

Follow Us
Follow Us:
  • श्री नवनाथ कथासार ग्रंथाचे पारायण कसे करावे
  • पारायणाची पद्धत
  • स्त्रीयांनी पारायण करावे का?
 

श्री नवनाथ भक्तिसार या ग्रंथात एकूण 40 अध्याय आहेत. या ग्रंथाचे पारायण नऊ दिवसांत पूर्ण करावे. काही साधक या पद्धतीने पारायण न करता रोज 5 ते 100 ओव्या वाचतात. काहीजण रोज एक अध्याय वाचतात. तर काही जण ठराविकच एक अध्याय रोज वाचतात, कारण यातील प्रत्येक अध्याय एका विशिष्य फलप्राप्तीसाठी आहे. पूर्ण श्रद्धेने व भक्तीभावाने, तसेच नाथांना शरण जाऊन केलेले पारायणाचे दिव्य अनुभव निश्चित येतात. शक्यतो पारायण करण्यासाठी गुरुवार व शुक्रवार हे शुभ दिवस मानले जातात.

पारायणाची पूर्वतयारी कशी करावी

‘श्री नवनाथ भक्तिसार’ या ग्रंथाचे पारायण सुरू करण्यापूर्वी फुले, हार, तुळशी, सुगंधी उदबत्ती, धूप, कलश, विड्याची पाने, सुपाऱ्या, नैवेद्यासाठी पेढे इ. तसेच अष्टगंध, अत्तर, रांगोळी, नारळ इ. गोष्टी तयार ठेवाव्यात. नंतर शुद्धोदकाने स्नान करून भस्मलेपन करावे. कलश स्थापन करावा. देवापुढे विड्याची पाने, सुपारी व दक्षिणा ठेवावी, तसेच नयनमनोहर सुंदर रांगोळी काढावी, समई लावावी. नंतर कलशाची पूजा करून पुरुषांनी शक्य असल्यास संध्या करून 108 वेळा गायत्री मंत्रांचा जप करावा.

श्री नवनाथ कथासार

हा नाथ संप्रदायातील नऊ नाथांच्या चमत्कारीक आणि प्रेरणादायी कथांचा संग्रह असलेला एक अत्यंत पवित्र ग्रंथ आहे. हा ग्रंथ प्रामुख्याने धुंडीसुत श्री मालू कवी यांनी 1819 च्या सुमारास रचलेल्या ‘श्री नवनाथ भक्तिसार’ या मूळ ग्रंथाचे संक्षिप्त रूप किंवा कथा स्वरूपातील सारांश मानला जातो.

ग्रंथाची काही मुख्य वैशिष्ट्ये

 

या ग्रंथामध्ये एकूण 40 अध्याय आहेत. यामध्ये नऊ नारायणांनी कलियुगात मानव कल्याणासाठी घेतलेले अवतार म्हणजेच ‘नवनाथ’ आणि त्यांच्या अलौकिक कार्याचे वर्णन यात करण्यात आले आहेत. भगवान दत्तात्रेयांनी स्थापन केलेल्या या परंपरेत मच्छिंद्रनाथ, गोरक्षनाथ, जालंधरनाथ, कानिफनाथ, गहिनीनाथ, भर्त्रीनाथ, रेवणनाथ, चरपतीनाथ आणि नागनाथ या नऊ नाथांच्या जन्मापासून ते त्यांच्या सिद्धीपर्यंतच्या कथा आहेत. ग्रंथाच्या 40 व्या अध्यायात त्यातील प्रत्येक आध्याय कोणत्या कार्यासाठी वाचावा याची माहिती दिलेली आहे.

Chaitra Navratri Tips: चैत्र नवरात्रीच्या सुरुवातीपूर्वी घरामध्ये करा ‘हे’ बदल, तुमच्यावर राहील देवी दुर्गेचा आशीर्वाद

स्त्रियांनी पारायण करावे का?

‘श्री नवनाथ भक्तिसार’ ग्रंथाचे पारायण स्त्रियांनी करावे का? असा प्रश्न पुष्कळदा भक्तांच्या मनात येतो. याचे कारण, श्रीगुरुचरित्र हा ग्रंथ स्त्रियांनी वाचू नये अशी स्पष्ट आज्ञा प्रसिद्ध दत्तावतार श्रीवासुदेवानंद सरस्वती ऊर्फ टेंबेस्वामी महाराज यांनी आपल्या ‘स्त्रीशिक्षा’ या ग्रंथात दिली आहे. याचे कारण या ग्रंथात वेदाक्षरे आलेली आहेत, असे ते सांगतात. परंतु ‘श्रीनवनाथ भक्तिसार’ या ग्रंथात कुठेही वेदाक्षरे नसल्यामुळे हा ग्रंथ पुरुषांप्रमाणेच स्त्रियांनीही वाचण्यास काहीच हरकत नाही. त्यायोगे त्यांचा निश्चितच फायदा झाल्याशिवाय राहणार नाही.

Samudrik Shastra: मानेच्या बनावटीवरून ओळखा व्यक्तीचा स्वभाव, अशा लोकांवर कधीही ठेवू नका विश्वास

दिव्य अनुभव कधी येते?

‘श्रीगुरुचरित्र’ किंवा ‘श्रीनवनाथ भक्तिसार’ अशासारख्या ग्रंथांची भक्तिभावाने पारायणे करणाऱ्या भक्तांना काही वेळा अनेक दिव्य अनुभव आलेली आहेत, असे भाविकांचे मत आहे. यामध्ये नवनाथांचे किंवा एखाद्या नाथांचे दर्शन होणे, त्यांच्याकडून काही संदेश मिळणे किंवा पारायण काही विशिष्य हेतूने केलेले असेल तर त्यासंदर्भात काही सूचना मिळणे, याचप्रमाणे वृत्ती पूर्ण आनंदमय होणे, सुवास येणे, स्वर्गीय नाद ऐकू येणे इथपासून ‘आदेश’ किंवा ‘अलख्‌’यासारखे शब्द ऐकू येणे. तसेच धंद्यात वृद्धी होते, विवाह इच्छुकांचे विवाह जुळतात, असे अनुभव येतात. या ग्रंथांच्या पाचव्या अध्यायाचे घरात नित्य पठण केल्यास घरातील बाधा किंवा पिशाच्चपीडा दूर होते, असे सांगितले जाते.

(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)

💡

Frequently Asked Questions

  • Que: नवनाथ कथासार म्हणजे काय

    Ans: नवनाथ कथासार हा नाथ संप्रदायातील नऊ नाथांच्या चमत्कारीक व प्रेरणादायी कथांचा संग्रह असलेला पवित्र ग्रंथ मानला जातो. या कथा भक्तांना आध्यात्मिक मार्गदर्शन देतात.

  • Que: नवनाथ पारायण सुरू करण्यापूर्वी कोणती तयारी करावी?

    Ans: पारायण करण्यापूर्वी स्नान करून स्वच्छ वस्त्र परिधान करावे. पूजा साहित्य जसे फुले, तुळस, धूप, उदबत्ती, नैवेद्य, कलश इत्यादी तयार ठेवून देवाची पूजा करून पारायण सुरू करावे.

  • Que: नवनाथ पारायण केल्याने कोणते फायदे होतात?

    Ans: भक्तांच्या श्रद्धेनुसार या पारायणामुळे मानसिक शांती, आध्यात्मिक उन्नती, अडचणींमधून मार्ग मिळणे आणि इच्छित फलप्राप्ती होण्यास मदत होते.

Web Title: How to parayan the navnath kathasar granth method of recitation

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 12, 2026 | 12:50 PM

Topics:  

  • dharm
  • Religion
  • Shree Swami Samarth

संबंधित बातम्या

Osho World: जर मनाचा आरसाच नसेल, तर धूळ कुठे बसेल? ‘या’ ओशोंच्या कथेत दडलेले आहे आत्मसाक्षात्काराचे रहस्य
1

Osho World: जर मनाचा आरसाच नसेल, तर धूळ कुठे बसेल? ‘या’ ओशोंच्या कथेत दडलेले आहे आत्मसाक्षात्काराचे रहस्य

प्रत्येक जीवाच्या प्रारब्धाची बदलते दिशा! ‘जय जय स्वामी समर्थ’मध्ये सुरू झाला ‘ब्रह्मांडनायक’ अध्याय
2

प्रत्येक जीवाच्या प्रारब्धाची बदलते दिशा! ‘जय जय स्वामी समर्थ’मध्ये सुरू झाला ‘ब्रह्मांडनायक’ अध्याय

…तर १५७ वर्षे वाट पाहावी लागेल! २०२७ मध्ये दिसणार शतकातील सर्वात मोठे सूर्यग्रहण
3

…तर १५७ वर्षे वाट पाहावी लागेल! २०२७ मध्ये दिसणार शतकातील सर्वात मोठे सूर्यग्रहण

Religion and Nature : नदी, पर्वत, वृक्ष पूजनीय; पण हेच देव आहेत का? विविध धर्मांचे मत जाणून घ्या
4

Religion and Nature : नदी, पर्वत, वृक्ष पूजनीय; पण हेच देव आहेत का? विविध धर्मांचे मत जाणून घ्या

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.